Nashik Neo Metro : नाशिककरांची (Nashik) निओ मेट्रो लवकरच रस्त्यांवर धावणार असून काही दिवसांत मेट्रो निओच्या (Neo Metro) प्रस्तावाचे पुढील आठवड्यात केंद्राकडे सादरीकरण केले जाणार असून, 100 टक्के मेक इन इंडिया असलेल्या या प्रकल्पाबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय जाहीर केला जाईल, असे दिलासादायक आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी दिले. त्यामुळे नाशिककरांचे निओ मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाण्याचे चित्र आहे. 


भाजपच्या प्रदेश (BJP Meet) कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोपप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना महत्वाचा असणाऱ्या निओ मेट्रो प्रकल्पबाबत महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले कि, 2019 मध्ये मुख्यमंत्री असताना नाशिकसाठी देशातील पहिली टायरबेस 'मेट्रोनिओ'ची घोषणा केली होती. यासाठी महारेल आणि सिडकोच्या माध्यमातून सर्वेक्षण करून मेट्रोनिओची दोन टप्प्यांतील मार्गिका स्थानके, शेडसाठीची जागाही निश्चित करण्यात आली होती. 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोनिओसाठी तरतूदही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नाशिकच्या या मेट्रो प्रकल्पाला खीळ बसली. 


दरम्यान नाशिकच्या निओ मेट्रोला कोणतीच अडचण नसून लवकरच नाशिकच्या रस्त्यावर निओ मेट्रो धावताना दिसणार आहे. फडणवीस म्हणाले, की देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. आपल्या देशात पारंपरिक आणि कन्व्हर्टेबल अशा दोनच प्रकारच्या मेट्रो असाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे सदर निओ मेट्रो बाबतचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार असून त्यावर निर्णय झाल्यानंतर तातडीने कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकांपूर्वी मेट्रो निओचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. 


लवकरच केंद्राकडे सादरीकरण


नाशिकच्या मेट्रोनिओचा प्रस्ताव केंद्राकडे सादर झाला, तेव्हा देशाच्या अन्यही भागातून नॅनो मेट्रोसह अन्य प्रस्ताव सादर झाले होते. त्यामुळे पंतप्रधानांनी सर्व प्रस्तावांचा अभ्यास करून देशभरासाठी एकच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व देशभरात त्यानुसार मेट्रो प्रकल्प उभारला जाईल. हा प्रकल्प मेक इन इंडिया असला पाहिजे. त्यामुळे नाशिकच्या मेट्रोबाबत पुढील आठवड्यात केंद्राकडे सादरीकरण केले जाणार असून, हा शंभर टक्के मेक इन इंडिया असलेला कन्व्हर्टेबल मेट्रोचा प्रस्ताव असेल. सादरीकरणानंतर महिना-दोन महिन्यांत निर्णय होईल. नाशिकची मेट्रो सुरू होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.


पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प


लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये आता वंदे भारत रेल्वे तयार होणार आहेत. महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकाचा कायाकल्प होणार आहे. महाराष्ट्राला रेल्वेचा मोठा निधी यावर्षी मिळाला आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा लाभ होईल. हा मार्ग एक नवा आर्थिक कॉरिडॉर असेल. नाशिकमध्ये नियो मेट्रो सुद्धा होणार आहे. लवकरच हा निर्णय सुद्धा झालेला दिसेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.