Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; 42 पैकी  20 ग्रापंपचायतीवर भाजपाचा झेंडा  

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Dec 2022 07:04 PM
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; 42 पैकी  20 ग्रापंपचायतीवर भाजपचा झेंडा  

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी  34  ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह  219 सदस्यांच्या जागांसाठी 613  उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष  म्हणजे  42  पैकी 6 ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्या रिक्त आहेत. आज अंतिम निकालात  सर्वाधिक 20 ठिकाणी भाजपाचे  पॅनल निवडून आले. तर शिंदे गटाचे 13 पॅनल तसेच ठाकरे गटाचे पाच तर दोन ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.   

Devendra Fadnavis: विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. राज्यात 3 हजार 29 ग्रामपंचायती आमच्या आल्यात आहेत. विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली आहे, असं ते म्हणाले आहेत.

Latur Grampanchayat Result : लातूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी

लातूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. 


बिनविरोध 16 सर्वपक्षीय 


भाजप 153


काँग्रेस 73


राष्ट्रवादी 42


उद्धव सेना 16


शिंदे सेना 03


मनसे 03


इतर 42  


सरपंच पद रिक्त  03 

कोरेगांव विधानसभा मतदार संघातील एकुण 27 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक 2022 मध्ये 4 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध व उर्वरीत निवडणुक लागलेल्या 38 ग्रामपंचायतीपैकी शशिकांत शिंदे यांचे नेतृत्वाखाली कोरेगांव तालुक्यात 14 ग्रामपंचायती खटाव तालुक्यामध्ये 1 सातारा तालुक्यामध्ये 4 अशा एकुण 19 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने विजय मिळावला तसेच बिनविरोध झालेल्या गामपंचायतीमध्ये कोरेगांव तालुका 5 सातारा तालुका 3 अशा एकूण 8 ग्रामपंचायतीवर अशा एकूण 27 ग्रामपंचायतीवर शशिकांत शिंदे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे वर्चस्व तसेच कुमठे, पिंपोडे खुर्द, खडखडवाडी, आरफळ, आरळे या ग्रामपंचायतीवर बहुमत मिळवले.

solapur Grampanchayat Result : सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची एकहाती सत्ता 

करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून यामध्ये माजी आमदार नारायण पाटील गटाच्या ( बाळासाहेबांची शिवसेना ) 20 ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. या विजयानंतर  नारायण पाटील यांच्या जेऊर येथील  कार्यालयात हलगी वाजवत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांचे नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तर राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजयमामा शिंदे यांचा दहा ग्रामपंचायतीवर विजय झाला आहे. 

Pune: पुणे जिल्ह्यात अजित दादांची सरशी, चंद्रकांत पाटलांना दणका

पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये लढत होती. यात अजित दादांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत, गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके यांच्या तालुक्यांचा ही मोठा वाटा राहिलेला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही भाजपला अवघ्या 38 ठिकाणी विजय मिळवता आलाय. त्यामुळे हा भाजपला धक्का मानला जातोय. 

बीड जिल्ह्यात भाजपचीच सरशी : पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यात भाजपचीच सरशी आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 

Jalgaon Grampanchayat Result: जळगावमधील मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात एकनाथ खडसे यांचे वर्चस्व; 13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

Jalgaon Election Result: जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी एकूण 13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे . भाजप शिंदे गटाला या निवडणुकीत जनतेने नाकारले असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. 

यवतमाळ: राळेगाव विधानसभा मतदारसंघातील  8 पैकी 5 ग्रामपंचायतींवर काँग्रेस, तर दोन ठिकाणी भाजप विजयी

Yavatmal Gram Panchayat Result: राळेगाव विधानसभा मतदारसंघातील  8 पैकी 5 ग्रामपंचायतींवर काँग्रेस, तर दोन ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी शिंदे गटाचा विजय झाला आहे. भाजपचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना धक्का बसला आहे. या तालुक्यात 2 ग्रामपंचायती भाजपला तर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री पुरके गटाने 5 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. तर एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व आहे. 

जळगावात विजयी मिरवणुकीवरून भाजपच्या दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू

Jalgaon Election Result: जळगाव जामनेरमधील टाकळी खुर्द गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजयी मिरवणुकीवरून भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. या हाणामारीत धनराज माळी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Jalna Election Result: रावसाहेब दानवेंची भावजय सुमन दानवे विजयी

Jalna Election Result:  जालना जिल्ह्यातील जवखेडा गावचा निकाल हाती आले आहे. रावसाहेब दानवेंची भावजय सुमन दानवे विजयी झाल्या आहेत.  रावसाहेब दानवेंच्या गावात 30 वर्षांनंतर निवडणूक होत आहे. 

Beed Election Result:  बीड आणि शिरूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांकडे 

Beed Election Result:  बीड आणि शिरूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ताबा मिळवला आहे. बीड तालुक्यात इट, साक्षाळ पिंपरी, पारगाव ,शिरस, कुकडगाव, काठोडा, बराणपुर , काळेवाडी, आंबेसावळी, जुजगव्हाण , काळेगाव, हवेली, जरूर, सांडरवण , पिंपळादेवी, ग्रामपंचायत वर माजी मंत्री क्षीरसागर गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहेत

Satara Election Result: साताऱ्यातील फलटणमध्ये 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

Satara Election Result:  साताऱ्यातील फलटणमध्ये राष्ट्रवादीने बालेकिल्ला वाचवला आहे. 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत.  मात्र पंचवीस वर्षाची सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विडणी ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व आहे. 

 Chiplun Gram Panchayat: चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा

 Chiplun Gram Panchayat: चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा..राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरीही ग्रामीण भागात मात्र महाविकास आघाडी चे एकत्रित लढत दिसत नाही. शिरगावमध्ये अटीतटीच्या लढतील. उद्धव ठाकरे शिवसेना विरोधात राष्ट्रवादी ची महिला उभ्या होत्या त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या महिला सरपंच निता शिंदे विजयी..झाल्यात.. 

Buldhana Election Result: बुलढाण्यातील पातूरडा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे रणजित गंगतिरे सरपंचपदी

Buldhana Election Result:  बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पातूरडा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे रणजित गंगतिरे सरपंच पदी 730 मतांनी विजयी. हा भाजपाला मोठा धक्का आहे , याठिकाणी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.

Solapur Election Result:  दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना दोन महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये धक्का

Solapur Election Result:  दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे आमदार  सुभाष देशमुख यांना दोन महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये धक्का बसला आहे.  निम्बर्गी येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांचे सुपुत्र श्रीदीप हसापुरे विजयी झाले आहेत. मंद्रूप ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पाराव कोरे यांनी दिला धक्का बसला आहे.  त्यांच्या वहिनी अनिता कोरे सरपंचपदावर विजयी झाल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पैकी असलेल्या सलगर ग्रामपंचायतवर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना धक्का म्हेत्रे समर्थक असलेल्या ज्योती डोंगराजे यांचा सलगर गावात विजय झाला आहे. बार्शी तालुक्यात भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व कायम आहे.  22 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राऊत यांचे समर्थकांचे पॅनल विजयी, तर सोपल गटाचे 8 ग्रामपंचायतवर वर्चस्व माढा तालुक्यातील आठ पैकी आठ गावांवर राष्ट्रवादीची सत्ता, आमदार बबनराव शिंदे यांचा वरचष्मा कायम

Sangli ELection Result:  भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये विजय

Sangli ELection Result:  भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत, आणि पडळकरवाडी ग्रामपंचायतवर ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. 7 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत. तर सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत.या विजयानंतर आटपाडी मध्ये जल्लोष करण्यात आला आहे. 

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List : सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List : सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी

Parbhani Gram Panchayat Election Live: पूर्णेत विजयी जल्लोषात हुल्लडबाजी , पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज

Parbhani Gram Panchayat Election Live: परभणी जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाता आहे. सर्वत्र निकाल आज लागतोय मात्र परभणी नंतर पूर्णतेही विजयी जल्लोषानंतर कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आला.  विजयी झालेल्या गावच्या कार्यकर्त्यांनी जाताना पुर्णा शहरातून अतिशय जोरदारपणे हुल्लडबाजीबाजी केली ज्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार्च केला आहे

Gram Panchayat Election Live: आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या दैठणा घाट ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे गटाचे वर्चस्व

Gram Panchayat Election Live: आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या दैठणा घाट ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे गटाने वर्चस्व मिळवले आहे.  या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार अशोक गुट्टे हे विजयी झाले

Nagpur Gram Panchayat Election Live: फेटरी ग्रामपंचायतीमध्ये  राष्ट्रवादी गटाचा विजय

Nagpur Gram Panchayat Election Live:   फेटरी ग्रामपंचायतीमध्ये  राष्ट्रवादी गटाचा विजय झाला आहे.  भाजप उमेदवाराचा पराभव केला  आहे.  रवींद्र खांबलकर सरपंच पदासाठी विजयी. फेटरी हे गाव देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक गाव होते. 

Barshi  Gram Panchayat Election Live:  बार्शी तालुक्यातील 22 पैकी 12 ग्रामपंचायत भाजप पृरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व कायम

Barshi  Gram Panchayat Election Live:  बार्शी तालुक्यातील 22 पैकी 12 ग्रामपंचायत भाजप पृरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व कायम  तर ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांचे 8 ग्रामपंचायतीवर वर्चस्व  आहे.  माजी मंत्री दिलीप सोपल यांना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली धोबीपछाड  तर बार्शी तालुक्यात दोन जागी अपक्ष सरपंच विजयी

Indapur Gram Panchayat Election Live: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये भाजपची सत्ता

Indapur Gram Panchayat Election Live: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीची सत्ता उलटून भाजपचे तालुकाध्यक्ष यांच्या पत्नी सरपंच पदावर विराजमान  झाल्या आहेत 

Katol Gram Panchayat Election Live:  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यातील वडवीरा  गावामध्ये काँग्रेसची  बाजी

Katol Gram Panchayat Election Live:  माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्या काटोल तालुक्यातील वडवीरा (Wadvira)  गावामध्ये काँग्रेसची  बाजी मारली आहे.  आशिष देशमुख (Ashish Deshmukh)  यांच्या गटाच्या  सुनीता बनाईत या सरपंच पदासाठी विजयी झाल्या आहेत. 

Palghar Gram Panchayat Election Live :  पालघर तालुक्यातील सर्वात मोठी मतदार संख्या असलेल्या सातपटीमध्ये मनसेच्या सीमा भोईर सरपंच पदी

Palghar Gram Panchayat Election Live :  पालघर तालुक्यातील सर्वात मोठी मतदार संख्या असलेल्या सातपटीमध्ये राजकारणाची उलथापालथ पाहायला मिळत आहे. सातपाटीमध्ये मनसेच्या सीमा भोईर सरपंच पदी विजयी झाल्या तर 17 पैकी 11 सदस्य विजयी झाले. 

Buldhana Gram Panchayat Election Live :  बुलढाणा तालुक्यातील गिरडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे तालुका प्रमुख धनंजय बारोटे पराभूत

Buldhana Gram Panchayat Election Live :  बुलढाणा तालुक्यातील गिरडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे तालुका प्रमुख धनंजय बारोटे पराभूत तर  याठिकाणी उद्धव गटाच्या सुनीता गायकवाड विजयी झाल्या आहेे.  

Akola Gram Panchayat Election Live : अकोला शहरालगतच्या बाभूळगाव ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची 'शिवशक्ती-़भिमशक्ती पराभूत

Akola Gram Panchayat Election Live : अकोला शहरालगतच्या बाभूळगाव ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची 'शिवशक्ती-़भिमशक्ती पराभूत. सरपंचपदी वंचितचे बंडखोर सुशिल सिरसाट विजयी. शिवशक्ती-भिमशक्तीच्या प्रशांत सिरसाट यांचा केला पराभव. पुतण्याने केला काकाचा पराभव. सरपंच पदासह 13 पैकी 8 जागा जिंकल्यात बंडखोर गटाने. जिल्ह्यातील बाभूळगाववर होते जिल्ह्याचे लक्ष.

Yavatmal Gram Panchayat Election Live : यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन ग्रामपंचायतीमध्ये मारोती कांबळे  विजयी

Yavatmal Gram Panchayat Election Live : यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन या ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलने चार उमेदवार निवडून आले तर सरपंच पदासाठी याच पॅनलचे  मारोती कांबळे  हा 22 वर्षाचा युवक निवडून आला आहे. आतापर्यंत विविध पक्षाचे या ग्रामपंचायतीवर सत्ता होती मात्र कुठलाही विकास न झाल्याने गावकऱ्यांनी परिवर्तन पॅनेल उभे केले होते आणि आता या पॅनल कडून सरपंचासह तीन सदस्य निवडून आल्याने दवाखान्यात उत्साहाचे वातावरण आहे

Palghar Gram Panchayat Election Live :सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी मनसेचे आठ सदस्य आत्तापर्यंत विजयी

Palghar Gram Panchayat Election Live : पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये सतरा पैकी मनसेचे आठ सदस्य आत्तापर्यंत विजयी झाले आहेत. तर मनसेचे सरपंच पदाचे उमेदवार अभिजीत तरे 800 मतांनी आघाडीवर आहेत.  सातपाटीचे लोकसंख्या जवळपास 25 हजार असून यामध्ये जवळपास 17000 मतदार आहेत

Akkalkot Gram Panchayat Election Live : अक्कलकोट मधील सलगर गावात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना धक्का

Akkalkot Gram Panchayat Election Live : अक्कलकोटमधील सलगर गावात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना धक्का बसला. आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची सरशी
काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे समर्थक ज्योती डोंगराजे 400 मतांनी विजयी

Jalgaon Gram Panchayat Election Live : एकनाथ खडसेंनी गड कायम राखला, भाजप शिंदे गटाला धक्का

Jalgaon Gram Panchayat Election Live :  एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा व उचंदे या दोन ग्रामपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या दोन्ही ठिकाणी भाजप शिंदे गटाने जोरदार ताकद लावली होती . मात्र एकनाथ खडसे यांनी त्यांचा गड कायम राखला आहे.  कुर्हा या ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. राष्ट्रवादीचे बिपिन महाजन यांचे पॅनल विजय झाले आहे.तर उचंदे ग्रामपंचायत वर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Gram Panchayat Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 32 ग्रामपंचायती बिनविरोध

325 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यातील 32 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. 

Gram Panchayat Election Live : बुलढाणा जिल्ह्यात 21 ग्रामपंचायत बिनविरोध

जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायत पैकी 251 ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालंय. 21 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

Sangamner Gram Panchayat Election Live : इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंचपदी

Sangamner Gram Panchayat Election Live : संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत  विजय मिळवला आहे.  अपक्ष उमेदवारी करत निवडणूक रिंगणात आल्या आहे. शशिकला शिवाजी पवार यांचा सरपंच पदावर विजय मिळवला आहे.

Dapoli Gram Panchayat Election Live :  दापोली तालुक्यात आमदार योगेश कदम यांचा दबदबा, 14  ग्रामपंचायतींवर शिंदे गटांचा विजय

Dapoli Gram Panchayat Election Live :  दापोली तालुक्यात आमदार योगेश कदम यांचा दबदबा,  14  ग्रामपंचायतींवर शिंदे गटांचा विजय  झाला आहे.  ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा झेंडा वेळवी आणि कळंबट ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे आहे. 

