एक्स्प्लोर

Nashik Sinner News : अभिमानास्पद! सिन्नरच्या देवपूर गावातली पहिली मुलगी झाली 'डॉक्टर', गावकऱ्यांनी पंचक्रोशीत वाटले पेढे

Nashik Sinner News : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील देवपूर येथील ज्योती पन्हाळे (Jyoti Panhale) ही पहिली मुलगी गावातून डॉक्टर झाली आहे.

Nashik Sinner News : सिन्नर (Sinnar) तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट घडली असून तालुक्यातील देवपूर येथील ज्योती पन्हाळे (Jyoti Panhale) ही पहिली मुलगी गावातून डॉक्टर झाली आहे. शेतीत काम करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवणाऱ्या शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या ज्योतीने कुटुंबासह ग्रामस्थांची मान उंचावली असून पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान ज्योतीने मिळवला आहे.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर (Deopur) येथील ज्योती सोमनाथ पन्हाळे हिने एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन देवपूर गावातून पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे गाव असलेल्या देवपूर येथील कन्येने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवून देवपूर गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे. 

डॉ. ज्योती पन्हाळे या देवपूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून इयत्ता दहावी पर्यंत त्यांनी देवपूर हायस्कूल येथे शिक्षण केले आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवल्यानंतर डॉ. ज्योती पन्हाळे यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सदर यश संपादन केले. देवपूर गावात पहिली एमबीबीएस (MBBS) त्यात महिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवल्याबद्दल डॉ. ज्योती पन्हाळे यांचे कौतुक केले जात आहे. शेतकरी कुटुंबातील असणारे ज्योती यांचे वडील सोमनाथ पन्हाळे यांचे गहू हार्वेस्टिंग मशीन असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. दहावीपर्यंत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल मध्ये शिक्षण वडील सोमनाथ पन्हाळे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक ओढाताण असतांना शिक्षण पूर्ण केले. डॉ ज्योती घरातील मोठी मुलगी असून लहान बहीण व लहान भावाचे शिक्षण सुरू आहे.

गावात अनेक ज्योती घडवणार.... 

गावातील पहिली मुलगी एमबीबीएस झाल्याबद्दल आम्हाला ज्योतीचा सार्थ अभिमान आहे. तिचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळात गावात आणखी ज्योती तयार होतील. ज्योतीने मिळवलेले यश युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास ज्योतीच्या आईवडिलांनी व्यक्त केला. ज्योतीचे यश गावच्या प्रत्येक मुलाला प्रेरणा देणारे ठरणार असून ती यापुढेही आपल्या क्षेत्रात नक्कीच उंच भरारी घेईल यात कोणतीच शंका नाही. ज्योतीच्या या दैदिप्यमान यशात तीच्या कुटुंबीयांचा देखील मोलाचा वाटा असून शिक्षकांचे तिला नेहमीच मार्गदर्शन लाभले असल्याचे गावातील जेष्ठ नागरिकांनी सांगितले. डॉ. उत्कर्षा ही गावातील पहिली मुलगी एमबीबीएस झाल्यामुळे गावासह परिसरातून तिचे कौतुक होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारातMuddyach Bola Yeola Constituency : छगन भुजबळांच्या मतदारसंघातून 'मुद्याचं बोला'Asaduddin Owaisi Exclusive : माझी प्रत्येक वस्तू-बॅग चेक करा, देशप्रेमाशिवाय काही सापडणार नाहीAvinash Jadhav Thane Vidhan Sabha | हातात फलक घेऊन एकदा संधी द्या, अविनाश जाधवांचं ठाणेकरांना आवाहन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
Embed widget