Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर

Kolhapur Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे.

परशराम पाटील, एबीपी माझा Last Updated: 20 Dec 2022 05:01 PM
कागल तालुक्यातील 26 पैकी 15 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर

कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत 15 गावात सतांतर तर 11 ठिकाणी सत्ता कायम राहिली. आमदार हसन मुश्रीफ गटाचे 7, खासदार संजय मंडलिक गटाचे 7, समरजितसिंह घाटगे गटाचे 6, माजी आमदार संजय घाटगे गटाचे 4 तर प्रविणसिंह पाटील गटाचे 2 ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले.

शाहूवाडी, राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात गावकऱ्यांचा कौल कुणाला? 

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. कागल तालुक्यात मुश्रीफांना मोठ्या गावांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपला गड राखला आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांनी 12 पैकी 10 गावांमध्ये विजय मिळवला आहे. शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला ग्रामपंचायती गेल्या आहेत. चंदगड तालुक्यातील शिनोळीत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. मात्र, त्या ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला आहे. 

कोल्हापूर : कागल तालुक्यात पहिल्या तीन फेरीत हसन मुश्रीफ गटाला धक्का

कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक मोठ्या गावांमध्ये त्यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये भाजप गटाने आघाडी घेतली आहे.

राधानगरी तालुक्यात तरसंबळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमधील मतमोजणी स्थगित

राधानगरी तालुक्यातील तिसऱ्या फेरीत तरसंबळे ग्रामपंचायतीच्या मतमोजणीवेळी प्रभाग क्रमाकं तीनमध्ये ईव्हीएम ओपन न झाल्याने सरपंचपदाचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग तीनमधील मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे.   

कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील गटाची विजयी घौडदौड; 10 ग्रामपंचायतींमध्ये विजयाचा दावा

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 53 गावांमध्ये रणधुमाळी सुरु होती. या ग्रामपंचायती करवीर आणि  कोल्हापूर दक्षिणमध्ये विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 12 पैकी 10 ग्रामपंचायतींमध्ये  विजयाचा दावा केला आहे.  

कोल्हापूर : पाचगावच्या सरपंचपदी काँग्रेसच्या प्रियांका पाटील, मोरेवाडीच्या सरपंचपदी आनंदा कांबळे

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव आणि मोरेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले. पाचगावच्या सरपंचपदी प्रियांका संग्राम पाटील, मोरेवाडीच्या सरपंचपदी आनंदा कांबळे हे निवडून आले आहेत. 

शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा;17 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतीवर यड्रावकर गटाचे सरपंच

शिरोळ तालुक्यामध्ये 17 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत 17 पैकी 10 ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला, पण यड्रावकर गटाच्या समर्थकांनी चिवट झुंज देत विजय खेचून आणला. 

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे कारभारी कोण? पहा यादी एका क्लिकवर

करवीर तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे सरपंच एक क्लिकवर 



  • हिरवडे खालसात काँग्रेस शेकापचे नदीफ मुजावर विजयी

  • गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे विजयी

  • सावर्डे दुमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी

  • सडोली दुमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी 

  • कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी 

  •  चिंचवडे तर्फ कळेमध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी

  •  हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी

  •  सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील विजयी

  •  सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ विजयी

  • पाडळी बुद्रुकमध्ये स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड विजयी

  • परितेत काँग्रेसचे मनोज पाटील विजयी

  • दिंडनेर्लीत स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे विजयी

  • कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील विजयी

  • नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर हे विजयी

  •  सादळे मादळे स्थानिक आघाडीचे पंडित बिडकर विजयी  

  • वळिवडेत काँग्रेसच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे विजयी 

  •  प्रयाग चिखलीत भाजपचे रोहित रघुनाथ पाटील विजयी

कोल्हापूर : खासदार धैर्यशील मानेंना रुकडी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता राखण्यात यश

खासदार धैर्यशील माने यांना रुकडी गावामध्ये सत्ता राखण्यात यश आले आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. माने गटाच्या रुकडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या उमेदवार राजश्री रुकडीकर विजयी झाल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गामपंचातीत बंटी पाटलांना झटका

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 11 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धक्कादायक निकालांची नोंद होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून महाडिक गटाने सत्ता खेचून आणली आहे. गांधीनगर ग्रामपंचायतमध्येही सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. या ठिकाणी महाडिक गटाचे संदीप पाटोळे हे सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्येही पाटील गटाला धक्का बसला आहे. गांधीनगर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. त्यामुळे महाडिक गटाकडून दोन ग्रामपंचायतींमध्ये सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. 


कागल तालुक्यामध्ये यांना समरजितसिंह घाटगे गटाने चांगलाच हादरा दिला आहे. तालुक्यातील बामणी, कसबा सांगाव, निढोरी, रणदिवेवाडीत घाटगे गटाने सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे शिरोळ तालुक्यामध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित करताना चार ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे.धैर्यशील माने यांच्या रुकडीमध्ये माने गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार राज्यश्री रुकडीकर विजयी झाल्या आहेत. मात्र, धैर्यशील माने यांच्या चुलत भावाला पराभव पत्करावा लागला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; भाजप-शिंदे गटाचा 12 ग्रामपंचायतींमध्ये झेंडा!

