(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik NMC Election : नाशिक मनपात ओबीसींच्या 36 जागांसाठी फेर आरक्षण सोडत, निवडणूक समीकरण बदलणार
Nashik NMC Election : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) हिरवा कंदील दिल्यानंतर आता नाशिक (Nashik) महापालिकेतही ओबीसींच्या 36 जागांसाठी फेर आरक्षण काढले जाणार आहे.
Nashik NMC Election : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) हिरवा कंदील दिल्यानंतर आता नाशिक (Nashik) महापालिकेतही ओबीसींच्या 36 जागांसाठी फेर आरक्षण काढले जाणार आहे. याबाबतच कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 26 जुलैला ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण निकाल दिला. आगामी निवडणुकात ओबीसींना 27 टक्के आरक्षण (OBC Political Reservation) देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता राज्यातील मनपा निवडणुकांचे नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्याप्रमाणे नाशिक मनपा निवडणुकीसाठी देखील ३६ जागांवर आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सध्या स्थित असलेल्या 104 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून 36 जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण देण्यासाठी येत्या 26 जुलै रोजी अर्थातच मंगळवारी नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे. त्यानंतर 29 जुलै रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग या दोन्ही गटातील महिलांच्या आरक्षित जागांसाठी सोडत निघणार आहे.
नाशिक मनपा (Nashik NMC) प्रशासनाने या पूर्वीच प्रारूप प्रभाग रचना, महिला आरक्षण (Women Reservation) आदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आता नव्याने महिला आरक्षणासह ओबीसींसाठीचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 26 जुलै रोजी अर्थातच मंगळवारी नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे. त्यानंतर 29 जुलै रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग या दोन्ही गटातील महिलांच्या आरक्षित जागांसाठी सोडत निघणार आहे. प्रभाग न्याय प्रारूप प्रसिद्धी व त्यावर हरकती सूचना दाखल करून अंतिम आरक्षण प्रसिद्धीची प्रक्रिया पाच ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
राज्यातील 13 महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गांमधील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यासाठी 20 जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सदस्य संख्या प्रभाग रचना व आरक्षण याबाबतच्या 28 डिसेंबर 2021 च्या आधी सुधारित केले आहेत. त्यानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे आता सर्वसाधारण महिलांची सोडत रद्द करून नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्ग महिलांची सोडत नव्याने काढली जाणार आहे. 30 जुलै रोजी प्रभागणीय आरक्षण प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत आहे. थोडक्यात अवघे चार दिवस मिळणार असून त्यातही शनिवार व रविवारची सुट्टी आहे. पाच ऑगस्ट रोजी आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.
असा आहे कार्यक्रम
दरम्यान या संदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार 26 जुलै रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व 26 जुलै रोजी सर्वसाधारण महिला यांच्याकरता आरक्षण जागा निश्चित करणे. 29 जुलै रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांच्या करता आरक्षित जागा निश्चित करणे, 30 जुलै ते 02 ऑगस्ट प्रभागणीय आरक्षण प्रारूप प्रसिद्ध करणे. तसेच प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती बाबत हरकती व सूचना दाखल करणे. 05 ऑगस्ट आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करून प्रभाग न्याय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे. सध्या नाशिक मनपा निवडणुकीत पुढीलप्रमाणे प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. खुल्या जागा 68, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 36, अनुसूचित जाती 19, अनुसूचित जमाती 10.