Nashik : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण, दीड लाख रुपये लुटले, नाशिकमधील घटना
Nashik Crime : पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने संशयितांनी दरोडा घातल्याची घटना घडली.
Nashik Crime : नाशिक (Nashik) जवळील ओढा गावातील औरंगाबाद रोडवरील पेट्रोल पंपावरील (Petrol Pump Robbery) कर्मचाऱ्याना मारहाण करण्यात येऊन दरोडा टाकल्याची घटना घडली. यातील तिन्ही संशयिताना अवघ्या चार तासांत पोलिसानी अटक केली आहे. पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने संशयितांनी दीड लाख रुपये लुटून नेले होते. मात्र पोलिसानी शिताफीने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक-औरंगाबाद (Nashik Aurangabad Road) रोडवरील ओढा येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून दीड लाख रुपये लुटणाऱ्या तीन संशयितांपैकी दोन चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या चार तासांत शहापूर येथून पकडले आहे. या लुटीच्या (Robbery) घटनेत एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्यासह पोलीस हवालदाराच्या मुलाचाही सहभाग असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित गणपत ढिकले, अनिकेत बाळासाहेब रसाळ व सचिन शरद गोडसे या तिघा संशयितांना पोलिसांनी अशी अटकेतील तिघांची नावे असून, गोडसे हा पेट्रोल पंपावरील कर्मचारीच असून, दुसरा अभिजीत ढिकले हा पोलिस हवालदाराचा मुलगा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून संशयितांचा माग काढला, तसेच त्यांचे मोबाइल नंबर मिळवून त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ढिकले व रसाळ याला शहापूरमार्गे कल्याणकडे जात पोलिस उपनिरीक्षक असताना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून 1 लाख 42 हजारांची रक्कम व 75 हजारांची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला असून, तर गुन्ह्यातील तिसरा संशयित गोडसे याला सकाळी ओढा येथून पकडण्यात आले
दरम्यान संशयित दरोडा टाकून पल्ल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले होते. तसेच औरंगाबाद रोडवरील एकाने संशयिताचे वर्णन सांगितल्याने पथकाने त्या दिशेने संशयितांचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना महामार्गालगत संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत खिशातील आणि पंपाच्या कॅबिनमधील एक लाख 42 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. पथकाने दोघा संशयितांचा शहापूरपर्यंत पाठलाग केला. तर चौकशीत तिसरा साथीदार माडसांगवी येथील सचिन गोडसे असल्याचे समोर आले.
पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने...
ओढा येथे असलेल्या कोकाटे यांच्या मालकीच्या शिवसरस्वती पेट्रोल पंपावर संशयित शुक्रवारी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास जॅकेट परिधान केलेले व तोंडाला रुमाल लावलेले 20 ते 25 वयोगटांतील संशयित बाटलीत पेटोल घेण्याचे बहाण्याने आले. त्यानी रात्रपाळीतील दोघा कर्मचायांना मारहाण करून त्यांच्या खिशातून पेट्रोल विक्रीची जमा झालेली 1 लाख 42 हजारांची रक्कम बळजबरीने हिसकावून लुटून नेली.