देशभरात रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण.. आबालवृद्धांच्या सहभागाने ईदचा उत्साह द्वीगुणित
आज रमजान ईद.. गेले महिनाभर पवित्र रमजान महिन्यातील रोजाचे उपवास संपवण्याचा दिवस. आजचा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मुस्लीम बांधव वेगवेगळ्या मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी एकत्र जमतात. दिल्लीतल्या जामा मशिदीत जमलेल्या मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन रमजान ईद उत्साहात साजरी केली. (PTI Photo/Vijay Verma)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्यातील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त लाल रस्ता (Red Road) येथे सामूहिक नमाज अदा केली. अथांग समुदाय ईदचा नमाज अदा करत असताना दोन चिमुकल्यांना हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळेच सर्व जण नमाज अदा करत असताना या दोघी सर्व नमाजीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होत्या.. (PTI Photo/Swapan Mahapatra)
मुंबईतही ईदचा उत्साह पाहायला मिळाला. मुस्लीम बांधवांना रमजान ईद उत्साहात साजरी करता यावी यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली. या सुरक्षा बंदोबस्तांचा नमाज पठणासाठी जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना त्रास होणार नाही, याची काळजीही घेण्यात येत होती. पोलिस कर्मचाऱ्यांनीही मुस्लीम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. (PTI Photo/Kunal Patil)
ईद अल फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करताना एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देणं ही प्रमुख बाब. म्हणूनच ईदला स्नेह आणि परस्पर सामंजस्य, बंधुभाव वृद्धींगत करणारा सण अस म्हणतात. त्यातही लहान मुलांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या की त्यातला गोडवा अजून वाढतो. (PTI Photo/Vijay Verma)
लहान मुलांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतानाचा हा फोटो आहे दिल्लीतील जामा मशिदीतला. मशिदीच्या परिसरात सामुदायिक नमाज पठणासाठी जमलेला अथांग समुदाय आणि त्यापुढे आलिंगन देणारी दोन मुले (PTI Photo/Vijay Verma)
लहान मुलांनी एकमेकांना शुभेच्छा देणं हे नेहमीच डोळयांना सुखावणारं आणि मन प्रसन्न करणारं.. मोठी माणसेही आपलं काम थोडा वेळ थांबवून या चिमुकल्यांकडे कौतुकाने पाहत राहतात. गुरुग्राममधील एका मशिदीतील हा एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत असतानाच कौतुकाने लहान मुलांच्या आलिंगनाकडे पाहणारे मुस्लीम बांधव (PTI Photo)
उत्तरांखंडची राजधानी देहराडूनमध्ये रमजान ईदच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. देहराडूनमध्ये ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होतं. (PTI Photo)
उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये शाही इदगाह मैदानावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुणी समाजकंटकांनी गैरफायदा उठवू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (PTI Photo)
शिस्तबद्धता हे सामूहिक नमाज पठणाचं ठळक वैशिष्ट्य.. मुंबईत सामूहिक नमाज अदा करताना हा क्षण टीपलाय पीटीआयच्या कुणाल पाटील यांनी. (PTI Photo/Kunal Patil)
जयपूरमधील ईदगाह मशिदीत रमजान ईदची सामूहिक नमाज अदा करण्यात आली.. फक्त मशिदीचा परिसरच नाही तर त्याबाहेरचे रस्ते ही नमाज अदा करणाऱ्यांनी फुलून गेले. (PTI Photo)
रमजान ईदचा उत्साह ईशान्य भारतातल्या आसममध्येही पाहायला मिळाला. आसाममध्ये राजधानी गुवाहाटीच्या हातीगाव ईदगाह मैदानावर अबालबृद्धांनी सामूहिक नमाज अदा केली. (PTI Photo)
दिल्लीतल्या सर्वात प्रमुख समजल्या जाणाऱ्या जामा मशिदीतील सामूहिक नमाज पठणाचं हे विलोभनीय दृश्य.. फक्त शिस्तबद्धतेसोबतच प्रार्थनेतील लय साधण्याची किमया सामूहिक नमाज पठणात होते (PTI Photo/Vijay Verma)
दिल्लीतल्या जामा मशिदीतील सामूहिक नमाज पठणाचं हे आणखी एक मंत्रमुग्ध करणारं दृश्य.. मोगल शैलीतील बांधकाम असलेली जामा मशिदीचं प्रवेशद्वार आणि त्यासमोरच्या मैदानात नमाज अदा करणारा मुस्लीम समुदाय..
मेरठमधील रमजान ईदचा उत्साह.. उत्तर प्रदेशातील मेरठमधील शाही ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यात लहान मुलेही मागे नव्हती. लहान मुलांनी एकमेकांना शुभेच्छा देताना त्यांची छबी टिपण्याचा मोह पीटीआयच्या कॅमेरामनला आवरता आला नसावा (PTI Photo)