Nashik News : नाशिकचे पोलीस उपायुक्त ठरले सायकलिंगचे 'सुपर रॅन्डोनियर', 38 तासांत पूर्ण केले सहाशे किलोमीटर
Nashik News : नाशिकचे (Nashik) गुन्हे उपायुक्त संजय बारकुंड यांना सायकलिंग मधील 'सुपर रॅन्डोनियर' (Randoniar) हा किताब मिळाला आहे.
Nashik News : धुळ्याहून (Dhule) सुरुवात झालेली सायकलिंग (Cycling) मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) ठिकरी मार्गे पुढे नेत पुन्हा धुळे ते नाशिक (Nashik) आणि नाशिक ते धुळे असा प्रवास गुन्हे उपायुक्त संजय बारकुंड (Sanjay Barkund) यांनी पूर्ण केला आहे. धुळे वाया मध्य प्रदेश अशी सहाशे किलोमीटरची सायकलिंग 40 तासांच्या मुदत ऐवजी त्यांनी 38 तासात पूर्ण केली. यामुळे ऑडस क्लब पॅरिसियर या संस्थेतर्फे नाशिकचे गुन्हे उपायुक्त संजय बारकुंड यांना 'सुपर रॅन्डोनियर' (Randoniar) हा किताब मिळाला आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयात शिस्त, कटिबद्धता, गुन्हे शोध पथकात दिमाखदारी कामगिरी असतानाच क्रीडा क्षेत्रात अधिकारी कर्मचारी चमकत आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली. तर 2022 मध्ये पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी राज्य पोलीस दलातील पहिली महिला आयर्न मॅन होण्याचा बहुमान मिळवला. या पाठोपाठ आता पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल राईटचे उद्दिष्ट पूर्ण करून पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोल आहे. परतीच्या लांबलेल्या प्रवासात मुसळधार पाऊस राज्यभरात होत असताना रात्रंदिवस सायकलिंग करून बारकुंड यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. प्रवासात आलेल्या आव्हानावर मात केल्यानंतर पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांचे नाशिक सायकलिस्टतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नाशिक पोलीस उपायुक्त संजय बारकुंड म्हणाले नाशिक उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर इथल्या क्रीडा प्रेमी सायकलीच्या माध्यमातून उमेद मिळाली. सायकलिंगची आवड असल्याने रॅन्डोनियर होण्याचे ठरवले. खडतर प्रवास करीत, पावसाची तमा न बाळगता ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. पुढील टप्प्यात 1000 आणि बाराशे किलोमीटर राईट पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सायकलिस्ट किशोर काळे यांच्यासोबत शंभर किलोमीटर पूर्ण केली. धुळे सायकलिस्ट आयोजित 600 किमी राईड मध्ये धुळे- टिकरी, इंदोर -धुळे -नाशिक -धुळे असा मार्ग होता. तत्पूर्वी उपायुक्त बारकुंड 12 जूनला 300 km 17 तासात, 21 ऑगस्टला 200 किलोमीटर 10 तासांत पूर्ण केली तर 17 सप्टेंबरला 400 किलोमीटरची स्पर्धा 17 तासांत पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे स्वरूप काय
ऑडस क्लब पॅरिसियन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे जागतिक स्तरावर सायकलिंगची रॅन्डोनियर स्पर्धा आयोजित केली जाते. यात लांब पल्ल्याच्या सायकलिस्टना लक्ष दिले जाते. त्यासाठी ठराविक वेळ मर्यादा असते. २००, ३००, ४०० आणि सहाशे किलोमीटरच्या सायकलिंग स्पर्धा घेण्यात येतात. प्रत्येक 100 मीटर अंतरावर चेक पॉइंट असतो. या चारही स्पर्धा वर्षभरात आणि वेळेत पूर्ण केल्या तर सुपर रॅन्डोनियरचा किताब मिळतो. त्यानुसार बीआरएम 600 किलोमीटर आले होते. धुळे सायकलिस्ट आयोजित 600 किमी राईड मध्ये धुळे- टिकरी, इंदोर -धुळे -नाशिक -धुळे असा मार्ग होता.