CM Eknath Shinde Nashik : मुख्यमंत्री नाशिक दौरा : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीस, जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त
CM Eknath Shinde Nashik : नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दौऱ्या अगोदर शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे.
CM Eknath Shinde Nashik : नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या दौऱ्या अगोदर शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. या दौऱ्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करू नये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये तसं झालं तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाशिकमध्ये शिवसेना (Nashik Shivsena) आणि शिंदे समर्थकांमध्ये या अगोदरही संघर्ष झाला. त्यामुळे पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेना बाळा कोकणे यांच्यावर हल्ला झाला होता. यामध्ये शिंदे गटाचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यामुळे नाशिक मधील राजकीय वातावरण तापलेले आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची याबाबत भेट घेतली होती. याप्रकरणी काही आरोपींना काल अटकही करण्यात आली आहे. आता हे सर्व प्रकरण ताजे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) खबरदारी घेतली जात आहे. काही कार्यकर्ते, पदाधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे आंदोलन झाले किंवा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरात मनाई आदेश लागू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक येथे कोणताही जाहीर कार्यक्रम नाही. मात्र नाशिक पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या नोटिसा बजावल्या आहेत. शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. या अगोदरच पोलिसांनी नाशिक शहरात मनाई आदेश लागू केला आहे. आता त्यांनी शिवसैनिकांना या नोटिसा दिल्या आहेत. शिंदेंच्या नाशिक दौरा वेळी शिवसैनिक पोलीस आयुक्तालावर मोर्चा काढणार होते. त्यापूर्वी शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काल शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले. त्यानंतर निलेश कोकणे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यामुळे काहीसे वातावरण निवळले असले तरी पोलिसांनी मात्र खबरदारी घेतली आहे. दौऱ्यात अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.