Nashik Grapes : द्राक्षांचा गोडवा सात समुद्रापार, सर्वाधिक नोंदणी ग्रेपसिटीतुन... अशी आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया?
Nashik Grapes : द्राक्ष निर्यातीकरता (Grape Export) नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Nashik Grapes : दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी युरोपियन देशांसह (Eropian country) इतर देशांना द्राक्ष निर्याती करता निर्यातक्षम द्राक्ष बागेची (Grape Export) नव्याने नोंदणी करणे व जुन्या भागांची नोंदणी करण्याकरता ग्रेपनेट कार्यप्रणाली (Grapenet) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरातून द्राक्ष उत्पादक नोंदणी करत असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची प्राथमिक माहिती आहे.
ग्रेप सिटी (Grapecity) म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. दरवर्षी नाशिक जिल्ह्यातून हजारो टन द्राक्ष निर्यात केली जातात. युरोपियन व युनियन व इतर देशांना किडनाशक अंश तसेच युरोप कीड व रोग मुक्तची हमी देण्यासाठी द्राक्ष बागांची ग्रेपनेट अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणीकृत द्राक्ष बागेतील द्राक्ष निर्यात करणे, निर्यातदारांनाही बंधनकारक करण्यात आले. मागील वर्षी सन 2021 22 मध्ये सर्वाधिक दोन लाख 63 हजार 75 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली एकूण निर्यातीपैकी एक लाख 5 हजार 827 मॅट्रिक पर्यंत द्राक्षांची युरोपियन देशांमध्ये निर्यात झाली होती.
युरोपियन देशांनी कीडनाशक नियंत्रणा बाबतचे निकष अत्यंत कडक केले असल्याने त्या बाबींची पूर्तता करण्याकरता तसेच युरोपियन देशांच्या अटी व शर्तींच्या पूर्ततेची हमी देण्यासाठी सन 2003 चार पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्याती करतात. कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रण कार्यप्रणाली तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरता ग्रेपनेट ही ऑनलाईन कार्यप्रणाली करण्यात आले आहे.
सर्वाधिक नोंदणी नाशिक जिल्ह्यात...
सन 2022 23 मध्ये अपीड आणि मार्च 2022 मध्ये ट्रेड नोटीस जाहीर केली असून युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरता निर्यातक्षम द्राक्ष बागांचे ग्रेपनेटद्वारे नोंदणी करण्याकरता 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुद्दे देण्यात आली आहे. सद्यस्थितीत ग्रेपनेट अंतर्गत सन 2021-22 मध्ये 44 हजार 180 भागांची नोंदणी करण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रात 44123 व कर्नाटक मध्ये 57 द्राक्ष बागांची नोंदणी झाली. महाराष्ट्रमध्ये नाशिक जिल्ह्यात 34 हजार 295, सांगली 4 हजार 832, पुणे 1238, सोलापूर 641, अहमदनगर 871, सातारा 432 उस्मानाबाद 550, लातूर 128, बुलढाणा 42 व जालना 18 अशी निर्यातक्षम द्राक्ष बागांची ग्रेपनेटद्वारे नोंदणी केली आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया...
निरक्षण द्राक्षबागांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. या या द्वारे द्राक्ष बागातदारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हे मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून अर्ज करावेत. अर्जामध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, सातबारा क्रमांक द्राक्षाची जात, क्षेत्र छाटणीची, काढण्याची तारीख व अंदाजे उत्पन्न बागेस ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्या तपशील इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.