MLA Dada Bhuse : उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं, दादा भुसे यांचा कांदेना दुजोरा
MLA Dada Bhuse : उद्धव ठाकरेंनी (Udhhav Thackeray) शिंदे (CM Eknath Shinde) याना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं होत, असा दुजोरा दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिला आहे.
MLA Dada Bhuse : आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी उपस्थित केलेला प्रश्न अगदी बरोबर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री (Gadchiroli) असताना हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कॅबिनेटमध्ये देखील याविषयी चर्चा झाली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी (Udhhav Thakaray) शिंदे याना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं होता, असा दुजोरा दादा भुसे यांनी दिला आहे.
दरम्यान शिंदे गटातील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी काल एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारली होती, याबाबत गौप्यस्फोट केला. त्यांनतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. यावेळी कांदे यांनी प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले कि, महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावाही सुहास कांदे यांनी केला.
दरम्यान कांदे यांच्या दाव्यानंतर माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी कांदे यांच्या या मुद्द्याला दुजोरा दिला आहे. आज सकाळी झालेल्या मुंबई येथील पत्रकार परिषदेत हा खुलासा त्यांनी दिला आहे. दादा भुसे यावेळी म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेबाबत त्यावेळी कॅबिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावेळी मी देखील उपस्थित होतो. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली.त्यांनतर शिडीने यांनी स्थानिक नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये धडक कारवाई, नागरिकांना सुरक्षा देणे आदीवर काम करण्यात आले.
त्यावेळी स्थानिक नक्षली संघटनांनी एकत्र येत शिंदे यांच्यासंदर्भात टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय झाला होता. या विषयाच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण चर्चा झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी देण्याची आवश्यकता आहे. असेही यावेळी सांगण्यात आले. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे याना सुरक्षा व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी नाकारली होती, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
शिवसैनिक दूर गेले म्हणून यात्रा - केसरकर
शिवसैनिक दूर गेले म्हणून यात्रा सुरु केल्या. आदित्य ठाकरेंबद्दल अजूनही आदर, याआधी आहे, गाठीभेटी का घेतल्या नाही. आदित्य ठाकरे तरुण नेते, त्यांनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा आम्हाला डिवचलं तर महागात पडेल शिवसैनिकांची बदनामी का करता? आम्ही आदराने बोलतो तुम्ही आदराने बोला. इतकी वर्षे महाराष्ट्रात का फिरला नाहीत, शिवसेना वाचविण्यासाठी आमचा लढा सुरु आहे. शिवसैनिकांमुळे शिवसेना ताठ उभी आमची लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आहे. एकनाथ शिंदे याना धमक्या येत होत्या, त्यांना तिथं झेड प्लेस सुरक्षा देण्याचे सांगितलं होत, तशी देण्यात आली नाही आसा आरोप सुहास कांडेंनी केला आहे. याची कल्पना शंभूराजे देसाईंना होती याची कल्पना दादा भुसेंनाही होती असेही केसरकर यावेळी म्हणाले.