Nashik Murder : नाशिकच्या प्रसिध्द उद्योजकाचा खूनच, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड
Nashik Murder : नाशिकमधील (Nashik) शिरीष सोनवणे (Shirish Sonawane) या उद्योजकाच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nashik Murder : नाशिकमधील (Nashik) शिरीष सोनवणे (Shirish Sonawane) या उद्योजकाच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनवणे यांचा शवविच्छेदन (Postmortem) अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्या डोक्यावर वार करण्यात येऊन रक्तस्राव झाला. तसेच पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला असे कारण समोर आल्याने खळबळ उडालीय. मालेगाव तालुका (Malegaon Police) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.
नाशकातले फर्निचर व्यापारी शिरीष सोनवणेंचा घात झाला की त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.. कारण बेपत्ता झालेले व्यावसायिक शिरीष सोनवणे यांचा मालेगावातल्या सायतरपाडे शिवारातील कालव्यात मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांच्या पाहणीनुसार सोनावणे यांच्या मृतदेहावर गंभीर जखमा आढळून आल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं होता. अखेर शवविच्छेदनानंतर सोनवणे यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. कारण डोक्यावर वार केल्याने मूत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे.
नाशिक शहरातील एकलहरे रोड (Eklahare Road) येथील फर्निचर व्यावसायिक शाळेचे बेंच बनविणाऱ्या कारखान्याचे संचालक शिरीष सोनवणे हे बेपत्ता होते. पण काल त्यांचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मिळून आला. मृत सोनवणे यांच्या शरिरावर गंभीर जखमा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नाशिकच्या एकलहरे परिसरात शिरीष सोनवणे यांचा शाळेतील बाकं बनवण्याचा कारखाना आहे. ते शनिवारपासून बेपत्ता होते. या संदर्भात कारखान्यातील कर्मचारी बेपत्ता असल्याची फिर्याद नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार नाशिकरोड पोलिसांनी दोन पथके तयार करीत प्राप्त माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी सुरु होती.
अशातच तपास सुरु असताना पोलिसांना मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील पाटबंधारे विभागाच्या कालव्यात सोनावणे यांचा मृतदेह आढळून आल्यानं व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले होते. अखेर शवविच्छेदन अहवालानंतर सोनावणे यांचा खून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालानुसार सोनावणे यांच्या डोक्यावर वार केल्याच्या जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. मात्र खून नेमका कुणी व कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.
शिरीष सोनावणे कोण?
धुळे जिल्ह्यातील राहणारे सोनवणे हे रेल्वेत नोकरीत होते. त्यांच्या भावाचा धुळे येथे बेंच बनवण्याचा कारखाना असल्याने हा व्यवसाय मोठ्या शहरात करता येईल या उद्देशाने धुळे येथून नाशिक रोड रेल्वे स्थानकात बदली करून घेतली. प्रथम बिटको कॉलेज समोर व नंतर सिन्नर फाटा पोलीस काम सुरू केले. नंतर एकलहरे रोड परिसरात पत्नी उज्वला यांच्या नावावर कारखाना सुरू केल्यानंतर व्यवसायातील मिळत असलेले यश बघता त्यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला. राज्यासह देशभरातून सोनावणे कारखान्यातून बेंच खरेदीसाठी विशेष मागणी असते