एक्स्प्लोर

Vikhe Patil : उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, मंत्री विखे पाटलांचा घणाघात 

Vikhe Patil : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा घणाघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

Vikhe Patil : सध्या ठाकरे गटाकडून (Shivsena) ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि भाजपच्या (BJP) कमळ चिन्हावर मुरजी पटेल (Murji Patel) हे दोघे निवडणूक रिंगणात आहेत, मात्र निर्णय साफ आहे. शिवाय निवडणूक हारले तरी लटके यांचा उद्धार सरकारने कशाला करावा, त्यांचा काय उद्धार करायचा तो उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) करतील. सत्तेचा गैरवापर कोणी केला, हे मागे वळून बघा लक्षात येईल, सध्यातरी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा घणाघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याचे गरज असल्याचे सांगितले. मंत्री विखे पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर असून आढावा घेणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात परतीच्या पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार अनेक ठिकाणी अजूनही शेतात पाणी असून अधिक मदत करण्याचा आपला प्रयत्न असून आज जवळपास संपूर्ण पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर ताशेरे ओढेले. ते म्हणाले, ठाकरे गटाने जे राजकारण चालू आहे, त्याबाबत विचार करण्याची गरज आहे. आपण कोणत्या लोकांसोबत हातमिळवणी केली आहे. औरंगजेब च्या कबरीवर फुल वाहणाऱ्याचा सत्कार होतो, हे चुकीचं आहे. ठाकरे म्हणत आहेत कि, आम्ही सत्तेचा गैरवापर करत आहोत, मात्र सत्तेचा गैरवापर कोणी केला याचा त्यांनी आत्मपरिक्षण करावं. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. 

तसेच राज्यात वाळू माफियांचा उच्छाद मांडला असून वाळू माफियांना राजकीय आश्रय मिळाल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. वाळूच्या बाबतीत आंध्र, गुजरात, तेलंगणा मध्ये घेतलेले निर्णय चांगले. त्या धर्तीवर करता येईल का हे बघावं लागेल. पर्यावरण अनुपालन असल्या शिवाय यापुढे परवानगी नाही. तसेच वाळूच्या आणि खानपट्ट्याबाबत कडक अमलबजावणी होणार असल्याचेही ते म्हणाले. अवैध वाळू उत्खननासंदर्भात राज्य सरकार येत्या 21 तारखेच्या बैठकीत धोरण ठरवणार असून येत्या 21 तारखेच्या अधिकारी मंत्री यांच्यां बैठकीत निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडे गुंठे वारीच्या नावाखाली गुंड पाळण्याचे प्रकार सुरु असून कायद्याच्या चौकटीत सगळं आणावं लागेल, असेही ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaGateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वरABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Embed widget