एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nana Patole : 'कोरोनात ताट वाजवायला लावल्याने, देशात अवदसा आली, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खळबळजनक टीका 

Nana Patole : कोरोनासाठी (Corona) सगळ्यांना ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. 

Nana Patole : कोरोना (Coroan) काळात परिस्थिती बाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या (Central Goverment) चुकीमुळे मृत्यू जास्त झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणूकित व्यस्त होते. देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या नाहीत, गुजरातमध्ये (Gujrat) गर्दी गोळा करण्यात आली. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली, अशी खळबळजनक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज नाशिकमध्ये (Nashik) होते. त्यावेळी काँग्रेस मेळाव्यात त्यांनी एकला चलो रेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस (Congress) असा पक्ष आहे, त्या पक्षात निवडणुकीने अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेसमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होते त्यातून सगळ्यांना जावं लागत. पक्षांतर निवडणुका होतात. कधी बिनविरोध होतात तर कधी निवडणूक प्रक्रिया होते, त्यातून सगळ्यांना जावं लागते. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना असून कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य घटक असल्याने काँग्रेसची देखील हीच भूमिका असल्याचे पटोले म्हणाले. 

कोरोना जाणून बुजून देशात आणला. कोरोना काळात परिस्थिती बाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या चुकीमुळे मृत्यू जास्त झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणूकित व्यस्त होते. देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या नाहीत, गुजरात मध्ये गर्दी गोळा करण्यात आली. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली. मोठं संकट आपल्यावर आले आहे. कोरोना काळात पैसा नव्हता पण भगवान श्री रामाच्या नावाने पाच दहा हजाराच्या वर्गणी गोळा केल्या गेल्या. कुठल्याही गोष्टीची वेळ काळ असते, सध्या पितृपक्ष सुरू आहे, योग्य वेळी रामजन्मभूमीवर जाऊ. मी अयोध्येला जाणार आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार असून गोळा केलेले पैसे कुठे गेले  असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. 

आमच्याकडे महिलांची मोठीच ताकद असून ओबीसी भटक्या विमुक्तांना त्रास देणाऱ्यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. मिडीयाचे आमच्यावर अधिक प्रेम आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील 50 गावात लाईट होती. 60 वर्षात काँग्रेसने सगळ्या सुविधा कानाकोपऱ्यत पसरवल्या. शेतीमध्ये क्रांती काँग्रेसमुळे आली. मोदी ओबीसीचे असते, बहुजनाचे असते तर शेतकऱ्यांविरोधी कायदे आणले नसते. नोटबंदी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, भाजप वाल्यांनी खूप जमिनी घेतल्या. भाजप म्हणजे चोळा मोळा कपडे आणि दुसरीकडे जाऊन जेवायचे पण नोटबंदीनंतर एवढा पैसा यांच्याकडे कुठून आला, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. 

बिर्याणी चालते का?
दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. आशिष शेलार मुस्लिम समाजावर टीका करतात. मात्र मुस्लीम समाजाची बिर्याणी यांना आवडते. याकूबचा भाऊ शेलारला बिर्याणीला चारतोय असा फोटोही व्हायरल होतो आहे. एकूणच हिंदू मुस्लिम मध्ये वाद वाढवला जात असून राज्यपाल तर अतिविद्वान आहेत, फडणवीसचाही गोल टोपी सोबत फोटो असल्याचे ते म्हणाले. ओबीसी हा समाज सत्ता परिवर्तन करू शकतो. तुमचे अधिकार काढण्यात आले, बरबाद करण्यात आलं. समान नागरी कायदा म्हणजे तुलाही नाही आणि मलाही नाही. मुफ्तीवर पाकिस्तानशी संबंध असल्याचे आरोप केले आणि त्यांच्या सोबत सरकार स्थापन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget