एक्स्प्लोर

मोठी बातमी: ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Sudhakar Badgujar : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक : आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्यावर तीन वर्षांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा मुलगा दीपक बडगुजर (Deepak Badgujar) यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी आरपीआयचे नाशिक महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. 

दीपक बडगुजरांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आता तीन वर्षानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दीपक बडगुजरांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

राजकीय हेतूने कारवाई : सुधाकर बडगुजर

मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेतलेल्यांना मारहाण करण्यात येत होती. सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना मारहाण केली. जुने नाव घेतले त्यांची सखोल चौकशी करा. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आम्हाला त्रास देण्याचे काम केले. पवननगर येथे झालेल्या गोळीबारात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अंबड पोलिसांच्या कामकाजावर मला संशय वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

संजय राऊतांचा गंभीर आरोप

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलीस आणत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात शिवसेनेचे वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहे. काल मी नाशिकला होतो. नाशिकला माझ्या लक्षात आलं की, आमचे सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढवत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी तीन वर्षांपूर्वीची केस उकरून काढली आहे. कोणावर तरी गोळीबार झाला होता असे म्हणतात. त्यातील आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबीयांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.  

आणखी वाचा

मोठी बातमी! नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस; सलीम कुत्ता डान्सप्रकरणी नोटीस दिल्याची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raghunath More Death : दिघेंच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, Eknath Shinde यांनी केलं कुटुंबाचं सांत्वनOne Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Fact Check : वेटिंग तिकिटाचा नियम, रेल्वे प्रवासाबाबत फेक दावा व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य
वेटिंग तिकिटाचा नियम, रेल्वे प्रवासाबाबत फेक दावा व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
Embed widget