Nashik Nitesh Rane : आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची घाई, ते सरपंच तरी होतील का? आमदार नितेश राणेंचा खोचक सवाल
Nashik Nitesh Rane : महाविकास आघाडीपासून (Mahavikas Aaghadi) आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे.
Nashik Nitesh Rane : महाविकास आघाडीपासून (Mahavikas Aaghadi) आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हॉस्पिटलमध्ये असताना मुख्यमंत्री होण्याचे आदित्य ठाकरेंचे स्वप्न आहे. मात्र सद्यस्थितीला शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का? असा खरमरीत सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे काँगेसचे पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत की, ठाकरे सेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, मग आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? असा घणाघात राणे यांनी केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात दर्शन घेत महाआरती केली. यावेळी हिंदू संघटना उपस्थित होत्या. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत उभारण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच, लोकशाहीला संपवण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) टेबल पत्रकार असून त्यांना नवीन संसद भवनाबाबत किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना उद्देशून नवीन मातोश्री का बांधली? नवीन संसद भवन म्हणजे देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का? असा सवाल करत बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, काँग्रेस समोर झुकणारे हिजडे असतात. मग आता हे काय करतात? अशी घणाघाती टीका राणे यांनी यावेळी केली.
नितेश राणे पुढे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मंदिर हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जात आहोत. आम्ही हिंदू म्हणून महाआरती करणार आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील त्र्यंबकेश्वर मंदिरावर आपली भूमिका मांडली. यावर नितेश राणे म्हणाले की, मी काय त्यांना क्रॉस करणार नाही. तिथे स्पष्ट लिहिलं आहे की, हिंदुंशिवाय इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणी ढवळाढवळ करु नये. आमचा आजचा दौरा गावकऱ्यांच्या इच्छेनुसार लागला आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी सोबत यावं आणि भूमिका मांडावी, असे आवाहन देखील राणे यांनी केले होते.
विचार करुन बॅनर लावा.....
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लव्ह जिहादसंदर्भात ट्वीट केले आहे. या पार्श्वभूमीवर राणे म्हणाले की, आज भांडुपमध्ये जे होत आहे, ते काय आहे मग? किरीट सोमय्या यांना विनंती आहे की, गाडीत जरा जागा असेल तर अबू आझमी आणि जितुद्दिन यांना घेऊन जा, अशी विनंतीही केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लाणण्यात आले आहेत. यावर राणे म्हणाले की, महाविकास आघाडीपासून आदित्य यांना मुख्यमंत्री होण्याची घाई असून एकीकडे स्वतःचे वडील उद्धव ठाकरे यांची जसलोकमध्ये सर्जरी होत होती. तेव्हापासून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडत होते. वडील बेडवर असताना मुख्यमंत्री व्हायचं होत, तुमच्या पक्षाची अवस्था काय ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून ऐका, पृथ्वीराज चव्हाण सांगताय कूी तिसऱ्या क्रमांकाला ठाकरे गट असल्याने आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? असा सवाल उपस्थित करत शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का हा विचार करुन बॅनर लावावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.