Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये तीनशेहून अधिक मंडळाची परवानगी नाकारली, कागदपत्रांची अपूर्तता, 57 मंडळांना परवानगी
Nashik Ganeshotsav : नाशिक महापालिकेकडे (Nashik NMC) शहरातील 600 हून अधिक गणेश मंडळांनी अर्ज दाखल केले असून यातील 311 मंडळांना परवानगी नाकारण्यात आले आहे.
Nashik Ganeshotsav : अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) नाशिक महापालिकेकडे (Nashik NMC) शहरातील 600 हून अधिक मंडळांनी अर्ज दाखल केले असून यातील 311 मंडळांना कागदपत्रांची पूर्ततेचा अभाव असल्याचे सांगून परवानगी नाकारण्यात आले आहे. तर केवळ 57 मंडळांनाच आत्तापर्यंत परवानगी देण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही तीनशे कर्जबाबतचा निर्णय नाशिक महापालिका प्रशासन केव्हा घेणार याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनाचे (Corona) मळभ दूर झाल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून गणेश मंडळ जोरदार तयारीला लागले आहे. तर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार (Nashik NMC Commissioner) यांनी शहरात यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच गणेश मंडळाकडून दरवर्षी घेण्यात येणारे मंडप, फलक, कमानी यांचे कर घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे सर्वच मंडळांनी व गणेश भक्तांनी स्वागत केले आहे. परंतु मंडळांना परवानगी घेण्याचे बंधनकारक असल्याने शहरातील गणेश मंडळांनी महापालिकेच्या नियमानुसार अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान नाशिक महापालिकेला आतापर्यंत 669 ऑनलाईन अर्ज दाखल झाले असूनही अर्ज दाखल झाल्यानंतर महापालिकेकडून अपेक्षित वेळेत हे काम होत नसल्याची तक्रार गणेश मंडळाकडून होत आहे. नाशिक महापालिकेने यंदा ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सांगितले असले तरी त्यात अग्निशमन दलाचा ना हरकत, बांधकाम विभागाची परवानगी आणि नंतर कर विभागाची संमती अनुसार ही परवानगी दिली जात असल्याने हे काम खूपच किचकट झाल्याचे गणेश मंडळाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मंडळांनी काम केव्हा करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
57 मंडळांना परवानगी
नाशिक महापालिकेने एकाच ठिकाणाहून लवकरात लवकर या परवानगी द्याव्यात अशी अपेक्षा मंडळाकडून व्यक्त केली जात आहे. सध्या महानगरपालिकेच्या सिडको विभागातून सर्वाधिक 165 अर्ज दाखल झाल्या असून त्यापैकी केवळ 31 मंडळांना परवानगी देण्यात आले आहे. तर पंचवटी आणि सातपूर विभागातून अनुक्रमे 127 व 92 अर्ज दाखल झाल्या असून या ठिकाणच्या एकही मंडळाला अद्याप पर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही. तर पश्चिम विभागातून शंभर अर्ज दाखल झाले असून या ठिकाणी एकाच मंडळाला परवानगी देण्यात आले आहे. तर नाशिक पूर्व विभागातून 136 अर्ज दाखल झाल्या असून त्यापैकी 10 मंडळांना तर नाशिक रोड विभागातून 49 पैकी सात मंडळांना परवानगी देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा शहरात गणेशोत्सवाचा उत्साह राहणार असल्याचे सांगितले जात असले तरी पालिकेकडून परवानगी न मिळाल्याने अनेक गणेश मंडळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक पोलिसांची एक खिडकी सुरु
गणेश नाशिकच्या गणेश मंडळांना परवानगी संबंधाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली असून नाशिक शहरातील गणेश मंडळ यांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की परवानगी करता अर्जाचा नमुना सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे. तसेच गणेश मंडळांना देण्यात येणारी परवानगी निशुल्क असून तरी सर्व नाशिक आयुक्तालय हद्दीतील पोलीस मंडळांनी आपापल्या मंडळाचे अर्ज परिपूर्ण भरून पोलीस आयुक्तालय नाशिक येथे अथवा संबंधित पोलीस स्टेशनला परवानगी करता लवकरात लवकर जमा करावेत असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे.