Nashik Accident News मालेगाव : मनमाड-मालेगाव रोडवर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका वळणावर बस आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मालेगावच्या चोंढी घाटात ही घटना घडली.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मनमाड-मालेगाव रोडवरील चोंढी घाटाच्या पायथ्याशी एका अवघड वळणावर भरधाव बस व कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. बस मनमाडहून नंदुरबारकडे जाताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.


अपघातामुळे वाहतूक ठप्प


अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक हा कानडगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बसमधील 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा फेकला गेला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगावच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; दोन जखमी


मुंबई-आग्रा महामार्गावर खडक जांब गावाजवळील सगुणा कंपनीसमोर एसटी महामंडळाची बस व‌‌‌ ट्रॅक्टरचा गुरुवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले झाले. रमेश जानु वाघमारे (26, रा. तताणी ता. कळवण) व मोनाली युवराज केदारे (28, रा. मटाणे ता. देवळा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पिंपळगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी


नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील उज्ज्वल एजन्सीसमोरील चौकात दुचाकी व कारचा अपघात झाला.यात मुस्तफा शौकत खान (24, रा. अंबड लिंकरोड) या युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. नाशिकहून सातपूरच्या दिशेने जात असलेली दुचाकी (क्र. एमएच 15 डीएफ 3190) व पल्सर (क्र. एमएच 03 डीएम 3452) जात होत्या. नाशिकहून सातपूरच्या दिशेने येत असलेल्या कार (क्र. एमएच 15 जीए 0280) ने दोन दुचाकींना धडक दिली. या एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik News : अन्न व औषध प्रशासनाची नाशिकमध्ये मोठी कारवाई; साडे चार लाखांचा पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटर साठा जप्त


Nashik Kalaram Mandir : पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरे नतमस्तक, राजकीयदृष्ट्या महत्व आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास काय?