Nashik Terror Funding : सिरियातील महिलेशी संबंध, इसिसला फंडिंग, नाशिकमध्ये उच्चशिक्षित तरुण ATS च्या हाती, अनेक धक्कादायक खुलासे समोर
Nashik Crime News : नाशिकमध्ये बुधवारी दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली. दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.
Nashik Crime News नाशिक : नाशिकमध्ये बुधवारी दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. हुजेफ अब्दुल अजीज शेख अस एटीएसने अटक केलेल्याचे नाव आहे. कोर्टाने त्याला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी (ATS Custody) सुनावली आहे.
नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
7 मोबाईल, लॅपटॉप पेन ड्राईव्ह जप्त
आरोपीच्या घर झडतीत एटीएसने 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत केले आहे. संशयित हुजेब शेख सीरिया मधील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकचे सीरिया आणि इसिस कनेक्शन
एटीएसच्या तपासात नाशिकचे सीरिया आणि इसिस कनेक्शन समोर आले आहे. २०१९ मध्ये सिरीयात बॅटल ऑफ बाबूस या धर्मयुद्धात मृत झालेल्याच्या कुटुंबियांना हुजेफ शेख करून फंडिंग केलं जात असल्याचं उघडकीस आले आहे. नाशिक शहरातून (Nashik Crime News) पहिल्यांदाच अशा प्रकारे टेरर फंडिंग केले जात असल्याचे समोर आले आहे.
सीरियातील महिलेशी संबंध
सीरियामधील राबिया उर्फ उम्म ओसामा या महिलेच्या सांगण्यावरून विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहे. संशयित आरोप अभियंता आहे. त्याचे वेगवेगळ्या कंपनीत भागीदारी असून महाराष्ट्र कर्नाटक, बिहार, तेलंगणा या राज्यात त्याचे जाळे पसरलं आहे.
अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती
बुधवारी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. त्यामुळे अटकेचे सत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठवर जातात आणि कोण संशयित पोलिसांच्या हाती लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संशयित तिडके कॉलनीतील रहिवासी
संशयित हुसैफ शेख हा तिडके कॉलनीतील (Tidke Colony) रहिवासी आहे. त्याचे कुटुंब उच्चशिक्षित असून, संशयित इंजिनिअर आहे. त्याच्या नावे नाशिक व इतरत्र चार-पाच कंपन्या असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यापैकी काही कंपन्यांत संशयित भागीदार आहे. ॲग्री आणि एक्स्पोर्ट संदर्भातील या कंपन्यात आहेत. पत्नी व मुलांबरोबर तो नाशिकमध्ये राहतो.
आणखी वाचा
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर