Nashik Chitra Wagh : मागील सहा दिवसांपूर्वी सिन्नर (Sinner) परिसरात एका महिलेला महिनाभर घरात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत सदर महिलेला न्याय मिळवून देणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या घटनेशी संबंधित काही मोठे रॅकेट असण्याची शक्यता लक्षात घेऊन गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देऊन चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले.


काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) सिन्नर येथील महिलेच्या कौटुंबिक असहाय्यतेचा फायदा घेत तिला धर्मांतराचे आमिष दाखवत महिनाभर घरात कोंडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फादरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचबरोबर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला होते. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिकमध्ये आल्या असता त्यांनी सदर महिलेला सोबत घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, समाज विघातक प्रकृती, घटनांना सरकारमध्ये थारा नाही. आम्ही अशा घटना खपवून घेणार नाही..सेनापती बदलला की सैन्यात बदल होतो..त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात गृह खात्यात बदल झाला असून कुणीही पीडित, पीडिता पोलीस ठाण्यात आल्यास तक्रार नक्कीच घेतली जाईल, असे असावं यावेळी वाघ यांनी दिले. 


चित्रा वाघ पुढे म्हणाल्या कि, ही महिला गेल्या दीड वर्षापासून नाशिक ग्रामीण विभागात कामाच्या शोधासाठी आली होती. काम शोधायला जात असताना दोन महिलांनी तिला एका ठिकाणी घेऊन गेले. काही लोकं आले. तिथल्या लोकल चर्चच्या फादरने लाल द्रव पदार्थ प्यायला लावला. तिच्यावर अत्याचार देखील झाला. तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. जवळपास एक महिना ती महिला त्या ठिकाणी कोंडून होती. तिचा नवरा तिला शोधत होता. हा फार मोठा विषय असून एक तर जबरदस्तीने धर्मांतर आणि अत्याचार करण्यात आला. या महिलेची विक्री करण्याचा देखील विषय झाला. त्यानंतर ही महिला आणि तिचा नवरा पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून तातडीने आरोपींना ताब्यात घेतले. तीन महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथे मिशनरी यांची अनधिकृत शाळा होती. या सर्व अनधिकृत गोष्टींची चौकशी करून, कारवाई व्हावी मानवी तस्करी हा महत्त्वाचा विषय आहे. 


तसेच अगोदर किती महिला आणि मुलींसोबत असे प्रकार झाले, हे पाहणे महत्वाचे ठरणा असून याची चौकशी व्हावी. मुलीची समोर येण्याची इच्छा होती, म्हणून मी तिला घेऊन आले आहे. कुठलाही धर्म असं शिकवत नाही, असंही वाघ यांनी सांगितले. सगळ्या धर्मांचा आम्हाला आदर आहे. राजकीय लोकांनी अशा पीडितांना भेटलं पाहिजे, समजावून घेतले पाहिजे, गृहमंत्री आमचे आहे. आम्हाला विश्वास आहे की, नक्कीच असं काही रॅकेट असेल तर उद्ध्वस्त होईल, धर्माच्या नावाखाली जे भोंदूगिरी करतात, त्यांना चाप बसायला हवा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गृहखात्यात बदल झाला. कुणीही पीडित, पीडिता पोलीस ठाण्यात आल्यास तक्रार नक्कीच घेतली जाईल. महिला आयोग कमी पडतं की नाही, यासाठी प्रमाणपत्र द्यायला बसले नाही, असेही त्यांनी सांगितले. 


राज्यपाल राज्यातील लोकांसाठी उपलब्ध होते... 


भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतःच पत्र लिहिलं होतं की, मला राजीनामा द्यायचा आहे..ती एक प्रोसेस असते..त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे..पहिल्यांदाच राज्यपाल हे राज्यातील लोकांसाठी उपलब्ध होते..राज्यपाल यांनी ज्या ज्या भूमिका मांडल्या, त्या त्या भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्या आहे. तत्कालीन सरकारने त्यांचा अपमान केला होता. त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही, असंही चित्रा वाघ यांनी म्हटले. लोकांसाठी काम करणं, याचं समाधान कोणत्याही पदात नाही, असेही त्यांनी म्हटले.