Yavatmal Gram Panchayat Election Live : यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी

Yavatmal Gram Panchayat Election Live : यवतमाळ  जिल्ह्यात शिंदे गटाचे सरपंच पदाचे  उमेदवार विजयी झाले असून  दिग्रस तालुक्यातील लींगी ग्राम पंचायतीमध्ये शिंदे गटातर्फे असलेली सरपंच पदासाठी प्रियंका निलेश जाधव या  विजयी झाल्या आहेत 

Yavatmal Gram Panchayat Election Live : यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी

Yavatmal Gram Panchayat Election Live : यवतमाळ  जिल्ह्यात शिंदे गटाचे सरपंच पदाचे  उमेदवार विजयी झाले असून  दिग्रस तालुक्यातील लींगी ग्राम पंचायतीमध्ये शिंदे गटातर्फे असलेली सरपंच पदासाठी प्रियंका निलेश जाधव या  विजयी झाल्या आहेत 

Vengurle Gram Panchayat Election Result LIVE: वेंगुर्ले तालुक्याचा पहिला निकाल

Vengurle Gram Panchayat Election Result LIVE: वेंगुर्ले तालुक्याचा पहिला निकाल,  चिपी ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.

Aatpadi Gram Panchayat Election Result Today:  आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी मध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता

Aatpadi Gram Panchayat Election Result Today:  सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर  विजयी  झाल्या आहे.  निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता मात्र तालुक्यातील निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडी मध्ये देखील  सरपंच पदासाठी देखील लागली निवडणूक

Solapur Gram Panchayat Election Live : भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यात दुसरा धक्का

Solapur Gram Panchayat Election Live : भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यात दुसरा धक्का बसला आहे.  दक्षिण सोलापुरातील मंद्रूप ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादीच्या आप्पाराव कोरे यांनी भाजप आमदार सुभाष देशमुख यांना धक्का दिला 

Kolhapur Gram Panchayat Election Result LIVE: कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतीचा निकाल बिनविरोध लागलाय. तर, चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायतींचा निकाल बिनविरोध लागलाय. यातील सहा ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Result LIVE: नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 गावांमध्ये निवडणुका झाल्या.
नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 गावांमध्ये निवडणुका झाल्या. ७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून १९ गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ५७९ आहे. मतदान झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांची संख्या १२९१ तर सरपंच पदासाठी १७७ मतदान झाले.
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Live News Update: संदिप क्षीरसागर यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणूकीत काकांना धोबीपछाड; नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Live News Update: संदिप क्षीरसागर यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणूकीत काकांना धोबीपछाड; नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता

Akola Gram Panchayat Election Live : राज्यातली नव्या मैत्रीची पहिली ग्रामपंचायत, 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता

Akola Gram Panchayat Election Live : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता. दोन्ही पक्षांच्या मैत्रीवर राज्यातली पहिली ग्रामपंचायत विजयी. सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले विजयी. सर्वच्या सर्व सात सदस्य विजयी.

Vengurle Gram Panchayat Election Live : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने

Vengurle Gram Panchayat Election Live : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. चिपी ग्रामपंचायतीवर भाजपचा सरपंच विजयी झाला आहे. 

Ratnagiri Gram Panchayat Election Live : रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का, टेंभ्ये ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा झेंडा

Ratnagiri Gram Panchayat Election Live :  रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.  टेंभ्ये ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. ठाकरे गटाचे अशोक नागवेकर विजयी झाले असून शिंदे गटाच्या महाला आघाडी तालुका प्रमुख कांचन नागवेकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  तब्बल 300 मतांनी पराभव झाला आहे.  शिंदे गटासाठी टेंभ्ये ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती

परळीत राष्ट्रवादीचा जल्लोष, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचा डान्स

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्राम पंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे


धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात त्यासाठी मोठी विजय उत्सव करण्याची तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आले आहे तसेच डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत


 मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूक मध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे

Maharashtra Gram Panchayat election 2022 result final: भाजप-शिवसेना युतीचा मोठा विजयाचा दावा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या 199 उमेदवारांनी आरामात विजय मिळवला. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पक्षाचे 259 उमेदवार आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे समर्थन असलेले 40 उमेदवार विजयी झाले आहेत. ते सरपंचपदी निवडून आले आहेत.
Jalgaon Gram Panchayat Election Live :  माजी महसूल मंत्र्यांच्या गावी विद्यमान महसूल मंत्र्याची सत्ता

Jalgaon Gram Panchayat Election Live :  माजी महसूल मंत्र्यांच्या गावी विद्यमान महसूल मंत्र्याची सत्ता आली आहेबाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात विखे गटाच्या उमेदवार सरपंचपदी. विखे गटाच्या प्रीती गोकुळ दिघे सरपंचपदी 
संगमनेर तालुक्यातील तीन गावात विखेची सत्ता तर 13 गावात बाळासाहेब थोरात गटाची सत्ता आहे.  आतापर्यंत17 गावातील निकाल जाहीर झाले आहेत.

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल...

Nagpur Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील एकूण 236 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींचे निकालांची प्राथमिक माहिती मिळाली असून यापैकी निकाल खालील प्रमाणे...


ठाकरे गट शिवसेना  - 0
शिंदे गट - 0
भाजप- 10
राष्ट्रवादी- 2
काँग्रेस- 5
इतर- 3


इतर ग्रामपंचायतींचे निकाल जाणून घेण्यासाठी वाचत रहा...

Bharat Gogawale on Grampanchayat Elections 2022 : भरत गोगावलेंनी दिली आपल्या ग्रामपंचायतीची माहिती

Bharat Gogawale on Grampanchayat Elections 2022 : भरत गोगावलेंनी दिली आपल्या ग्रामपंचायतीची माहिती 

Jalgaon Gram Panchayat Election Live : जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवाराची बाजी

Jalgaon Gram Panchayat Election Live :  जळगाव जिल्ह्यातील लक्ष लागून असलेल्या एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील उंचांदे या ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.  वंदना दीपक भोलाने या सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत . तर याठिकाणी अपक्ष पॅनल विजयी झाले आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कूरहा तसेच उचंदे या दोन ग्रामपंचायतची निवडणूक होती. या  ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजप शिंदे गटाने जोरदार ताकद लावली होती मात्र यापैकी उचंदे या ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवाराचे पॅनल विजय झाले आहे.

Yavatmal Gram Panchayat Election Live :  यवतमाळ  तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीत 45 वर्षानंतर पहिल्यांदाच कमळ फुलले

Yavatmal Gram Panchayat Election Live :  यवतमाळ  तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीत 45 वर्षानंतर पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. होती 45 वर्षे कॉंग्रेस सत्तेत होते

Pulachi Shiroli Gram Panchayat Result 2022 Live : पुलाची शिरोलीमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का

Pulachi Shiroli Gram Panchayat Result 2022 Live : पुलाची शिरोलीमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का. 18 डिसेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले.

Gram Panchayat Election Results 2022 : Nagpur जिल्ह्यातील काटोल विधानसभा क्षेत्रातील सहा ग्रामपंचायतींचे निकाल हाती....

Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 : जिल्ह्यातील काटोल विधानसभा क्षेत्रातील 51 ग्राम पंचायत पैकी सहा ग्रामपंचायत निकाल हाती आले असून पाच ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अनिल देशमुख हे नसतांनाही त्यांच्या समर्थकांनी व सलील देशमुख यांनी किल्ला लढविला असून विजय मिळणार असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

Akola Gram Panchayat Election Live : अकोला तालुक्यातील निराट ग्रामपंचायतीवर युवा राज. काँग्रेसची 21 वर्षीय तरूणी प्रिया सराटे सरपंचपदी विजयी

Akola Gram Panchayat Election Live : अकोला तालुक्यातील निराट ग्रामपंचायतीवर युवा राज. काँग्रेसची 21 वर्षीय तरूणी प्रिया सराटे सरपंचपदी विजयी. जिल्ह्यातील तिसरा निकाल काँग्रेसच्या बाजूने.  निकालात त्रिशंकू परिस्थिती. दोन्ही पॅनलने 3-3 जागा जिंकल्या आहेत

Gram Panchayat Election Live : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे मेहुणे बाळासाहेब ओमासे बेडग ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत

Gram Panchayat Election Live : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे मेहुणे बाळासाहेब ओमासे बेडग ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत.

Mohol Gram Panchayat Election Live : मोहोळ तालुक्यातील गावडी दारफळ येथे राष्ट्रवादीची सत्ता

Mohol Gram Panchayat Election Live : मोहोळ तालुक्यातील गावडी दारफळ येथे राष्ट्रवादीची सत्ता 

Pune Gram Panchayat Election Result 2022 : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी 3 आणि भाजप 1 सरपंच विजयी

Pune Gram Panchayat Election Result 2022 : पुण्याच्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आगेकूच सुरू आहे. आत्तापर्यंत राष्ट्रवादी 3 आणि भाजप 1 ठिकाणी सरपंच विजयी झाले आहे. आमदार सुनील शेळके यांचा भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना धक्का मानला जात आहे.

Jalna  Gram Panchayat Election Results 2022 : माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या लोणी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय

Jalna  Gram Panchayat Election Results 2022 : माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या लोणी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाला आहे.  भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार गजानन लोणीकर विजयी 

Ratnagiri Gram Panchayat Election Results 2022 :  रत्नागिरी तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा भगवा

Ratnagiri Gram Panchayat Election Results 2022 :  रत्नागिरी तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा भगवा, सहा सदस्यांसह सरपंच पद ठाकरे गटाकडे, पूनम मेस्त्री 715 मतांनी सरपंच पदाच्या विजयी उमेदवार

Mahableshwar Gram Panchayat Election Results 2022 : मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी

Mahableshwar Gram Panchayat Election Results 2022 : मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी तर वेंगळ ग्रामपंचायत शिंदे गटाच्या शोभा संकपाळ सरपंच विजयी

Kalamb Tandulwadi Gram Panchayat Result 2022 Live : कंळब तांदुळवाडीत काँग्रेसने खातं उघडलं


Kalamb Tandulwadi Gram Panchayat Result 2022 Live : कंळब तांदुळवाडीत काँग्रेसने खातं उघडलं. 18 डिसेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले


Jalna Gram Panchayat Election Vote Counting: जालना जिल्ह्यातील आष्टी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंचपदाच्या  उमेदवार शोभा मधुकर मोरे विजयी

Jalna Gram Panchayat Election Vote Counting: जालना जिल्ह्यातील आष्टी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंचपदाच्या  उमेदवार शोभा मधुकर मोरे विजयी, आष्टी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात.

Pune Gram Panchayat Election Result 2022 : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक सरपंच

Pune Gram Panchayat Election Result 2022 :पुण्याच्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक सरपंच विजयी झाला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी 2 आणि भाजप 1 ठिकाणी विजयी झाले आहे. 

Ratnagiri Gram Panchayat Election Results 2022 : रत्नागिरी तालुक्यात ठाकरे गटाने खाते उघडले

Ratnagiri Gram Panchayat Election Results 2022 : रत्नागिरी तालुक्यात ठाकरे गटाने खाते उघडले आहे. कासारवेली येथे ठाकरे गटाचा सरपंच निवडून आला आहे वेदीका बोरकर अवघ्या 89 मतांनी विजयी

Jalna Gram Panchayat Election Vote Counting: जालना जिल्ह्यात शिंदे गटाचा पहिला विजय

Jalna Gram Panchayat Election Vote Counting: जालना जिल्ह्यात शिंदे गटाचा पहिला विजय, टाकरवन ग्रामपंचायती मध्ये सरपंच  सोपान भुतेकर यांचा 171 मतांनी वि

Pune Gram Panchayat Election Result 2022:बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

Pune Gram Panchayat Election Result 2022: बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. आहे. त्यामध्ये सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे. 

 Buldhana Gram Panchayat Election Vote Counting: शेगाव , जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यात खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव

 Buldhana Gram Panchayat Election Vote Counting: शेगाव , जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यात खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव पडला आहे.   तिन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे

 Sindhudurg  Gram Panchayat Election Vote Counting:  उद्धव ठाकरे शिवसेनेने सिंधुदुर्गात खाते उघडले

 Sindhudurg  Gram Panchayat Election Vote Counting:  उद्धव ठाकरे शिवसेनेने सिंधुदुर्गात खाते उघडले आहे. देवगडमधील मणचे ग्रामपंचायत शिवसेनेकडे

Pune Gram Panchayat Election Result 2022: भोर मधील तीन ग्रामपंचायतील कॉंग्रेसचं वर्चस्व

Pune Gram Panchayat Election Result 2022: भोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती  आला आहे. कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाला आहेत. ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ , अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे  तर कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे विजयी झाले आहेत. 

Sangamner Gram Panchayat Election Results 2022 : थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपने खाते उघडले

Sangamner Gram Panchayat Election Results 2022 : थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपने खाते उघडले आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीत भाजपचा विजय झाला आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांच वर्चस्व...
बाळासाहेब थोरातांना धक्का...कोल्हेवाडीत अगोदर होती थोरात गटाची सत्ता....
सरपंचपदी विखे गटाच्या सुवर्णा राहुल दिघे विजयी....

Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यात मावळात भाजपने खातं उघडलं

Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यात भाजपने खातं उघडलं. मावळ तालुक्यात सरपंच पदी भाजप उमेदवार विजयी झाला आहे. 

Pune Gram Panchayat Election Result 2022: हवेली तालुक्यात 194 उमेदवार रिंगणात

Pune Gram Panchayat Election Result 2022: हवेली तालुक्यात एकुण 7 ग्रामपंचायती आहेत.आहेरीगाव,आव्हाळवाडी,कदमवाक वस्ती,बुर्केगाव,पिंपरी संडास,पेरणी,गोगलवाडी या ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 194उमेदवार रिंगणात आहेत. 


 

Akola Gram Panchayat Election Results 2022 : अकोला तालुक्यातील दोनवाडा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

Akola Gram Panchayat Election Results 2022 : अकोला तालुक्यातील दोनवाडा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा. ठाकरे गटाचे श्रीकृष्ण झटाले सरपंचपदी विजयी. सदस्यांच्या 7 पैकी 2 जागा जिंकल्या आहेत. 

Nandurbar Gram Panchayat Election Result Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत पैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध

Nandurbar Gram Panchayat Election Result Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत पैकी सहा ग्रामपंचायत या बिनविरोध झालेला आहे. तर उर्वरित 117 ग्रामपंचायतीसाठी 68 टक्के मतदान झालं असून, 117  सरपंच पदासाठी 394 तर सदस्य पदासाठी 2 हजार 454 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील सहाही तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीच्या मतमोजणी होणार आहेत. त्यासाठी 56 टेबल लावण्यात आहे. तर 20 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि पोलीस दल तैनात करण्यात आलेला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री तथा आमदार मंत्री के सी पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक,आमदार आमश्या पाडवी,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र मतदार राजा नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार आहे, हे पाहणं औचित्याचे ठरणार आहे.

Pune Gram Panchayat Election Result 2022: मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडलं; वंदना आंबेकर विजयी

Pune Gram Panchayat Election Result 2022: मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले. देवले गावच्या सरपंच वंदना आंबेकर यांचा विजय झाला आहे. 

