Nashik Gram Panchayat Election Result 2022 Live : नाशिकमध्ये (Nashik) थोड्याच वेळात संबंधित तहसील कार्यलयात (Tahsil Office) 10 वाजता मतमोजणीला (Counting) सुरवात होणार आहे. नाशिक तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 14 तालुक्यांतील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली. आज रिंगणात असलेल्या 3 हजार 474 उमेदवारांचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. आज सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात ओट असून पहिला निकाल अर्धा तासात हाती येणार आहे. त्यामुळे मतपेटीत भवितव्य बंद झालेल्या हजरो उमेदवारांच्या मनात धाकधूक आहे. तर दुसरीकडे आतापासूनच कार्यकर्ते, नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतो आहे.नाशिक जिल्ह्यात रविवारी मतदानाही टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. कारण जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले.
दरम्यान आज मतमोजणीचा कार्यक्रम थोड्याच वेळात संबंधित तहसील कार्यालयात सुरु होणार आहे. नाशिकमध्ये थोड्याच वेळात संबंधित तहसील कार्यलयात 10 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. तर नाशिक तालुका तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. शिवाय पुढील अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती असल्याने पोलीस यंत्रणेने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असून संवेदनशील गावांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात 34 पैकी नारायणगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. एकूण 8 फेरी होणार दुपारी दोन वाजेपावेतो सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
Nashik Gram Panchayat Election Result 2022 Live : मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल...
नाशिक जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करणाऱ्या दिग्ग्ज नेत्यांनी या निवडणुकीत ताकद पणाला लावल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसेंचे मालेगाव, आमदार छगन भुजबळांचा मतदार संघ येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंच्या नांदगाव मध्ये निवडणुका लागल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील 7 तालुक्यात निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या मजमोजणीवर अनेक दिग्गजांचे लक्ष असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरवात होणार आहे.
Nashik Gram Panchayat Election Result 2022 Live : बिनविरोध ठरलेल्या 8 ग्रामपंचायती
तालुका ग्रा. पं नावे
बागलाण किकवारी बु, ढोलबारे, महड.
नाशिक कोटमगाव.
चांदवड नारायणगाव
कळवण जयपूर.
नांदगाव शास्त्रीनगर
दिंडोरी जालखेड
महत्त्वाच्या इतर बातम्या :