एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकच्या ज्ञानदीप गुरूकुल आश्रमास टाळे, मुलींची शासकीय निवारागृहात रवानगी

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) आश्रमातील मुलींना शहरातील शासकीय निवारागृहात हलवण्यात आले आहे. 

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) आश्रमातील आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर ज्ञानदीप गुरुकुल (Tribal Girl Ashram) आश्रमास टाळे ठोकण्यात आले आहे. संबंधित मुलींना शहरातील शासकीय निवारागृहात हलवण्यात आले आहे. 

नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील आश्रमात घडलेल्या अत्याचारानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. येथील सहा मुलींवर अत्याचार करणाऱ्या हर्षल मोरे यास तीस नोंव्हेबर म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनतर आज त्यास न्यायालयात हजर करणार आहे. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी या घटनेतील अनेक धागेदोरे शोधून तपस सुरु ठेवला आहे. अशातच येथील काही अल्पवयीन मुलींना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत पाठवण्यात आले आहे. मात्र पीडित सहा मुलींना नाशिकच्या शासकीय निवारागृहात स्थलांतर केले असून त्यांची अजुनी चौकशी करण्यात येत आहे. 

दरम्यान संशयितास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी पीडित मुलींची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वसतिगृह संचालक हर्षल मोरे याच्याव्यतिरिक्त अन्य दोन  नातेवाईक देखील दैनंदिन व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी वसतिगृहात राहायचे, मात्र या नातेवाईकांचा हस्तक्षेप नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे पोलिसांचा संशय आहे. मात्र तपास सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, 2018 मध्ये वसतिगृह सुरू केल्यापासून संशयित अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. काही मुलींवर एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक अत्याचार झाले आणि त्यापैकी एका मुलीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्याचार झाले. वसतिगृहात 13 मुली होत्या, परंतु त्यापैकी सहा मुलींवर संशयिताने अत्याचार केल्याचे समोर आले. तर दुसरीकडे वसतिगृहही बंद करण्यात आले आहे. तर आश्रमा शेजारील नागरिकांना मात्र याबाबत काहीच माहित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर यांनीही पोलीस स्टेशनला भेट देऊन या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची विनंती नाशिक पोलिसांनी केली आहे. 

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलींसोबत संचालकाने केलेले कृत्य हे अत्यंत निंदनीय असून त्याबाबत लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हायला हवे. न्यायालयात हा खटला उभा राहण्यापर्यंत साक्षिदाराना संरक्षणही दिले गेले पाहिजे. चांगले विशेष सरकारी वकिलांमार्फत बाजू न्यायालयात मांडली गेली पाहिजे. मुलींना, पालकांचे साक्षीपुरावे नोदंवून त्यांनाही संरक्षण देणे आवश्यक असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सांगितले. 

आज न्यायालयात सुनावणी
नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमाचा संचालक हर्षल मोरे उर्फ सोनू याला म्हसरुळ पोलिसांकडून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोकिसंकडून करण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget