एक्स्प्लोर

Nashik News : मांजराचा पाठलाग करत बिबट्या विहीरीत पडला, विहिरीत बिबट्याला भिडली मांजर, वाचा काय घडलं?

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये विहिरीत पडलेला बिबट्या आणि मांजर आमने-सामने आल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. विहिरीत बिबट्या आणि मांजर आमने-सामने आल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्यासह मांजरीची सुटका केली आहे. 

नाशिकसह जिल्हाभरात बिबट्याचा (Leopard) वावर दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही समोर येत आहेत. तर काहीवेळा भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याचे देखील समोर आले आहे. सिन्नर (Sinner) तालुक्यातील टेंभूरवाडी येथे या घटनेचा प्रत्यय आला आहे. मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह (Cat) विहिरीत पडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर मांजरीने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

नाशिकसह निफाड, सिन्नर (Sinner) येवला परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याचबरोबर बिबट्याचे हल्ले देखील वाढले आहेत. यामुळे सिन्नरसह परिसरात दहशत पसरल्याचे चित्र आहे. अशातच तालुक्यातील टेंभुरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला. तर कसा? या शेतातून बिबट्या जात असताना अचानक त्याच्या समोर मांजर दिसली. मांजरीला पाहताच बिबट्याने मांजरीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मांजर अन् बिबटची नजरानजर होताच मांजरीने धूम ठोकली.  यावेळी पळत असताना दोघांनाही विहिरीचा अंदाज आल्याने मांजरीसह बिबट्या विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेतला. 

दरम्यान मांजरीनेही जीव वाचवण्याची धडपड करत पाण्याच्या कडेला पोहोत जाऊन थेट बिबट्याच्या शेपटीलाच पकडत पाण्यावर तरंगून राहिली. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकताच सांगळे यांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या व मांजर पाण्यात पडलेले त्यांना दिसून आले. यावेळी मांजर चक्क बिबट्याच्या शेपटीला धरून बसलेली त्यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्या व मांजरीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या सेवकांकडून अथक परिश्रम सुरू आहे. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे.

बिबट्या मांजर आली समोरासमोर... 

जेव्हा आज पहाटेच्या सुमारास बिबट्या आणि मांजर समोरासमोर आल्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या बिबट्याने मांजरीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. दोघेही विहिरीत पडले, मात्र यावेळी विहिरीतील मोटरचा आधार घेत दोघेही एकमेकांसोबत बाहेर येण्यासाठी धडपडू लागले. शेवटी वनविभागाने घटनास्थळी जाऊन दोघांनाही रेस्क्यू केले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget