MVA Mahamorcha : महाविकास आघाडीचा हल्लाबोल, नाशिकहून महामोर्चासाठी हजारो कार्यकर्ते रवाना
MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) महामोर्चासाठी हजारो कार्यकर्ते नाशिकहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) महामोर्चा साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिकहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. यासाठी जवळपास दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यक्रत्यांनी सांगितले.
महापुरुषांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने (Protest) होत असून आज महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा (Mahamorcha) आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातून काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. आज सकाळी राष्ट्रवादी भवनजवळ सर्व कार्यकर्ते जमल्यानंतर या ठिकाणाहून मुंबईकडे कूच करण्यात आली. यावेळी महिलांसह राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी भवन जवळ जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी मुंबईकडे कूच करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने होणाऱ्या हल्लाबोल मोर्चामध्ये मुंबई सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शहरातले हजारो कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली, या भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला छळवून सोडलेले आहे, नको ते वक्तव्य सरकारमधल्या राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे लोक करत आहेत. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारीचा मोठा प्रश्न असताना अशाप्रकारे ठिकाणी स्त्रियांचा अनादर केला जातो. या सगळ्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला मोठ्या संख्येने रवाना झाले.
शरद पवार संबोधित करणार
महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.
थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार
मुंबईतील भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचा मार्ग आहे. पुढील काही वेळातच या मोर्चाला रिचर्ड अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य, महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येत आहे.