MNS Vardhapan Din : आज मनसेचा 18 वा वर्धापन दिन; राज ठाकरेंची तोफ नाशकातून धडाडणार
Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मनसेच्या वर्धापन दिनाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MNS Vardhapan Din : एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेची (MNS) स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. शहरात पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचा (MNS Vardhapan Din) मान दिल्याचे दिसून येत आहे. वर्धापन दिनाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर शनिवारी वर्धापन दिनाच्या माध्यमातून कोणती भूमिका मांडणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असणार आहे. पुढच्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाला महत्व आले आहे.
राज ठाकरेंची तोफ नाशकातून धडाडणार
मनसेकडून आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज राज ठाकरेंची तोफ नाशिकमधून धडाडणार असल्याने नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मनसेने मुंबई व ठाणे यापेक्षा अधिक वेगाने नाशिकमध्ये पायमुळ रोवले. नाशिककरांनी सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन आमदार मनसेचे निवडून दिले होते. त्यानंतर २०१२ च्या मनपा निवडणुकीत पक्षाचे चाळीस नगरसेवक निवडून दिले. त्या जोरावर मनसेने नाशिकमध्ये पक्षाचा पहिला महापौर बसवला.
वर्धापन दिनाची नाशकात जय्यत तयारी
परंतू ज्या नाशिकमध्ये (Nashik News) मनसेने सत्ता मिळवली. तेथूनच पक्षाला अहोटी लागली. ती आजपर्यंत कायम आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून पक्षाध्यक्ष राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशकात तळ ठोकून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मनसेच्या या मेळाव्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. मेळाव्यातून पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी ठाकरे कोणत्या मुद्याला हात घालतील. याकडे कार्यकर्त्यांमध्ये कुतूहल आहे. वर्धापन दिनामुळे मनसेने (MNS Vardhapan Din) जोरदार तयारी केली असून सर्व शहर मनसेमय झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या