Nashik Pre Wedding : विवाह सोहळ्याआधी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Photo) ही आजकाल फॅशन झाली आहे. लग्न सराईचे दिवस सुरू झाले असून लग्नाआधीच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी प्री-वेडिंग शूट केले जाते. नाशिक (Nashik) शहरातील अनेक पर्यटनस्थळे आहेत, ज्या ठिकाणी प्री वेडिंग फोटोग्राफीसाठी नवरा नवरीकडून पसंती दिली जात आहे.  


लग्नापूर्वी प्री वेडिंग शूट झालेच पाहिजे, हे प्री वेडिंग फोटोशूट केल्याशिवाय जणू लग्नच पूर्ण होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेटवर, तुम्ही अनेकदा जंगलात, समुद्र काठी, कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूट केले जाते. लग्नसोहळा म्हटलं कि पाहुण्यांची गर्दी, लग्नाची गडबड अशा या गडबडीचा काळात नवरा- नवरीला फारसा वेळ मिळत नाही. म्हणूनच हल्ली प्री वेडिंग फोटो शूट केले जाते. लग्नापुर्वीच्या आठवणी कैमऱ्यात कैद केल्या जातात. त्यामुळे लग्न जमल्यानंतर पहिल्या भेटीपासूनचा ते लग्न होईंपर्यतचा प्रवास प्री वेडिंगद्वारे जपून ठेवला जातो. 


गंगापूर डॅम 


नाशिक शहराला पाणी पुरवणाऱ्या गंगापुर धरणाचा परिसर उत्तम ठिकाण आहे. हा परिसर हा नयनरम्य असल्याने फोटोही उत्तम येऊ शकतात. परिसरात असणारी हिरवळ नवरा नवरीच्या फोटोला अधिक खुलवत असते. 


तपोवन


नाशिक शहरातील तपोवन परिसर हा धार्मिक स्थळ म्हणून तसेच पर्यटनस्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळात कपिला गोदावरी संगमावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र पर्यटनस्थळांवर सायंकाळचा सूर्यास्त फारच खुलून दिसत असल्याने अनेकदा फोटो फारच कमालीचे येतात. त्यामुळे हा देखील हटके पॉंईट आहे. 


गोदापार्क 


तरुणाईसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच बापू पूल किंवा गोदापार्क परिसर होय. एखाद्या नदीकिनारी आणि बागेच्या ठिकाणी जर गोदापार्क आणि बापू फूल उत्तमच आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या फ्रेममध्ये फोटो काढायला मिळतील. पण याठिकाणी दिवसभर फार गर्दी असते. त्यामुळे सकाळी लवकर जाऊन फोटो शूट केलेत तर उत्तम होईल.


पांडवलेणी 


नाशिक शहरासह राज्य आणि भारतभरातून पर्यटक पांडवलेणीला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे वर्षभर या पर्यटनस्थळी गर्दी असते. हे ठिकाण म्हणजे इ. स. पू. 19 व्या शतकात खोदलेल्या बौद्ध लेणी आहेत. या ठिकाणी प्राचीन लेणी व तसेच बुद्धविहार असून येथे शांत जागा असल्याने येथे तुम्हाला चांगली फोटोग्राफी करता येईल. अनेकदा प्री-वेडिंग शूटसाठी जोडपे पांडवलेणीचा पर्याय निवडतात.


सुला विनियार्डस


नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख देणारे सुला विनियार्डस हे देखील हटके डेस्टिनेशन आहे. नाशिकच्या तरुणांचे आवडीचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असल्याने शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आल्याचा फील येतो. त्यामुळे निसर्ग, सनसेट पॉईंट आदींमुळे फोटोग्राफीला चार चांद लागतात. 


सोमेश्वर 


सोमेश्वर हे नाशिक शहरापासून अवघ्या 10  मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण, प्राचीन मंदिर, धबधबा, गोदावरीचा नदीकाठ, सोमेश्वर मंदिर अशी सुंदर ठिकाण या परिसरात आहेत. त्यामुळे प्री-वेडिंग शूटसाठी सोमेश्वर उत्तम आहे. शहराच्या जवळ असल्याने वेळही वाचेल, शिवाय एकही पैसे खर्च न करता फोटोशूट करता येणार आहे. कारण परिसरात ऐतिहासिक वास्तू असल्याने फोटोग्राफी उत्तम होते.