Nashik Temperature : नाशिक ठंडा ठंडा कुल कुल, राज्यात ओझर सर्वात थंड शहर, अवघ्या 4.9 अंश तापमानाची नोंद
Nashik Temperature : राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून ओझरमध्ये अवघ्या 4.9 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Nashik Temperature : नाशिकच्या (Nashik) तापमानात (Mercury) कमालीची घट झाली असून काल नंतर आज पुन्हा हुडहुडी वाढली आहे. जिल्ह्यातील निफाडचा पारा (Niphad) घसरला असून 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून ओझरमध्ये (Ojhar) सर्वाधिक थंडी पडल्याची दिसते. ओझरमध्ये अवघ्या 4.9 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकसह जिल्ह्यात थंडी गायब झाल्याचा जाणवत असताना अचानक मागील दोन दिवसांपासुन नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज अचानकपणे नाशिक शहराचा पारा 10.4 अंशापर्यंत घसरला. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये अवघ्या 6.3 अशांवर पारा येऊन थांबला आहे. तर निफाड तालुक्यातील ओझरमध्ये महाराष्ट्रातील सार्वधिक थंडी पडल्याची नोंद झाली आहे. नाशिक मधील ओझर हे सर्वात थंड असून येथे 4.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून दोन दिवसांपासून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अचानक थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
नाशिकसह जिल्ह्यातील तापमानात काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. मागील आठ आदिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने काढता पाय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. कधी 15 तर कधी 14 तर कधी 13 अंशावर तापमान होते. त्यामुळे शेकोट्यांचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र कालपासून अचानक या तापमानात घट होऊन नाशिककरांना हुडहुडी भरली. परवापर्यंत नाशिक शहरात थंडीचा पारा 14 अंशावर असताना काल थेट 10 अंशावर येऊन पोहचल्याने कमालीची थंडी जाणवली. तर आज 10.4 अंशावर पोहचला आहे. तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 6.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत अचानक प्रचंड थंडी जाणवत असून सकाळी बाहेर फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येतही आज घट झाल्याचे पाहायला मिळाले.
यंदाच्या हंगामात ओझर दुसऱ्यांदा थंड
राज्यात थंडीला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच थंडीची लाट आलेली होती. दरम्यान थंडीच्या सुरवातीला ओझरमध्ये सर्वात कमी म्हणजे 5.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ओझर हे सर्वात थंड शहर म्हणून आज नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा तसेच विदर्भात ही थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे. राज्यात आकाश स्वच्छ असून वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागांतही शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे घालत असून सकाळी गरमागरम चहा प्यायला पसंती देत आहेत. त्यामुळं आता राज्यात बदललेलं वातावरण पुढील किती दिवस राहणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.