Kasara Ghata Accident : कसारा घाटात ट्रक उलटला, एक ठार तीन जखमी
Kasara Ghata Accident : मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) कसारा घाटात (Kasara Ghat) ट्रक दुभाजकाला आदळुन उलटल्याने एकाच मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत.
Kasara Ghata Accident : मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) कसारा घाटात (Kasara Ghat) ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकाला आदळुन उलटल्याने या अपघातात काकाचा जागीच मृत्यु तर पुतण्यासह तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग सुरक्षा पोलीस व कसारा पोलीस कर्मचारी यांनी मदत करून जखमींना कसारा ग्रामीण रुग्णालयात (Kasara Rural Hospital) दाखल केले.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईहून (Mumbai) नाशिकच्या (Nashik) दिशेने जात असताना कसारा बायपास साईबाबा खिंडी जवळ ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रक उलटून दोन जण ट्रकच्या खाली दबले गेले. या अपघाताची माहिती समजताच कसारा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. दरम्यान रस्त्यावर उलटलेल्या ट्रक खाली एक जण दबल्याचे दिसताच त्यांनी कसारा येथील आपत्ती टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना मदत करण्याची विनंती केली.
आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, जस्विंदर सिंग, बाळू मंगे, देवा वाघ, बबन सोनवणे, दत्ता वाताडे, मनोज मोरे, विनोद आयरे, बिरु ठाकुर यांनी घटनास्थळी दाखल होत जखमीपैकी एक जण ट्रकच्या खाली अडकलेला होता. त्याला आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी मयत व गंभीर जखमींना तीन तास अथक प्रयत्न करून क्रेनच्या मदतीने सुखरूप काढले. यात जागीच ठार झालेल्या अडकलेल्या ट्रक चालकासही बाहेर काढले. ट्रक मधील सर्व जण मुंबईहुन सिन्नरला जात होते.
यावेळी गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहीका, 1033 रुग्णवाहीकेच्या मदतीने कसारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातात ट्रकचालक आनंद त्रिभुवन जागीच ठार झाले तर अमोल गायकवाड, संतोष शेलार, अण्णासाहेब त्रिभुवन हे गंभीर जखमी झाले होते. मयत अमोल त्रिभुवन याचा पुतण्या अण्णासाहेब त्रिभुवन याला तीन तास अथक प्रयत्न करून बाहेर काढल्याने त्याचेही प्राण वाचले. या मोहीमेत कसारा पोलीस, टोल पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस ट्राफिक मदतीला होते.
कसारा घाट अपघाताला आमंत्रण
सध्या पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर पाणी, माती वाहून येत असून रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहने घसरण्याची शकयता अधिक असते. तसेच कसारा घाटात नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.