Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, माजी आमदार, जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश
Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
Nashik Politics : नाशिकच्या (Nashik) राजकारणात उलथापालथ सुरूच असून ठाकरे गटाला (Thackeray Sena) उतरली कळा लागल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरे गटातून काही माजी आमदार, माजी जिल्हाप्रमुख आदीसंह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात (Shinde Sena) प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
नाशिकच्या (Nashik Politics) राजकारणात (Political News) एकावर एक ट्विस्ट येत असून यात ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) सातत्यानं धक्के सहन करावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांच्या जथ्यानं शिंदे गटात एन्ट्री करत ठाकरे गटाला खिळखिळं केलं. याच सुमारास संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर येऊन गेले होते. संपर्क प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी मोठा बॉम्ब फोडला. मात्र तत्पूर्वीच भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले. त्यानंतर आज पुन्हा ठाकरे गटातील काही माजी आमदार,माजी जिल्हाप्रमुखासंह तालुकाप्रमुखानी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातील मोठा गट फोडण्यात शिंदे गटाला अखेर यश आल्याचे म्हटलं जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाचे काही माजी आमदार, माजी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा आज शिंदे गटात प्रवेश केलं आहे. त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात करणार प्रवेश आहेत तर आज रात्री नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश घेतला जाणार असल्याने प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी नागपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
नाशिक ठाकरे गटाशी सख्य राखून असलेले संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन डॅमेज कंट्रोल रोखलं. मात्र काही दिवसांपासून ठाकरे गटात अस्वस्थता होती. काही माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊतांनी नाशिक दौरा केल्यानंतर ही चर्चा काही काळ थांबलेली होती. त्यानंतर संजय राऊत हे पुन्हा दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांशी बैठका घेत विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेश केलेले अजय बोरस्ते यांची भेट घेत वैयक्तिक चर्चा केली होती. मात्र संजय राऊत माघारी फिरताच प्रवेशाच्या हालचाली झाल्या अन बारा माजी नगरसेवकांनी ठाकरे गटातून काढता पाय घेतला. त्यानंतर आज पुन्हा जिल्ह्याला सुरुंग लागला असून माजी आमदारांसह माजी जिल्हाप्रमुख व इतर महत्वाचे पदाधिकारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याने ठाकरे गटाच्या राहिलेल्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.