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 19 गामपंचायतींचे निकाल हाती आले असून 12 ग्रामपंचायतींमध्ये भाजप शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने सर्वाधिक चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राधानगरी तालुक्यातही शिंदे गटाने खाते उघडलं आहे. हसणे गावच्या पुजा शरद पाटील सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. सरपंच उमेदवार सुनिता कांबळे विजयी झाल्या आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; भाजप-शिंदे गटाचा 12 ग्रामपंचायतींमध्ये झेंडा


भाजप – 3 + 1+1 +1+ = 6
ठाकरे गट – 1 +1 =2
शिंदे गट – 3 + 1+1+1= 6
राष्ट्रवादी - 1+1=2
कॉग्रेस - 1+1+ =2
इतर 1+ 
एकूण – 430/ 19

शिरोळ, करवीर, कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर

  • कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल; जाहीर सत्तांतर, मुश्रीफ गटाला धक्का, सरपंचासह राजे गटाची बाजी

  • बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा

  • करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपची बाजी; सतेज पाटील गटाला सत्तांतर करण्यात अपयश

  • कसबा सांगाव ता. कागल मुश्रीफ गटाला धक्का; सरपंच पदी राजे- मंडलिक गटाची बाजी

  • कोल्हापुरात ठाकरे गटाने खात खोललं; व्हनाळीत माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी

  • करवीर तालुक्यातील वडणगेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता;  सरपंच संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी यांची सरपंच पदी विजयी

  • शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड; अकिवाटमध्ये सरपंचपदाच्या वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी

  • खिद्रापूरमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी

  • टाकवडेमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी

करवीर तालुक्यातील पहिला गुलाल भाजपला; कावणेत भाजपचा सरपंच 

करवीर तालुक्यातील पहिला गुलाल भाजपने उधळला आहे. कावणेत सरपंचपदी भाजपने विजय मिळवला आहे. 10 सदस्यांपैकी प्रत्येकी 5 जागा काँग्रेस व भाजपला मिळाल्या आहेत.

कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के! तीन बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत घाटगे गटाची बाजी

कोल्हापूर जिल्ह्यात 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु असून पहिल्या निकालात कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत या तीन ग्रामपंचायतींमध्ये घाटगे गटाने बाजी मारली आहे. बामणीत शिव शाहू ग्रामविकास आघाडी सरपंच पदासह आठ जागांवर विजयी झाली आहे. शेतकरी विकास आघाडी दोन जागावर विजयी झाली आहे. 

कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का! थेट सरपंचासह समरजितसिंह घाटगे गटाची बाजी

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये पहिला निकाल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल समरजितसिंह घाटगे गटाने उधळला आहे. बामणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. 

पार्श्वभूमी

Kolhapur District Gram Panchayat Election : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारासच पहिला निकाल हाती  येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीस्थळी कडक बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्या-त्या तालुक्याचे तहसीलदार काम पाहतील. त्यांना एक सहायक अधिकारही असणार आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election)


या ठिकाणी होणार मतमोजणी



  • गगनबावडा : तहसील कार्यालय

  • राधागनरी : शासकीय गोदाम

  • भुदरगड - गारगोटी मौनीनगर तालुका क्रीडा संकुल

  • आजरा : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

  • हातकणंगले : तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत

  • शिरोळ : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

  • शाहूवाडी : तहसील कार्यालयातील जुने शासकीय धान्य गोदाम

  • पन्हाळा : नगरपालिका सभागृह

  • करवीर : बहुउद्देशीय हॉल रमण मळा कसबा बावडा

  • कागल : जवाहर नवोदय विद्यालय

  • गडहिंग्लज : नगरपरिषद पॅव्हिलियन हॉल

  • चंदगड : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत


शहराच्या वेशीवरील गावांमधील निकालाची उत्सुकता


कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्ये निवडणूक होत असल्याने उत्सुकता आहे. वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये थेट महाडिक (Dhananjay Mahadik) आणि सतेज पाटील (Satej Patil) गटात स्पर्धा असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाचगावमध्ये 66 टक्के मतदान झाले. पाचगावमध्ये महाडिक आणि पाटील गटात थेट स्पर्धा आहे. अपक्षांनी सुद्धा मोठी ताकद लावली असल्याने डोकेदुखी कोणाला होणार हे निकालानंतर समजेल. (Kolhapur District Gram Panchayat Election)


पाचगाव, कंदलगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये थेट दोन गटांमध्ये सामना होत असून अपक्षही रिंगणात आहेत. पाचगावमध्ये सरपंचपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. पाचगावमध्ये एकूण वॉर्ड 6 असून 17 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी प्रियांका संग्राम पाटील, सुवर्णा भिकाजी गाडगीळ, भारती संतोष ओतारी, मिनाक्षी महेश डोंगरसाने रिंगणात आहेत. या ठिकाणी महाडिक, पाटील गटात चुरस आहे. कंदलगावमध्येही याच दोन गटात सामना आहे. मोरेवाडीतही पाटील व महाडिक गटात चुरस आहे. 


इतर महत्वाच्या 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.