(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik 31st Celebration : थर्टीफस्ट पार्टीसाठी तुमच्याकडं लायसन्स लागतं, सात लाख नाशिककरांनी काढले परमिट
Nashik 31st Celebration : थर्टी फस्ट सेलिब्रेशनसाठी नाशिककरांनी जय्यत तयारी केली आहे.
Nashik 31st Celebration : थर्टी फस्ट सेलीब्रेशन अवघ्या दिवसांवर येऊन ठेपले असून नाशिककरांची (Nashik) मात्र आतापासूनच जोरदार तयारी सुरु आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील तब्बल 7 लाख नागरिकांनी मद्य प्राशन करण्यासाठी परमिट घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी हे परवाने (Liquor Lisence) दिले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाने दिली आहे.
कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष घरबसल्या थर्टी फस्टचे सेलीब्रेशन (31st Celebration) करावे लागले होते, मात्र यंदा धुमधडाक्यात नव वर्षाचे (New Year) स्वागत होणार असून यासाठी आतापासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यात परमिट घेण्यास सुरवात झाली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या माहितीनुसार आतापर्यंत साडे सात लाख नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी परमिट दिले असून त्यामुळे नाशिककरांचे 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जोरात होणार आहे. नाशिककरांकडून "वन डे परमिट" साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे. थर्टी फर्स्ट अर्थात इंग्रजी नवीन वर्षाचे जल्लाेषात स्वागत करण्याची तयारी सुरु झाली असून नाशिकमध्ये हाच जल्लाेष करण्यासाठी तब्बल साडेसात लाख नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य पिण्याचे तात्पुरते परवाने ऑनलाइन मिळविले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांसाठी वैयक्तिक ते पाटर्यांमध्ये केल्या जाणाऱ्या मद्यपानापर्यंतचे परवाने दिले जातात. यामध्ये एकदिवसीय, वार्षिक व आजीवन अशा स्वरुपाचेही परवाने आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपींकडून जल्लोष करीत पार्ट्यां केल्या जातात. मात्र मद्यपींकडे परवाना नसेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो. राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून होणारी ही कारवाई टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपानाचे परवाने दिले जातात. दरम्यान, मद्याच्या दुकानांमधूनही हे परवाने किरकाेळ फी घऊन नागरिकांना लवकरच दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा मद्यपी परवानाधारकांची संख्या वाढणार आहे.
त्यानुसार, येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत 7 लाख तळीरामांनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत. यामध्ये देशी मद्यासाठीचे 5 लाख 20 हजार तर, विदेशी मद्यासाठीचे 2 लाख 20 हजार असे 7 लाख 40 हजार मद्पींनी मद्यपानाचे परवाने ऑनलाईन घेतले आहेत. याशिवाय, मद्यविक्रेते व परमिट बारमध्येही एक-दोन दिवसांचे परवाने मद्यपींना उपलब्ध होणार आहेत. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने 31 डिसेंबरसाठी मद्यविक्री करणाऱ्या शॉपी-मद्यपानासाठीच्या परमिट रुम बंद करण्याच्या वेळात बदल करण्यात आला आहे. या दिवशी परमिट रुम, देशीदारूच्या दुकाने व वाईन-बिअर शॉपी पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवता येणार आहेत.
नाशिक पोलिसांची नजर
सुमारे साडे सात लोकांना परवाने देण्यात आले आहे. त्यात विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रविवार आणि शनिवारी आल्याने नाशिकमध्ये जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यात कोरोनामुळे दोन वर्ष 31 डिसेंबरला निर्बंध घालण्यात आले होते. यावर्षी निर्बंधमुक्त नव्या वर्षाचं स्वागत करता येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. यंदाही त्याच उत्साहात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक आतुर आहेत.