एक्स्प्लोर

Nashik Hindu Morcha : 35 गुण जुळतील म्हणून ती त्याच्यासोबत गेली, पण... नाशिकमध्ये हजारोंचा विराट मूक मोर्चा

Nashik Hindu Morcha : आपल्या आयुष्यात एखादा आफताब येऊन आपली श्रद्धा होईल एवढं प्रेमाच्या आहारी जाण योग्य नाही.

Nashik Hindu Morcha : नाशिकमध्ये आज लव्ह जिहादविरोधात हिंदू संघटनाकडून विराट मूक मोर्चा काढण्यात आला असून धर्मातर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा अशी मागणी हिंदू संघटनाकडून करण्यात आली आहे. तसंच श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी आफताबला फासावर लटकवण्याची, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर आणि पक्षावर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्ष, संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी शहरातील बी डी भालेकर मैदानातून हजारोंच्या संख्येने जमलेला जन समुदायाच्या माध्यमातून मोर्चाला सुरवात झाली आहे. बि.डी.भालेकर स्कुल मैदान, शालीमार चौक, सारडा कन्या विद्यालय, गाडगे महाराज पुतळा, रवीवार कारंजा, यशंवत व्यायाम शाळा, मेहेर सिग्नल, शिवतीर्थावर या मोर्चाचा समारोप होणार आहे. सद्यस्थितीत बीडी भालेकर मैदानावर प्रचंड गर्दी झाली असून मोर्चाला सुरवात झाली आहे. 

आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हीचे 35 तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीडी भालेकर मैदानात प्रचंड संख्येने महिलांसह पदाधिकारी मोर्चाचं सहभागी झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. यामध्ये '36 गुण जुळतील म्हणून ती त्याच्यासोबत गेली, पण जाता जाता स्वतःच्या आयुष्याचे 36 तुकडे करून गेली, आपल्या आयुष्यात एखादा आफताब येऊन आपली श्रद्धा होईल एवढं प्रेमाच्या आहारी जाण योग्य नाही', अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात दिसत आहेत. विराट हिंदू मूक मोर्चाच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागण्या सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चादरम्यान करण्यात आल्या आहेत.

मोर्चा मार्गात पोलिसांचा बंदोबस्त 
दरम्यान जिल्हा निहाय मोर्चा निघत असून बिडी भालेकर मैदानापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यामध्ये शहरासह जिल्हाभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभाग असल्याने शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?
राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
Nashik Manisha Jejurkar Case: मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Drought: डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव
डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Embed widget