एक्स्प्लोर

Nashik News : त्र्यंबकच्या हरिहर गडावर पर्यटकांची तोबा गर्दी, पाय ठेवायला जागाच नाही ! 

Nashik News :  नाशिकमधील (Nashik) प्रसिद्ध असलेल्या हरिहर गडावर (Harihar Fort) रविवारी सुट्टीच्या दिवशी गिर्यारोहक व पर्यटकांनी (Tourist) तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या हरिहर गडावर रविवारी सुट्टीच्या दिवशी गिर्यारोहक व पर्यटकांनी तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांना परतून यावे लागले सर्व अनेकांना असा जीवघेणा प्रवास नको असल्याचे सांगितले.  

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर व  हौशी पर्यटकांची पाऊले हळहळू त्र्यंबकेश्वर, हरिहर गडाकडे वळू लागली आहेत. पहिल्या पावसांनंतरच्या रविवारी सुट्टीनिमित्त हजारो पर्यटकांनी हरिहर गडावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अतिशय अवघड चढण असलेल्या हरिहर गडावर पर्यटकांचा जीव धोक्यात घातल्याचे गर्दीवरून लक्षात येते. 

दरम्यान यावेळी दुपारनंतर आलेल्या पर्यटकांनी गर्दी पाहून हरिहर गडाच्या मध्यावरूनच माघार घेत परतीच्या वाटेल लागले. तर काही पर्यटक गाड्या पार्क करून हरिहर गडावर निघणार तोच त्यांनी तोबा गर्दी पाहून हरिहर गडाचा बेत रद्द केल्याचे अनेकांनी सांगितले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर आता सर्व शिथिल झाले असून आतापासूनच पर्यटक गड किल्ल्यांवर गर्दी करू लागले आहेत. मात्र या पर्यटकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असून अनेकांच्या जीवाला धोकाही या माध्यमातून पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने सुरवात केली असली तरी अद्यापही तालुका जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जुलै -ऑगस्टच्या सुमारास त्र्यंबक परिसर हिरवा झालेला दिसून येतो. धबधबे वाहू लागतात. आणि हेच पर्यटकांना आकर्षित करत असते. मात्र यंदा पहिल्या पावसांनंतर पर्यटकांनी त्र्यंबककडे येण्यास सुरवात केली आहे. त्यातच दुर्लक्षित असलेला मात्र अलीकडच्या वर्षात सर्व परिचित झालेल्या हरिहर गडावर मात्र पर्यटक तोबा गर्दी करताना दिसून येतात. त्याचाच प्रयत्य कालच्या रविवारी आला. 

पर्यटकांचा उत्साहीपणा 
रविवारच्या सुट्टीनिमित्त हरिहर गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांनी तोबा गर्दी केली. यावेळी अवघड वाट असलेल्या, निमुळत्या टोकावरही पर्यटक उभे असल्याचे दिसून आले. तर चढणीच्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नसल्याचे दिसून आले. अशा पद्धतीचा पर्यटकांचा उत्साहीपणा घातक ठरू शकतो. म्हणून पर्यटनाच्या सर्वच ठिकाणी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त ठेवून मागील वर्षीप्रमाणे थेट गुणेच दाखल करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. 

मागील वर्षांची पुनरावृत्ती 
कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यात विकेंड लाॅकडाऊन सुरु होते. यावेळी अनेक पर्यटक ट्रेकींगसाठी घराबाहेर पडत हरिहर गड तोबा गर्दी केली होती. बेसुमार गर्दी झाल्याने वनविभागाने देखील पर्यटकांना फटकारले. त्यानंतर अनेक पर्यटकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवाय काही काळासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवादABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
Embed widget