Akola Gram Panchayat Election Results 2022: अकोला तालुक्यातील निंबी मालोकार ग्रामपंचायतीवर सेनेच्या ठाकरे गटाचा झेंडा

Akola Gram Panchayat Election Results 2022: अकोला तालुक्यातील निंबी मालोकार ग्रामपंचायतीवर सेनेच्या ठाकरे गटाचा झेंडा. ठाकरे गटाच्या रेखा इंगोले सरपंचपदी विजयी

Pandharpur Gram Panchayat Election Result Live Update: मंगळवेढा तालुक्यात भाजप आमदार समाधान अवताडे गटाची आघाडी

Pandharpur Gram Panchayat Election Result Live Update: मंगळवेढा भाजप आमदार समाधान अवताडे गटाची आघाडी. मारापूर, हजापूर, डोंगरगाव, येद्राव, गुणजेगाव, खोमनाल या 6 ग्रामपंचायत मध्ये सरपंच विजयी. तर राष्ट्रवादी भगीरथ भालके आणि भाजप प्रशांत परिचारक युतीनं मारोळी, बावची, गोणेवाडी, तलंसंगी, शीर नांदगी या पाच ठिकाणी मिळविला विजय. 

 Palghar Gram Panchayat Election Results 2022: पालघरमध्ये मनसेने खाते उघडलं, मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी

 Palghar Gram Panchayat Election Results 2022: पालघरमध्ये मनसेने खात उघडलं असून ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच विजयी आहे. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली आहे.

Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला  सुरुवात

Pune Gram Panchayat Election Result 2022:  पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला  सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे. 

Jalgaon Gram Panchayat Election Result Live Update: ग्रामपंचायत निवडणुकीत गुजरातचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलचा पराभव

Jalgaon Gram Panchayat Election Result Live Update: ग्रामपंचायत निवडणुकीत गुजरातचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील (C. R. Patil) यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला असून विरोधात असलेल्या भाजप कार्यकर्ते शरद पाटील यांच्या लोकशाही ग्राम उन्नती पॅनल विजयी झाले आहेत. यात पॅनलचा पराभव झाला असला तरी भविनी पाटील यांचा मात्र वैयक्तिक विजय झाला आहे.

Gram Panchayat Election Results 2022: भाजप कार्यकर्ते शरद पाटील यांच्या लोकशाही ग्राम उन्नती पॅनल विजयी

Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायत निवडणुकीत गुजरातचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष  सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला असून विरोधात असलेल्या भाजप कार्यकर्ते शरद पाटील यांच्या लोकशाही ग्राम उन्नती पॅनल विजयी
झाले आहेत . यात पॅनलचा पराभव झाला असला तरी भविनी पाटील यांचा मात्र वैयक्तिक विजय झाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल...

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतचा सहभाग आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली आहे.
मतमोजणीला दहा वाजता सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीणमधील माहूरझरी व नरखेड तालुक्यातील अंबाडा देशमुख ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत निकाल आयोगाकडून अद्याप घोषित व्हायचा आहे. ग्रामपंचायतची मतमोजणी संपल्यानंतर सर्व तहसील मधील अधिकृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्री उशिरा मिळेल. यासंदर्भातील माहिती वेळोवेळी आपल्याला दिली जाईल.

Gram Panchayat Result : औरंगाबाद जिल्ह्यातील आत्तापर्यंतचा निकाल...

Aurangabad Gram Panchayat Result 2022 Live: 


सिल्लोड तालुक्यातील सारोळा आणि कासोड ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात. 


पैठण तालुक्यातील हीरापुर आणि जांभळी गावात शिंदे गटाच्या ताब्यात. 


औरंगाबाद तालुक्यात बनगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या उषाबाई मुरमे यांचा विजय झाला आहे. 


पैठणच्या बोकुड जळगाव कविता नागे संरपच पदी विराजमान.


सिल्लोड येथील बोरगाव येथे शिंदे गटाचे सत्तार बागवान सरपंच पदी विजयी.


बिनविरोध 14
निकाल 7
औरंगाबाद
ठाकरे गट 3
शिंदे गट  9
भाजप 5
काँग्रेस 00
राष्ट्रवादी 2
इतर  2
216/21

Gram Panchayat Election Results 2022 Live : कामठी तालुक्यातील खापा आणि गुमठी मध्ये भाजपा विजयी

 Nagpur Gram Panchayat Election Results 2022 :  नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खापा आणि गुमठीमध्ये भाजपा विजयी....

Malshiras Panchayat Election Results 2022: चांदापुरी , इस्लामपूर , तरंगफळ , कोळगाव, या गावात मोहिते पाटील भाजप सरपंच विजयी

Malshiras Panchayat Election Results 2022: चांदापुरी , इस्लामपूर , तरंगफळ , कोळगाव,  या गावात मोहिते पाटील भाजप सरपंच विजयी झाले आहेत. पाणीव , चौंडेश्वर वाडी या दोन ठिकाणी काँग्रेस सरपंच  तर जाम्भूड येथे राष्ट्रवादीचा सरपंच विजय झाला आहे

Malshiras Gram Panchayat Election Result Live Update: माळशिरसमध्ये चांदापुरी, इस्लामपूर , तरंगफळ, कोळगाव या गावात मोहिते पाटील भाजप सरपंच विजयी

Malshiras Gram Panchayat Election Result Live Update: माळशिरसमध्ये चांदापुरी, इस्लामपूर , तरंगफळ, कोळगाव या गावात मोहिते पाटील भाजप सरपंच विजयी. 


पाणीव, चौंडेश्वर वाडी या दोन ठिकाणी काँग्रेस सरपंच, तर जाम्भूड येथे राष्ट्रवादीचा सरपंच विजयी

#Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाच खातं उघडलं

Hirapur Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाला सुरवात झाली आहे. तर जिल्ह्यातील निकाल हाती यायला सुरवात झाली आहेदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे खातं उघडलं आहे. पैठण तालुक्यातील हीरापुर ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी शिंदे गटाचे विनोद राठोड विजयी झाले आहेत. 

Gram Panchayat Election Results 2022 LIVE | Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील पहिला निकाल, भाजपने खातं उघडलं

Bangaon Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाला सुरवात झाली आहे. तर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असून, बनगामध्ये ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात भाजपच खातं उघडलं आहे. सरपंच पदाच्या उमेदवार उषाबाई मुरमे यांचा विजय झाला आहे.


 

Parbhani Gram Panchayat Election Result Live Update: परभणी शहापूर ग्राम पंचायत चा निकाल जाहीर, सुरेश मोरे अपक्ष विजयी

Parbhani Gram Panchayat Election Result Live Update: परभणी शहापूर ग्राम पंचायतींचा निकाल जाहीर, सुरेश मोरे अपक्ष विजयी. 

Pandharpur Gram Panchayat Election Result Live Update: पंढरपुरात राष्ट्रवादीची सरशी, आरती अभिजित पवार विजयी

Pandharpur Gram Panchayat Election Result Live Update: पंढरपूर तालुक्यातील (Maharashtra Pandharpur New) आजोती ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचे निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार आरती अभिजित पवार या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर अमरजित पवार यांच्या केसाची आणि दाढीची चर्चा रंगली. गेल्या तीन वर्षांपासून सरपंच राष्ट्रवादीचा झाल्याशिवाय आपण केस आणि दाढी काढणार नाही. असा पण, पवार यांचा होता. आज पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेमधून सरपंच झाल्यावर त्यांनी हा आपला पण, तिरुपती बालाजी येथे जाऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत पुष्पा स्टाईलने आपल्या केसावरून आणि दाढीवरून हात फिरवत मतदारांना अभिवादन करत आभार मानले.

Ahmednagar Gram Panchayat Election Result Live Update: अहमदनगर जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301सदस्य बिनविरोध
Ahmednagar Gram Panchayat Election Result Live Update: अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) 1965 सदस्यांपैकी 301सदस्य बिनविरोध झाले असून, 15 सरपंच बिनविरोध झालं आहेत. जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यात. तर 5 सरपंच बिनविरोध झाले आहेत 203 पैकी 195 ग्रामपंचायतीचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली असून नगर जिल्ह्यावर नेमकी कुणाचं वर्चस्व राहणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; भाजप-शिंदे गटाचा 12 ग्रामपंचायतींमध्ये झेंडा

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; भाजप-शिंदे गटाचा 12 ग्रामपंचायतींमध्ये झेंडा. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 19 गामपंचायतींचे निकाल हाती आले असून 12 ग्रामपंचायतींमध्ये भाजप शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने सर्वाधिक चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राधानगरी तालुक्यातही शिंदे गटाने खाते उघडलं आहे. हसणे गावच्या पुजा शरद पाटील सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. सरपंच उमेदवार सुनिता कांबळे विजयी झाल्या आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; भाजप-शिंदे गटाचा 12 ग्रामपंचायतींमध्ये झेंडा
भाजप : 3 + 1+1 +1+ = 6
ठाकरे गट : 1 +1 =2
शिंदे गट : 3 + 1+1+1= 6
राष्ट्रवादी : 1+1=2
काँग्रेस : 1+1+ =2
इतर : 1+ 
एकूण : 430/ 19

Kagal Gram Panchayat Election Result Live Update : कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल;

कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल


निकाल जाहीर सत्तांतर,मुश्रीफ गटाला धक्का, सरपंचासह राजे गटाची बाजी 

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापुरातील बिनविरोध ग्रामपंचायती

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर बिनविरोध ग्रामपंचायत


एकूण : 43


स्थानिक विकास आघाडी  : 14


जनसुराज्य शक्ती: 10


काँग्रेस : 3


राष्ट्रवादी काँग्रेस : 7


शिवसेना ठाकरे गट : 3


शिवसेना-शिंदे गट : 6

Nanded Gram Panchayat Election Result Live Update: नांदेड जिल्ह्यातील चिमेगाव ग्रामपंचायतवर काँग्रेस आणि शिंदे गटाची सत्ता

Nanded  Gram Panchayat Election Result Live Update: नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायत पैकी 21 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध झाल्या असून 160 ग्रामपंचायतसाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील चिमेगाव येथे काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, या महाविकास आघाडीतील घटकपक्षांना बाजूला ठेवत, शिंदे गटाशी हातमिळवणी करत सत्ता ताब्यात घेतली आहे. जिल्ह्यातील 160 ग्रामपंचायतींपैकी चिमेगाव येथे काँग्रेस आणि शिंदेगट अशी मराठवाड्यातील पहिली युती पाहायला मिळालीय. ज्यात ह्या युतीने चिमेगाव ग्रामपंचायत ताब्यात घेतली असून बोंढार आणि पांगरी ग्रामपंचायत या महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या आहेत.

Maharashtra Vashim Gram Panchayat Election Result Live: वाशिम ग्रामपंचायतीयत किनखेड्यात आरती अनंत अवचार सरपंच पदी विजयी

Maharashtra Vashim Gram Panchayat Election Result Live: वाशिम ग्रामपंचायत निवडणूक 2022


रिसोड तालुक्यातील किनखेड्यात आरती अनंत अवचार सरपंच पदी विजयी. 

मोठी बातमी! तुळजापूरात आमदार राणाजगजितसिंग पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व

Osmanabad  Gram Panchayat Election Update:  भारतीय जनता पक्षाचे आमदार राणाजगजितसिंग पद्मसिंह पाटील यांचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तुळजापूर येथील चार ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, चिवरी, चव्हाणवाडी, धोत्री याठिकाणी कमळ फुलले आहे. 

Kolhapur Panchayat Election: शिरोळ तालुक्यात 4 ग्रामपंचायत शिंदे गटाकडे! करवीर तालुक्यात ठाकरे गटानं खातं उघडलं

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील धक्कादायक निकाल हाती येत आहेत. शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. करवीर तालुक्यातील नेर्लीत काँग्रेसचा सरपंच झाला आहे.  कागल तालुक्यातील पिराचीवाडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

Osmanabad: उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला निकाल हाती...

Osmanabad  Gram Panchayat Election Update: उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झाली असून, उस्मानाबाद गोपाळवाडी ग्रामपंचायत भाजपाकडे, कावळेवाडी ग्रामपंचायत आपकडे, पुर्वी ग्रामपंचायत आपकडे, वाखरवाडी ठाकरे गटाकडे, गोरेवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, उमरगा तालुक्यात भाजपाने खाते उघडले, सुंदरवाडी भाजपाकडे, अंबेहोळ ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे.


 

Nashik Gram panchayat Result : नाशिकमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरवात होणार, अर्धा तासात पहिला निकाल हाती लागेल!

Nashik Grampanchayat Result : नाशिकमध्ये थोड्याच वेळात संबंधित तहसील कार्यलयात 10 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. नाशिक तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.  अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील एकूण 196 ग्रामपंचायतसाठी निवडणूक प्रकिया पार पडली

Solapur Gram Panchayat Election Vote Counting : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने खाते उघडले, आरती अभिजीत पाटील सरपंच पदी विजयी

Solapur Gram Panchayat Election Vote Counting : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने खाते उघडले असून पंढरपुर तालुक्यातील अजोती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत,  आरती अभिजीत पाटील सरपंच पदी विजयी

Solapur Gram panchayat Election: सोलापूर जिल्ह्यातील आज एकूण 189 पैकी 174 ग्रामपंचायतींची मतमोजणीला सुरुवात

Solapur Gram panchayat Election: सोलापूर जिल्ह्यातील आज एकूण 189 पैकी 174 ग्रामपंचायतींची मतमोजणीला सुरुवात तर 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना गोपनीयतीचे शपथ देऊन मतमोजणीला सुरुवात झाली,  जिल्ह्यात सरपंच पदासाठी 174 तर आणि 1418 सदस्य निवडीची मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. या साठी जिल्ह्यात 11 केंद्रावर मतमोजणी सुरु झाली. सरपंच पदासाठी 498 तर सदस्य पदासाठी 3 हजार 421 उमेदवार रिंगणात आहेतसाधारणपणे सायंकाळी 5 पर्यंत मतमोजणी चालणार आहे.

Vadnage Gram panchayat Election: वडणगे गावात शिवसेना ठाकरे गटाची सत्ता तर शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड सुरू

Vadnage Gram panchayat Election: वडणगे गावात शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आली असून  सरपंच संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी यांची सरपंच पदी विजयी तर शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड सुरू आहे. 



  • अकिवाट मधून सरपंच पदाचे सौ. वंदना सुहास पाटील उमेदवार  विजयी

  • खिद्रापूर मधून सरपंच पदाचे उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी

  • टाकवडे मधून सरपंच पदाचे उमेदवार  सविता मनोज चौगुले विजयी

Karvir Gram panchayat Election: करवीर तालुक्यातील पहिला गुलाल भाजपला; कावणेत भाजपचा सरपंच

Karvir Gram panchayat Election: करवीर तालुक्यातील पहिला गुलाल भाजपने उधळला आहे. कावणेत सरपंचपदी भाजपने विजय मिळवला आहे. 10 सदस्यांपैकी प्रत्येकी 5 जागा काँग्रेस व भाजपला मिळाल्या आहेत.

Kolhapur Gram panchayat Election: कोल्हापुरात ठाकरे गटाने उघडले खाते, दिलीप कडवे सरपंच पदी विजयी

Kolhapur Gram panchayat Election:  कोल्हापुरात ठाकरे गटाने खात उघडले असून  व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंच पदी विजयी झाले आहेत. 

