एक्स्प्लोर

Satyajit Tambe : राज्यातलं असं एकही गाव नाही, जिथं काँग्रेस पक्षाचं काम केलं नाही, सत्यजीत तांबे म्हणाले... 

Nashik Satyajit Tambe : राजकारण किती असतं, हे मागच्या चार-पाच दिवसात पाहिलेच आहे,, सत्यजीत तांबे म्हणाले... 

Nashik Satyajit Tambe : राज्यातील असा एकही तालुका, असे एकही गाव नाही की जिथे काँग्रेस (Congress) पक्षाचे संघटनेचे काम केलेलं नाही, परंतु राजकारण असतं किती घाण असतं, हे मागच्या चार-पाच दिवसात आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेच आहे, खूप राजकारण झालंय, आता त्या विषयावर योग्य वेळी योग्य रीतीने बोलूच, अशा शब्दात स्पष्ट भूमिका सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिकच्या शिक्षक भारतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मांडली. 

दरम्यान आज नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर मतदारसंघात महत्वाची घडामोड घडली असून शिक्षक भारती संघटनेने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा कपिल पाटील यांनी नुकतीच शिक्षक व भारती व जनता युनायटेड दलाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे. यावेळी सत्यजीत तांबे हे बोलत होते. यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले कि, सर्वप्रथम कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यासह शिक्षण भारती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. शिक्षक भारती संघटनेने अशा वेळेस मदत केली आहे की ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं. अशा वेळेस आमच्या मदतीला धावून येण्याचं काम कपिल पाटील यांच्यासह संघटनेने केले आहे. 

सत्यजीत  तांबे यावेळी म्हणाले ईकी, अशा काळात आम्ही आपल्या संघटनेने दिलेल्या विश्वासाला विसरू शकणार नाही. निश्चित खात्री आहे की आपल्या अपेक्षांना पूर्ण करेल. गेले 22 वर्ष संघटनेच्या माध्यमातून या राज्यात आणि देशात काम करतो आहे. काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेमधून कामाला सुरुवात केली. पुढे दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये काम केलं. युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष म्हणून चार वर्ष काम केलं. असंच या देशातील एकही राज्य नाही की जिथं काँग्रेस पक्षाचे संघटनेचे काम केले नाही. या राज्यातील असा एकही तालुका, असे एकही गाव नाही की जिथे काँग्रेस पक्षाचे संघटनेचे काम केलेलं नाही, मागच्या माझ्या 22 वर्षाच्या राजकीय कालखंडामध्ये केलेल्या अनेक सामाजिक राजकीय संस्थांवर संघटनांवर देखील मी काम करतो आहे, असल्याचे सांगत एकप्रकारे काँग्रेसवर निशाणा साधला. 

खूप राजकारण झालंय, आता त्या... 

तसेच ते पुढे म्हणाले, कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होतं कि, सत्यजीत तांबे यांच्यासाठी विधानसभेचा मतदार संघ शोधत होते. अनेक वेळा आमची चर्चा व्हायची, ते म्हणायचे तू इथून उभं राहण्याचा प्रयत्न कर, तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर, परंतु राजकारण किती असतं, हे मागच्या चार-पाच दिवसात आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेच आहे, खूप राजकारण झालंय, आता त्या विषयावर योग्य वेळी योग्य रीतीने बोलूच. आता सध्या आपण राजकारणावर बोलणार नाही, परंतु मागच्या पंधरा-सोळा वर्षाच्या कालखंडामध्ये वडील डॉ. सुधीर तांबे यांनी या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या प्रतिनिधित्व करण्याच्या निमित्ताने जे समाजातील सर्व पदवीधर घटकांसाठी काम केलेलं आहे. विशेष करून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांचे प्रश्न असतील तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, विनाअनुदानित, अनुदानित असेल, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, खाजगी संस्था असतील, दिव्यांग विद्यार्थ्यांचे संस्था असतील अशा सर्व समुदायास सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कपिल पाटील म्हणाले... 

कपिल पाटील म्हणाले की,  सत्यजीत  तांबे यांच्या उमेदवारीसाठी स्वतःच सुधीर तांबे यांच्याशी बोललो होतो, मागे लागलो होतो. नाशिक मतदारसंघात सत्यजीत निवडून यावा म्हणून मी अनेकांशी बोललो होतो. मात्र त्यांच्या पक्षांतर्गत काही घोळ झाला असेल, पण ते मैदानात आहेत, अपक्ष आहेत, आमच्या शिक्षक संघटनेने पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे. एकतर सत्यजीत आणि सुधीर तांबे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले, ही दुःखद गोष्ट, तांबे कुटुंबाचा इतिहास माहीत आहे. पुरोगामी विचारांचे आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. तर भाजपने पाठिंबा दिला तर? यावर ते म्हणाले, जर तरच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही, सत्यजीत तांबे हे नक्कीच विजयी होतील यात शंका नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 09 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Embed widget