Chhagan Bhujbal : सरस्वती विषयाच राजकारण का केलं जातंय? मी देखील हिंदूच, भुजबळांच स्पष्टीकरण
Chhagan Bhujbal : शाळेतल्या पहिल्या दिवसापासून आपण फुले, शाहू, आंबेडकर, सयाजीराव गायकवाड बाजूला ठेवून जे करतो आहोत ते योग्य नसल्याचे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
Chhagan Bhujbal : आमचे देव हेच आहेत, छत्रपती शिवाजी महाराज (Chatrpati Shivaji Maharaj), सावित्रीबाई फुले (Savitrabi Fule), फातिमाबी शेख, फुले शाहू आंबेडकर (Dr. Ambedakar) यांची पूजा व्हायला हवी. शाळेतल्या पहिल्या दिवसापासून आपण फुले, शाहू, आंबेडकर, सयाजीराव गायकवाड बाजूला ठेवून जे करतो आहोत ते योग्य नसल्याचे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. मी देखील हिंदूच आहे, आमच्या घरातही सण साजरे केले जातात. मग सरस्वती विषयाचं राजकारण का केलं जात आहे? असा सवाल यावेळी भुजबळांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून छगन भुजबळ यांनी मुंबईत (Mumbai) सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्यावर नाशिकमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले कि, सरस्वतीचा फोटो काढण्यासंदर्भात बोललो नाही तर सरस्वती ऐवजी थोर महापुरुषांना पुजले पाहिजे, हे म्हणालो. आपण शाळेत सरस्वतीची पूजा वगैरे करतो, मग आपल्याला ज्यांनी प्रत्यक्षात शिकवलं. असे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाईं, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा बी शेख यांचे फोटोंना का पुजले जात नाही? असा सवाल यावेळी भुजबळांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले या महापुरुषांनी समाजासाठी खस्ता खाल्ल्या. शिक्षणाची दारे खुली केली. ते शिक्षण आपल्याला ते देत असताना यांना प्रचंड प्रमाणामध्ये विरोध सहन करावा लागला, दगड, धोंडे, शेणाचा मारा या लोकांनी खाल्ला. मग शिक्षणासाठी झटणाऱ्या थोर पुरुषांची पूजा का नाही? फुले शाहूंनी प्रत्यक्ष आम्हाला शिकवलं, त्यांनी आपल्याला शिक्षण देण्याचा कार्यक्रम केला. त्यांची आपण पूजा का करत नाही. पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरु केल्यानांत फक्त सहा मुली होत्या. मग ज्याने आपल्याला शिक्षण दिलं, हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता, मात्र हा राजकीय विषय बनवला जातो, अशी भूमिका यावेळी भुजबळांनी व्यक्त केली.
आमच्याही घरात सण साजरे होतात...
मी देखील हिंदू आहे, मी खंडोबा, भवानी माता, सप्तशृंगी आदींचे ठिकाणी दर्शनाला जातो. घटस्थापना, इतर सण उत्सव करतो. नाशिकमधील अनेक मंदिराचे काम केले आहे. सप्तशृंगीचे फर्नाक्युलर ट्रॉली केली, त्र्यंबकेश्वरचा रस्ता केला, अनेक ठिकाणी मंदिरे उभारली आहे. त्यामुळे सरस्वती विषयाचं राजकारण करणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, फुले शाहू आंबेडकर हे आमचे देव हेच आहेत, यांची पूजा व्हायला हवी. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये फुले शाहू आंबेडकरांची शिकवण असल्याचे भुजबळ म्हणाले.