Nanded Gram panchayat Election:  नांदेड जिल्ह्यातील 160 ग्रामपंचायतसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी

Nanded Gram panchayat Election:  नांदेड जिल्ह्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल अवघ्या दोन तासातच हाती येणार असून यात प्रामुख्याने माजी मंत्री अशोक चंव्हाण व भाजप खा प्रताप पाटील चिखलीकर याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. जिल्ह्यातील 181ग्रामपंचायत पैकी 21 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 160 ग्रामपंचायतसाठी सकाळी 10 वाजल्या पासून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दरम्यान सकाळी 8 वाजल्या पासून मतमोजणीची तयारी सुरू झाली असून त्यानुसार गावानुसार प्रभाग निहाय टेबलवर मतमोजणी फेऱ्या पार पडणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्या पैकी 15 तहसील कार्यालयात ग्रामपंचायत मतमोजणीची पूर्व तयारी झाली आहे. तर  लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात दाजी मेहुण्यात, सरस कोण ठरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.यात भाजप खा. प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध शेकपा आमदार श्यामसुंदर शिंदे  किती ग्रामपंचायत  ताब्यात घेण्यात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मागील टप्यातील ग्रामपंचायतवर बहुतांश काँग्रेसने आपला झेंडा फडकवताना दमछाक झाली होती.दरम्यान या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर राहते की भाजपा बाजी मारणार हे अवघ्या तासाभरात चित्र स्पष्ट होणार आहे.

Raigad Gram panchayat Election :  रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींची आज निकाल
Raigad Gram panchayat Election :  रायगड जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी आज होणार आहे.  सरपंच आणि सदस्य पदाच्या दोन हजार ९३६ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला यानिमित्ताने होणार आहे. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार असून त्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे सज्ज झाले आहे.  रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या महाडमध्ये ७३ ग्रामपंचायत निवडणूक   झाली असून ५१ ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. त्यातच, यंदाची ग्रामपंचायत निवडणूक ही जिल्ह्यातील सर्व आमदारांसाठी कसोटी ठरणार आहे. तर, नव्याने झालेल्या शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून भरत गोगावले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 
Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात एकूण 196 पैकी 188 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडले होते. जिल्ह्यात 79.63 टक्के मतदानाची नोंद झाली होती. आठ ग्रामपंचायती या बिनविरोध ठरल्या होत्या. 


बिनविरोध झालेल्या 8 ग्रामपंचायती सध्या कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत -


तालुका - ग्रामपंचायत - पक्ष


१. बागलाण तालुका - किकवारी - भाजप 


२. बागलाण तालुका - ढोलबारी - राष्ट्रवादी 


३. बागलाण तालुका - महड - भाजप 


४. नांदगाव तालुका - शास्त्रीनगर - शिंदे गट


५. दिंडोरी तालुका - जालखेड - शिवसेना 


६. नाशिक तालुका - कोटमगाव - महाविकास आघाडी 


७. कळवण तालुका - जयपूर - राष्ट्रवादी 


८. चांदवड तालुका - नारायणगाव -


नाशिक जिल्हा -196



  • भाजप - 2

  • ठाकरे गट - 1

  • शिंदे गट - 1

  • राष्ट्रवादी - 2

  • काँग्रेस -

  • महाविकास आघाडी - 1

  • इतर - 1

Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात एकूण 196 पैकी 188 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडले होते. जिल्ह्यात 79.63 टक्के मतदानाची नोंद झाली होती. आठ ग्रामपंचायती या बिनविरोध ठरल्या होत्या. 


बिनविरोध झालेल्या 8 ग्रामपंचायती सध्या कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत -


तालुका - ग्रामपंचायत - पक्ष


१. बागलाण तालुका - किकवारी - भाजप 


२. बागलाण तालुका - ढोलबारी - राष्ट्रवादी 


३. बागलाण तालुका - महड - भाजप 


४. नांदगाव तालुका - शास्त्रीनगर - शिंदे गट


५. दिंडोरी तालुका - जालखेड - शिवसेना 


६. नाशिक तालुका - कोटमगाव - महाविकास आघाडी 


७. कळवण तालुका - जयपूर - राष्ट्रवादी 


८. चांदवड तालुका - नारायणगाव -


नाशिक जिल्हा -196



  • भाजप - 2

  • ठाकरे गट - 1

  • शिंदे गट - 1

  • राष्ट्रवादी - 2

  • काँग्रेस -

  • महाविकास आघाडी - 1

  • इतर - 1

kolhapur Gram Panchayat Election Vote Counting : कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का! थेट सरपंचासह समरजितसिंह घाटगे गटाची बाजी

kolhapur  Gram Panchayat Election Vote Counting :  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये पहिला निकाल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल समरजितसिंह घाटगे गटाने उधळला आहे. बामणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे.

Marathwada Grampanchayat Result मराठवाड्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, निकाल कोणाच्या बाजूने?

Marathwada Election Result : बीडच्या नाथ्रा गावात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र आलेत. चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विजयासाठी पंकजा आणि धनंज मुंडेंचे कार्यकर्त्यांची एका पाहायला मिळाली तर नवगण राजुरी येथे जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. औरंगाबादेत संदीपान भुमरे यांनी ताकद लावलीय. जालन्यातील जवखेडा या गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झालीय. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील कुंभार पिंपळगावच्या निकालांकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डिकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी ताकद लावलीय. त्याचप्रमाणे प्रचंड संघर्ष असलेल्या राणाजगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकरांची उस्मानाबादेत प्रतिष्ठा पणाला लागलीय.


Satara Gram Panchayat Election Results 2022 : साताऱ्यात 60 ग्रामपंचायती बिनविरोध

Satara Gram Panchayat Election Results 2022 : बुसातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. यातील 60 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 259 ग्रामपंचायतीची मतमोजणी आज सुरू झालेले आहे. त्या -त्या तालुक्‍यात या ग्रामपंचायतीचे मतमोजणीचे ठिकाण बनवण्यात आले असून. आता नुकताच पोस्टल मतदानाची पाकिटे एकत्र  करण्याची तयारी सुरू करण्यात आले आहे. 259 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 4 हजार 542 उमेदवार उभे होते. रविवारी झालेल्या या मतदानादिवशी सुमारे चार लाख पन्नास हजार मतदारांपैकी तीन लाख 55 हजार 254 मतदारांनी हक्क बजावला होता.

Buldhana Gram Panchayat Election Results 2022 : बुलढाणा जिल्ह्यामध्ये 951 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात

Buldhana Gram Panchayat Election Results 2022 :  जिल्ह्यामध्ये एकूण 279 पैकी 261 मध्ये निवडणुक झालीये. त्यासाठी 951 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे . तर याच 279 ग्रामपंचायत मध्ये एकूण 2325 सदस्यांसाठी एकूण 3490 उमेदवार रिंगणात आहे. 279 पैकी जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायती  बिनविरोध झाल्या आहेत. तर 21 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत , जिल्ह्यात 731 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.. याशिवाय सात  ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी एकही अर्ज आला नाहीये. 


निवडणूक होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती :



  • बुलढाणा : 12

  • चिखली : 28

  • मेहकर : 50 

  • लोणार : 39

  • सिंदखेडराजा : 30 

  • देऊळगाव राजा :19

  • मलकापूर : 11

  • मोताळा : 11

  • नांदुरा : 13

  • खामगाव : 16

  • शेगाव : 10

  • संग्रामपूर : 21

  • जळगाव जामोद : 19


बुलढाणा बिनविरोध निवडणुका झालेल्या गावांची नावे



  • सिंदखेराजा - वाघाळा

  • चिखली - मुंगसरी, करतवडी, सावंगी गवळी, कोनड

  • लोणार - पहुर

  • संग्रामपूर - काटेल, जस्तगाव

  • देऊळगाव राजा - धोत्रा नंदाई , गारखेड

  • जळगांव जामोद - मडाखेड बुद्रुक

  • मेहकर - खंडाळा, मालेगाव

  • मलकापूर - अनुराबाद

  • बुलढाणा - ढालसावंगी, हतेडी बुद्रुक

  • चिखली - पेंनसवांगी

Nashik Gram Panchayat Election 2022: नाशिकमधील 3 हजार 474 उमेदवारांचा आज फैसला

Nashik Gram Panchayat Election 2022: नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले असून 3 हजार 474 उमेदवारांचा आज फैसला होणार आहे. आज सकाळपासून ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. नाशिकमध्ये 79.63 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या चुरशीच्या निवडणुकीत 3 हजार 474 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मंगळवारी  मतमोजणीतून होणार आहे.


वाचा सविस्तर बातमी


Nashik Gram Panchayat Election 2022: नाशिकमधील 3 हजार 474 उमेदवारांचा आज फैसला


 

Nandurbar Election Result 2022 :  नंदुरबार जिल्ह्यात सहा ग्रामपंचायत बिनविरोध

Nandurbar Election Result 2022 :  नंदुरबार जिल्ह्यात 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया होती.  त्यापैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत.



  • काँग्रेस 04

  • भाजपा 01

  • शिवसेना ठाकरे गट 01


काँग्रेसच्या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती 



  • धडगाव तालुक्यातील  शिरसाणी, साव दिगर, शेलदा नवापूर तालुक्यातील गंगापूर


भाजपाच्या बिनविरोध झालेली ग्रामपंचायत



  • नंदुरबार तालुक्यातील कानळदे


ठाकरे गटाचे बिनविरोध झालेली ग्रामपंचायत


अक्कलकुवा तालुक्यातील पेचादेवी

Nagpur Election Result 2022:   नागपूर जिल्ह्यातील  तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक स्थिती

Nagpur Election Result 2022:   नागपूर जिल्ह्यातील  तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक स्थिती


नरखेड तालुका 



  • 22 ग्रामपंचायत

  • सरपंच - 22

  • सरपंच उमेदवार-67

  • सदस्य - 172

  • सदस्य उमेदवार- 395


काटोल तालुका 



  • 27 ग्रामपंचायत

  • सरपंच- 27

  • सरपंच उमेदवार-79

  • सदस्य - 199

  • सदस्य उमेदवार - 410


कळमेश्वर तालुका 



  • 23 ग्रामपंचायत

  • सरपंच- 23

  • सरपंच उमेदवार-56

  • सदस्य - 189

  • सदस्य उमेदवार - 396


सावनेर तालुका



  • 36 ग्रामपंचायत

  • सरपंच- 36

  • सरपंच उमेदवार-17

  • सदस्य - 325

  • सदस्य उमेदवार - 794


पारशिवानी तालुका 



  • 21 ग्रामपंचायत

  • सरपंच- 21

  • सरपंच उमेदवार-68

  • सदस्य - 177

  • सदस्य उमेदवार - 431


रामटेक तालुका 



  • 8 ग्रामपंचायत

  • सरपंच- 8

  • सरपंच उमेदवार-35

  • सदस्य - 80

  • सदस्य उमेदवार - 221


मौदा तालुका



  • 25 ग्रामपंचायत

  • सरपंच- 25

  • सरपंच उमेदवार-87

  • सदस्य - 221

  • सदस्य उमेदवार - 557


कामठी तालुका 



  • 27 ग्रामपंचायत

  • सरपंच- 27

  • सरपंच उमेदवार-90

  • सदस्य - 267

  • सदस्य उमेदवार - 621


नागपूर ग्रामीण तालुका



  • 19 ग्रामपंचायत

  • सरपंच- 19,

  • सरपंच उमेदवार-56

  • सदस्य - 159

  • सदस्य उमेदवार - 404


हिंगना तालुका



  • 7  ग्रामपंचायत

  • सरपंच- 7,

  • सरपंच उमेदवार-21

  • सदस्य - 69

  • सदस्य उमेदवार - 152



उमरेड तालुका


7 ग्रामपंचायत
सरपंच- 7,
सरपंच उमेदवार-29
सदस्य - 77
सदस्य उमेदवार - 225


कुही तालुका


4 ग्रामपंचायत
सरपंच- 4,
सरपंच उमेदवार-31
सदस्य - 40
सदस्य उमेदवार - 110



भिवापूर तालुका


10 ग्रामपंचायत
सरपंच- 10,
सरपंच उमेदवार-25
सदस्य - 76
सदस्य उमेदवार - 175

Nagpur Gram Panchayat Election 2022 : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष

Nagpur Gram Panchayat Election 2022 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असलेल्या  नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 पैकी 231 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाल्या त्याची आज मतमोजणी आहे . त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे . तर याच 231 ग्रामपंचायत मध्ये एकूण 2054 सदस्यांसाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे. 236 पैकी 5 ग्रामपंचायत या बिनविरोधी झाल्या. त्यामुळे सर्वांचे लक्ष नागपूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले 

Nandurbar Gram Panchayat Election 2022 : नंदुरबार जिल्ह्यात सहा ग्रामपंचायत बिनविरोध 

  Nandurbar Gram Panchayat Election 2022 : नंदुरबार जिल्ह्यात 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया होती. त्यापैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत. काँग्रेस 04, भाजपा 01, शिवसेना ठाकरे गट 01, तर काँग्रेसच्या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये धडगाव तालुक्यातील  शिरसाणी, सावऱ्या दिगर, शेलदा, नवापूर तालुक्यातील गंगापूर आहेत, भाजपाच्या बिनविरोध झालेली ग्रामपंचायत नंदुरबार तालुक्यातील कानळदे, ठाकरे गटाचे बिनविरोध झालेली ग्रामपंचायत, अक्कलकुवा तालुक्यातील पेचादेवी आहेत.

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: राज्यभरातल्या 7 हजार 135 ग्रामपंयातींचा आज निकाल, 616 गावात बिनविरोध निवडणूक

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: राज्यातल्या सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल आहे. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  राज्यातल्या 34 ठिकाणी 616  ग्रमपंचायत बिनविरोध झाल्या.  सकाळी10  वाजता मतमोजणीला सुरवात झाली. 

पार्श्वभूमी

मुंबई: राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे...काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.  सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 74 टक्के मतदान झालंय.. राज्यात 34 ठिकाणी 616 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्यात. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. कुण गुलाल उधाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचातींसाठी 88 टक्के मतदान


 कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता 474 पैकी 429 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) अत्यंत चुरशीने 84.08 टक्के मतदान झाले. राधानागरी तालुक्यात सर्वाधिक 8904. टक्के तर गडहिंग्लज तालुक्यात 77.01 टक्के सर्वात कमी मतदान झाले.  जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी 4 लाख 12 हजार 182 महिलांनी, 44 लाख 87 हजार 63 पुरुषांनी इतर असे एकूण 8 लाख 60 हजार 955 मतदारांनी मतदान केले. 


नाशिक  जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के 


नाशिक  जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले असून 3 हजार 474 उमेदवारांचा आज फैसला होणार आहे. जवळपास 79.63 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


जळगाव जिल्ह्यातील एकूण 122 ग्रामपंचायतीसाठी 80.24%  मतदान


जळगाव जिल्ह्यातील एकूण 122 ग्रामपंचायतीसाठी 80.24% एवढे मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्या तर्फे देण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान जळगाव तालुक्यात 87.70 टक्के तर सर्वात कमी मतदान चोपडा तालुक्यात 73.36 टक्के झाले आहे. दरम्यान कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडलेला नाही,  सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. 


प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या


ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.