Nashik Crime News मालेगाव : नाशिक शहरासह (Nashik Crime News) जिल्ह्यात मोबाईल (Mobile) चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ (Yavatmal) येथून नाशिकला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे 18 मोबाईल चोरणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police Station) अटक केली होती. त्यानंतर आता मालेगाव (Malegaon Crime News) शहरात धूम स्टाईलने दुचाकीवरुन मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात छावणी पोलिसांना (Chavani Police Station Malegaon) मोठे यश आले आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकींसह 16 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 
 
गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाला होता. मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस (Police) कसोशीने तपास करत होते. अखेर मोबाईल चोरटे छावणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडले. 


पाच जणांना घेतले ताब्यात


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरात दुचाकीवरुन (Two-Wheeler) येत मोबाईल हिसकावून पोबारा करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाली होती. पोलिसांसमोर मोबाईल चोरट्यांना पकडण्याचे मोठ आव्हान होते. छावणी पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना पकडण्याचे मिशन हाती घेतले. तीन दुचाकींसह 16 मोबाईल जप्त कडून पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून (Police) ताब्यात घेण्यात आले आहे. 


काही तासांतच ठोकल्या बेड्या


मोबाईल चोरीच्या तीन घटना एकाच वेळी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी (Police) अवघ्या काही तासांतच या मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेतले. अन्य पोलीस स्टेशनमध्ये देखील अशीच मोहिम राबवून चोरांना तातडीने पकडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


18 मोबाईल चोरणारा अटकेत


दरम्यान, काही दिवसांपूर्वी यवतमाळ (yavatmal) येथून नाशिकला (Nashik News) सहलीसाठी आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या भामट्यास भद्रकाली पोलिसांना (Bhadrakali Police Station) बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेले 18 मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. चोरलेले मोबाईल हे फोर जी असल्याने चोराची मोठी अडचण झाली होती. त्याच्याकडून ते फोन कोणी विकत घेत नसल्याने त्याने आपल्या घरीच मोबाईल लववून ठेवले होते, संशयिताने यापूर्वीदेखील 40 मोबाईल चोरले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Ayodhya Ram Mandir : "नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजेचा अंश राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत, नाशिककरांसाठी हा..."; काय म्हणाले महंत सुधीरदास पुजारी?


Nashik News : अन्न व औषध प्रशासनाची नाशिकमध्ये मोठी कारवाई; साडे चार लाखांचा पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटर साठा जप्त