Nashik Eid Mubarak : नाशिक (Nashik) शहरात आज रमजान ईद (Ramzan Eid) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून ईदगाह मैदानावर (Eidgah Ground) वीस हजारहून अधिक मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण (Namaj) करत रमजान ईद साजरी केली. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकूणच शहरात आज रमजान ईद आणि अक्षय्यतृतीया निमित्ताने उत्साहाचे वातावरण दिसून आले.


नाशिक (Nashik) शहरातील पारंपारिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्रित सामूहिक नमाज अदा केली. काल 30 रोजी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली जिल्हाभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात आली. शहरातील शहाजहान ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित सकाळी दहा वाजता सामूहिक नमाज पठण केले. शहर ए खतीब हिसामुद्दीन अश्रफी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नमाज पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी मुस्लिम समाजात मोठा उत्साह दिसणारा एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हात यंदाचा रमजान महिना असूनही अनेक आबालृद्धांनी हा अत्यंत कठीण उपवास केला. त्याच सोबत उपासनाही केली, असे शहर-ए-खतीब अश्रफी हिसामुद्दिन यांनी सांगितले. 


नाशिकच्या शाही मशिदींसह शहरातील इतर भागात शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याची सांगता झाली असून, त्यानुसार आज ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. ईद निमित्ताने शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगण देत 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत बांधवांनी गर्दी केल्याचे दिसून आले. भारतात तसे जगात शांतताना अंदाजे यासाठी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान नमाज पटनानंतर सर्व धर्मीय समाज बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे इतर बांधवांना शुभेच्छा दिल्या.


शिरखुर्म्याचा दरवळला सुगंध 


नाशिक शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर 'शिरखुर्मा'ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध शनिवारी सकाळी दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात येते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’चा वर्षाव शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यापासून तर शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. एकापेक्षा एक सरस वॉलपेपर्स, चित्रफितींद्वारे ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात होती. एकूणच शुभेच्छांच्या संदेशांची गर्दी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिसून आली.