एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Bus Accident : नाशिक बस अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर, अहवालातुन कारण स्पष्ट 

Nashik Bus Accident : नाशिक बस अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

Nashik Bus Accident : नाशिक (Nashik) शहरानजीक आज दुपारी भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने दोन दुचाकीस्वारांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातचा प्राथमिक अहवाल समोर आला असून अहवालावरून वेगात सुटलेल्या बसने दोन दुचाकीस्वारांना चिरडत इतर वाहनांना धडक दिली आहे. 

नाशिक-पुणे महामार्गावर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास शिंदे टोलनाका (Shinde Toll Naka) चौफुलीवर परिवहन महामंडळाच्या बसचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या भयंकर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.तर अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली. नाशिक बस अपघातात होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एकाचे नाव रवींद्र सोमनाथ विसे तर दुसऱ्याचे नाव मदन दिनकर साबळे असे असून ते बजाज पल्सर गाडी नाशिककडे येत होते. दरम्यान, हे दोघेही युवक नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरुपुर येथील रहिवाशी असून ते नाशिकला  लग्नासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस यंत्रणा व तपास यंत्रणांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार नाशिक-पुणे महामार्गांवर शिंदे पळशे गावाजवळील स्पीड ब्रेकरजवळ क्रेटा कारने वेग कमी करून जात असतांना तिच्यामागे सिन्नर आगाराची बस धावत होती. सिन्नर आगाराच्या बसच्या मागे तीन वेगवेगळ्या मोटार सायकल या धावत होत्या. याचवेळी पाठीमागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या राजगुरूनगर आगाराच्या बसने पुढील तिन्ही दुचाकींना जोरात धडक देऊन पुढे धावणाऱ्या सिन्नर आगाराच्या बसच्या पाठमागील भागास धडक दिली. त्यामुळे सिन्नर आगार बसच्या पुढे धावणाऱ्या क्रेटा कारला धडक दिली. 

याच सुमारास दोन मोटार सायकल राजगुरूनगर आगाराच्या बसच्या इंजिनच्या भागात घसरत घुसल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे राजगुरूनगर आगाराच्या बसने पेट घेतला.  त्यात प्राथमिक माहिती नुसार दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. राजगुरूनगर आगाराची बस देखील पूर्ण जळाली आहे. या अपघातात एक दुचाकीस्वाराचा पाय फ्राक्चर झाला.  तिसऱ्या दुचाकीस्वाराची अद्याप माहिती मिळाली शकली नाही. जवळपास 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटल नाशिक रोड, जिल्हा रुग्णालयात व सिन्नर येथे दाखल केले आहे. दरम्यान अपघातातील जखमींना नाशिक 1 आगार, नाशिक 2 आगार व सिन्नर आगार मदत करत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवारABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सHitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Embed widget