एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीत हातोडी मारून शेतमजुराचा खून, पोलिसांची डोकेदुखी वाढली

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यातील (Niphad) पिंपळगाव बसवंत येथील एकाचा डोक्यात हातोडीने वार करत खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिकच्या दिंडोरीत शेतमजुराचा हातोडी मारून खून, पोलिसांची डोकेदुखी वाढली

Nashik Crime : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील एकाचा डोक्यात हातोडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अनिल झेंडफळे असे या तरुणाचे नाव आहे. 

नाशिक शहरात खुनाच्या घटना समोर येत असताना आता जिल्ह्यातही गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र आहे. पिंपळगाव बसवंत येथील अनिल झेंडफळे या तरुणाचा मृतदेह दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील रासेगाव ते देहरेवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आढळून आला आहे. या तरुणाच्या डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान हि घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.  या ठिकाणी पिंपळगाव बसवंत येथील देवीचा बरड परिसरात राहणारे अनिल राजाराम झेंडफळे यांचा मृतदेह रासेगाव ते देहरेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला आढळून आला. तर घटनस्थळावरून काही अंतरावर लोखंडी हातोडी देखील आढळून आली. या घटनेची माहिती दिंडोरी पोलिसांना मिळताच दिंडोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. अज्ञात संशयिताने पिंपळगाव बसवंत येथील अनिल झेंडफळे यास देहरेवाडी शिवारात आणून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने मारून त्यास जीवे ठार मारले. 

तसेच खून केल्यांनतर मृतदेह रस्त्याच्या कडेला आणून संशयिताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र येथून जाणाऱ्या पदाचार्यां मृतदेह निदर्शनास आल्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. सदर तरुणाचा खून झाला असला तरी मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शिवाय संशयितांबाबत कुठलीही माहिती अद्याप पोलिसांना नाही. या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांपुढे संशयिताला शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड तसेच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे अधिक तपास करत आहेत.

नाशिक बनतेय क्राईम कॅपिटल 

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मागील पंधरा दिवसांत सात खून झाले असून दिंडोरी तालुक्यातील या खुनाने हि संख्या आठवर गेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागात देखील दहशतीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीने नाशिक शहराची ओळख क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Embed widget