(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : नाशिक झालं राजकीय केंद्र, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यानंतर आता राऊत नाशिक दौऱ्यावर
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) माघारी फिरताच आज शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) नाशिकला येत आहेत.
Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) माघारी फिरताच आज शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) नाशिकला येत आहेत. त्यामुळं नाशिक हे राजकीय नेते मंडळींसाठी खलबत करण्याचे ठिकाण बनले आहे. अनेक राजकीय पक्षांच्या बैठका, चर्चा नाशिकमध्ये होत आहेत.
भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये
नाशिक हे राजकीय नेते मंडळींसाठी खलबत करण्याचे ठिकाण बनले आहे. अनेक राजकीय पक्षांच्या बैठका नाशिकमध्ये होत आहेत. त्यामुळं नाशिकची राज्यभर चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये पार पडली. यावेळी भाजपचे अनेक बडे नेते नाशिकमध्ये होते. त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नाशिकमध्ये होते. काल (13 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनमाड दौऱ्यावर होते. तर आज संजय राऊत नाशिकला येत आहेत.
संजय राऊत आज नेमकं काय बोलणार ?
संजय राऊत हे महिनाभरानंतर पुन्हा नाशिकला येत आहेत. त्यामुळं आता यावेळी शिंदे गट कुठला बॉम्ब फोडणार का हे पाहणे महत्वाचे आहे. कारण ज्या-ज्या वेळी संजय राऊत नाशिकला आले आहेत, त्या-त्या वेळी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं संजय राऊत यांचे नाशिकमध्ये येणं शिवसेना ठाकरे गटाला परवडलेलं नाही. संजय राऊत आज नेमकं काय बोलणार किंवा कुणावर ताशेरे ओढणार हे पहावं लागणार आहे.
नेत्यांच्या दौऱ्याने अधिकाऱ्यांची धावपळ
राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत, त्याचा केंद्रबिंदू नाशिक होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी हजेरी लावली. तर त्याचवेळी भाजपाने राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री यावेळी उपस्थित राहिले. त्यांची पाठ फिरत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मनमाडला भेट दिली. मंत्र्यांच्या या दौऱ्याने अधिकाऱ्यांची धावपळ काहीशी थांबत नाही. तोच ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आज नाशकात दाखल होत आहेत. आतापर्यंत राऊत आले आणि राजकीय वाद वाढल्याच्या घटना घडल्या आहेत. आता त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे गटाने राऊत यांना डिवचण्यासाठी पुन्हा काही पक्ष प्रवेशाची तयारी सुरू केल्याची चर्चा होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Sanjay Raut : भगतसिंह कोश्यारींनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, नवीन राज्यपाल बैस की बायस...वाचा नेमकं काय म्हणाले राऊत