Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) देवळाली गावातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करत अत्याचार (Molestation) केल्याचे समोर आले आहे. तसेच तिला गरोदर केल्यानंतर पीडितेवर गर्भपात (Abortion) करण्यासाठी जबरदस्ती करत दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत हा प्रकार उघडकीस आला आहे. देवळाली गाव परिसरात राहणारी पीडिता कटलरी दुकानात कामाला होती. याच कटलरी दुकानाशेजारील कपड्याच्या दुकानातील मुश्ताक रौफ शेख याच्याशी 2018 मध्ये ओळख झाली होती. त्यांच्यात 2019 पासून प्रेमसंबंध निर्माण झाले. मुश्ताकने युवतीला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मार्च 2023 मध्ये युवती गर्भवती राहिल्याने मुश्ताकने तिला नाशिकमधील एका दवाखान्यात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून युवती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केल्यानंतर मुश्ताकने डॉक्टरांना गर्भपात करण्यास सांगितले. मात्र लग्नाचा पुरावा नसल्याने गर्भपात करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


त्यामुळे मुश्ताक व युवतीने लग्न करायचे ठरवले. लग्न केल्यानंतर पीडित युवतीचे नाव आयेशा शेख ठेवण्यात आले. गेल्या 18 जुलै मुश्ताकने काही कागदांवर युवतीच्या सह्या घेऊन दोघे एसटीने नगर जिल्ह्यातील लोणी येथे मुश्ताकच्या मावशीकडे गेले. मुश्ताकने युवतीचा मोबाइल बंद करुन ठेवला. 20 जुलैला संध्याकाळी लोणी पोलीस ठाण्याचे पोलिस आले. तेव्हा मुश्ताक पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी पीडित युवतीच्या आईला बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात मुलीला दिले. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बळजबरीने अतिप्रसंग करुन धर्मांतर करुन लग्न केले. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली अशी फिर्याद दिल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल 


पिडिता मीना बाजारातील कटलरी दुकानात कामाला होती. शेजारील कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या मुश्ताक रौफ शेख याच्याशी तिची 2018 मध्ये ओळख झाली. 2019 पासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर मुश्ताकने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मार्च 2023 मध्ये युवती गर्भवती राहिली. बळजबरीने गर्भपातासाठी मुश्ताक तिला नाशिकमधील दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी लग्नाचा पुरावा मागितला. मात्र पुरावा नसल्याने माघारी फिरले. त्यानंतर मुश्ताकने धर्मगुरुंच्या उपस्थितीत लग्न केल्यानंतर पीडितेचे नाव आयेशा शेख ठेवले. काही दिवसानंतर मुश्ताकने पोबारा केल्यांनतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.


हेही वाचा


Pune Crime : पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात, वाघोलीतील धक्कादायक घटना, दोघांविरोधात गुन्हा दाखल