एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : मराठा पक्ष ही संकल्पना पुसण्यासाठी ओबीसी नेत्यांना संधी मिळावी, छगन भुजबळांची मागणी 

Chhagan bhujbal : राष्ट्रवादी मराठा लोकांची पार्टी नाही, पण लोकांमध्ये समज आहे. तो पुसला जावा, म्हणून.. छगन भुजबळ म्हणाले.

Nashik Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी पक्षांची मराठा पक्ष (NCP) ही इमेज पुसली जावी. म्हणून ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, शरद पवार (Sharad Pawar) यांना या सगळ्या गोष्टी कळतात, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले.  गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यांनंतर राष्ट्रवादी पक्षातच प्रदेशाध्यक्ष पदावरुन कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये (Nashik) असून सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षातील प्रदेशाध्यक्ष पदावरुन चाललेली धुसफूस, तसेच विरोधकांची आजची बैठक, महाराष्ट्रात बीआरएसची झालेली एंट्री या सगळ्या बाबींवर प्रकाश टाकला. ते यावेळी म्हणाले की, विरोधकांची आजची बैठक अतिशय महत्त्वाची असून काँग्रेसचे लोक देखील उपस्थित आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे हे देखील हजार राहतील. सर्व विरोधक एकत्र आल्याने राज्यावरील संकट बदलू शकतं, अशी आशा व्यक्त करत आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.  

तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरुन चाललेल्या वादावरुन छगन भुजबळ म्हणाले की, अजूनही देशात समाजा-समाजाचे राजकारण केले जात आहे. त्यावेळी प्रमोद महाजन असताना गोपीनाथ मुंडे यांना पुढे केले. काँग्रेसने हेच केले. पक्ष आणि विधिमंडळ येथील पदे वेगवगेळ्या समाजाला दिले जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. आमदार नसताना यांना अध्यक्ष केले. नाना पाटोले यांना देखील अध्यक्ष केले आहे. राऊत हे देखील ओबीसी असून काँग्रेसचा मी विरोधी पक्षनेता होतो. शिवसेना-बीजेपी विरोधात मी लढलो. माझ्यानंतर बबनराव पाचपुते यांना मोठ्या समाजाचे असल्याने प्रदेशाध्यक्ष केले. मी पण काम केले आहे. शरद पवार यांच्यासारखा देशाचा नेता असताना आपला मुख्यमंत्री होऊ शकला नाही. हे मनाला बोचतं अशी खंतही भुजबळांनी बोलून दाखवली. 

ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे.... 

त्यामुळे ओबीसी समाजाला संधी मिळाली पाहिजे, सर्वच पक्षात ओबीसी आहे. ममता बॅनर्जी आणि बाकी नेते आपल्या बळावर काम करत आहे. राजकारणात वेगवेगळ्या दमाचे लोक आहेत. आव्हाड, मुंडे, तटकरे यांचे नाव मी घेतले. भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे. मराठा पक्ष ही इमेज पुसली जावी. म्हणून ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, शरद पवार यांना या सगळ्या गोष्टी कळतात, असे सूचक विधानही यावेळी भुजबळ यांनी केले. दरम्यान भुजबळ पुढे म्हणाले की, वेगववगळ्या समाजात पदे वाटली पाहिजे. साधारण 91 पासून मी शरद पवार यांच्यासोबत आहे. मलाच करा असे नाही. राष्ट्रवादी मराठा लोकांची पार्टी नाही, पण लोकांमध्ये समज आहे. तो पुसला जावा, यासाठी ओबीसी नेत्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. 

बीआरएस महाविकासचे मते कमी करतील... 

तसेच गेल्या काही दिवसांपासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात जोरदार मोटबांधणी केली आहे. जाहिरातीचा सपाटा सुरु असून यावर भुजबळ म्हणाले की, भारत राष्ट्र समिती जोरकसपणे कामाला लागली असून, बीआरएस आमच्या मतदारसंघात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांचे होर्डिंग्ज लागले आहे. त्या पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मंत्रालयाला दिले. पन्नास लाख रुपये शेतकऱ्यांना देऊन टाकले. तेलंगणामध्ये हैदराबाद आले म्हणून हलक्यात घेऊ नका. दोन नंबरचे नेते गळाला लागत आहेत. सर्वच पक्षांनी विचार करायला पाहिजे, कारण आगामी निवडणुकांत हा पक्ष उतरला तर मत कमी करतील. महाविकास आघाडीची मत कमी करतील, असा घणाघात त्यांनी केला. 

कोरोना काळातील कामाची चौकशी?

दरम्यान कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा आहेत. यावर छगन भुजबळ म्हणाले की, आमच्या कानावर काही आले नाही. लोकांना वाचवणे हा प्राथमिक मुद्दा होता. आता अशा कामांची देखील चौकशी होते. नवीन असे काही नाही नसून छापा टाकून काटा काढायचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा निधी संदर्भात राजकीय वातावरण पेटले आहे. छगन भुजबळ यांनी याबाबत सचिवांकडे तक्रार केली आहे. यावर आज म्हणाले की, एखाद्या कामासाठी शंभर रुपये देऊ केले, तर दीडशे रुपये दिले जातात. इथे एक हजार रुपये दिले गेले. उर्वरित 900 रुपये कसे देणार? असा सवाल करत अशामुळे बाकींच्या आमदारांना एक रुपया मिळणार नाही असे ते म्हणाले.

हेही वाचा

Chhagan Bhujbal on NCP : तटकरे, मुंडे, आव्हाड, माझ्यासारख्या नेत्यांना संधी द्यावी : छगन भुजबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget