एक्स्प्लोर

Nashik Crime : 'अंगठा द्यायचाय, शाईपॅड आणा,' असं सांगितलं, अन् भामट्याने बँकेतून दोन लाखांची रोकड पळवली! 

Nashik Crime : बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून नाशिकच्या बँक ऑफ बडोदा शाखेतून दोन लाख रुपये हातोहात पळविल्याची घटना घडली आहे. 

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील जेलरोड भागातील बँक ऑफ बडोद्याच्या (Bank Of Badoda) शाखेत एका भामट्याने आई आणि मुलाची फसवणूक करुन दोन लाखांची रोकड घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. बोलण्यात गुंतवत तसेच बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून बँक ऑफ बडोदा शाखेतून दोन लाख रुपये हातोहात पळवल्याची घटना घडली आहे. 

नाशिकच्या जेलरोड (Jailroad) परिसरात राहणारे अंकुर लाटे हे त्यांची आई लिलाबाई सोमनाथ लाटे यांच्यासोबत गुरुवारी (15 जून) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बँकेत गेले होते. नाशिक पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway)  जुना आशीर्वाद बस थांब्याजवळील बँक ऑफ बडोदा शाखेत दोन लाखांची रक्कम भरण्यासाठी गेले होते. अंकुरने दोन लाखांची रोकड बँकेच्या कॅशियरसमोर काउंटरवर ठेवली. त्याचवेळी बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत आलेल्या एका इसमाने अंकुरला थम्बपॅड आणण्यास सांगताच अंकुर बाजूला गेला आणि हिच संधी साधत अज्ञात व्यक्तीने कॅशियरसमोर ठेवलेली रोख रक्कम लंपास करत बँकेतून पळ काढला. 

दरम्यान काही मिनिटात अंकुश परत येताच बँकेच्या कॅशियरने पैसे मोजण्यासाठी घेतले असावे, असा त्याचा समज झाला, मात्र कॅशियरने रक्कम घेतली नसल्याचे सांगितले यावरुन बँकेत एकच खळबळ उडाली. आई आणि मुलाने बँकेच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर असा कोणताही कर्मचारी बँकेत कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लाटे मायलेकांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोरीची ही संपूर्ण घटना उघडकीस आली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

पोलिसांत गुन्हा दाखल

जेलरोड, शिवरामनगर येथे राहणाऱ्या वयोवृद्ध लिलाबाई सोमनाथ लाटे व त्यांचा मुलगा अंकुर हे गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बँक ऑफ बडोदाच्या शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने दोघांना बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन एटीएममध्ये पैसे भरण्यास जात असल्याचे सांगत त्यांच्याजवळील रोकड भरणा करण्याची स्लिप आणि दोन लाखांची रोकड घेतली. दोन लाखांची रक्कम व पावती कॅश काऊंटरकडे ठेवली. पावती घेऊन आजीचा अंगठा बाकी आहे, असे सांगून मुलाला शाईचे पॅड आणायला लावले. अंकुर पॅड आणायला गेला असताना भामट्याने दोन लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. मुलगा अंकुर शाई पॅड घेऊन आईकडे आला, तेव्हा त्याला बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करणारा व्यक्ती बँकेत दिसून आला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget