Ayodhya Ram Mandir नाशिक : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची (Lord Shri Ram)  प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. देशभरासह विदेशातील भाविक देखील राम मंदिराच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे पहायला मिळत आहे. राम मंदिरात (Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवस निवडण्यात आला आहे. देशभरातील भाविक आपापल्या परीने रामलल्लाला सेवा अर्पण करत आहेत. नाशिकमध्ये नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या (Navvarsh Swagat Yatra Samiti) वतीने श्रीरामाचा खास प्रसाद भाविकांना वाटण्यात येणार आहे. 


लाडू बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात


22 जानेवारीला नाशकात (Nashik News) नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे तब्बल 15 हजार साजूक तुपातील मोतीचूर लाडूंचे श्रीरामाचा प्रसाद म्हणून रविवार कारंजा परिसरात वाटप करण्यात येणार आहे. हे लाडू बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 


इतके लागले साहित्य


यासाठी 1 हजार 500 लिटर गाईचे तूप, 1 हजार 600 किलो बेसन पीठ, 2 क्विंटल साखर, 22 किलो ड्रायफ्रुटस आणि 1 किलो इलायची पावडरचा वापर करण्यात आला आहे. श्री राम नामाचा जप करत लाडू सध्या वळले जात आहेत.


नाशिकचे साधू-महंत अयोध्येला रवाना


दरम्यान, गुरुवारी सकाळी संकेश्वर व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्यासह राज्यभरातील साधू-महंत अयोध्येकडे रवाना झाले आहेत. यावेळी साधू-महंतांवर फुलांचा वर्षाव करत श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. दोन दिवसांचा प्रवास करून साधू-महंत अयोध्येला पोहोचणार आहेत. 


केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचपर्यंत सुट्टी


राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टीची घोषणा केली आहे. मध्यवर्ती कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचाही या अधिसूचनेत समावेश आहे. 


प्रभू श्रीराम विराजमान


गुरुवारी 18 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळाले. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती तयार केली आहे. अरुण यांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Kalaram Mandir : पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरे नतमस्तक, राजकीयदृष्ट्या महत्व आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास काय?