एक्स्प्लोर

Nashik News : मोदी यांचे डांबरीकरण, राहुल गांधींचे काँक्रिटीकरण अन् आमचा छोटासा मार्ग, महादेव जानकर यांचं वक्तव्य

Nashik Mahadeo Jankar : माझ्या वाढदिवसानिमित्ताने आज नाशिकमधून पाच थैल्या मिळणार असल्याचे रासपचे महादेव जानकर म्हणाले.

Nashik Mahadev Jankar : एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे डांबरीकरण आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे काँक्रिटकरण आहे. मी मध्ये माझा छोटासा मार्ग काढत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले. आम्ही NDA मध्ये असलो तरीही आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही, मात्र आमचा पक्ष आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवत असल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. 

आज रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी 288 मतदारसंघातून कार्यकर्ते पैसे देतात. माझ्या वाढदिवसानिमित्ताने प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते पन्नास हजार रुपये देत आहेत. हेच पैसे पक्ष चालवण्यासाठी कामी येतो. सुरुवातीपासून मला निधी मिळत आहे. आज नाशिकमधून पाच थैल्या मिळणार आहेत. त्या त्या कार्यकर्त्यांशी या निमित्ताने संवाद साधता येतो. त्यामुळे आज नाशिकमध्ये आलो आहे. येत्या निवडणुकीत (election) आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे जानकर म्हणाले. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस (BRS Party) पक्षाकडून ऑफर आल्याच्या चर्चा आहेत. यावर ते म्हणले की, "पंकजाताई (Pankaja Munde) माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव असून हुशार आहेत. याबाबत त्या स्वतः योग्य तो निर्णय घेतील." "मी सल्ला देण्याइतपत मोठा नाही," असे ते म्हणाले. तसेच बीआरएस पक्षाबाबत ते म्हणाले की, कुठल्याही पक्षाला लोकशाहीत अधिकार असून जनता ही जनार्दन आहे. जनता ठरवेल, बीआरएस पक्षाचे शेतकरी धोरण चांगले आहे. माझ्याशी अजून काही त्यांनी चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले. तसेच बाहेरच्या राज्यात आम्ही NDA सोबत नाही. राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा आम्हाला मतांची टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे आमच्या झोपडीला खुणवल्याशिवाय राजमहाल होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

'आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो'

ते पुढे म्हणाले की, एका बाजूला मोदी साहेब यांचे डांबरीकरण आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचे काँक्रिटीकरण आहे. मी मध्ये माझा छोटासा मार्ग काढत आहे. मी NDA मध्ये आहे. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो NDA मध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल, असेही ते म्हणाले. तसेच मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून प्रॅक्टिकल वागतो. ज्याच्यामागे मास आहे, त्याला सोडायचं आणि ज्याच्या मागे कुणीही नाही, त्याला घ्यायचं, असं भाजपचं धोरण आहे. त्यांना कपालेश्वर बुद्धी देवो, असे सूचक वक्तव्य केले. 

आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू

भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष असून त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. मी स्वतःला सांगतो, की महादेव जानकर स्वतःला मोठा कर, म्हणजे त्यावेळी मीडिया देखील मागे येईल. आम्ही भाजपसोबत असून आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करुन शेवटी आमचा आमदार निवडून आणला. त्यावेळी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतलं नाही. आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या. त्यांनी आम्हाला जागा द्याव्या. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, आमचं हेलिकॉप्टर जर लँड झालं तर, आम्ही आमची जागा दाखवून देऊ असा इशारा देत त्यांना मित्रपक्षाची गरज आहे. मात्र त्यांनी मित्रपक्षाची वाट लावली असून त्यामुळे आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु असल्याचे म्हणाले. 

हेही वाचा

Mahadev Jankar : एकवेळ शिंदेच्या आणि पवारांच्या पक्षाला मदत करा, पण भाजप आणि काँग्रेसच्या नादाला लागू नका : महादेव जानकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
Embed widget