एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik News : इगतपुरी वेठबिगारी प्रकरण : नाशिक, नगरच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांविरोधात वॉरंट

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील वेठबिगारी प्रकरणात चौकशीसाठी हजर न राहिल्याने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहेत.

Nashik News : नाशिक (Nashik) इगतपुरी तालुक्यातील वेठबिगारी प्रकरणात (case of misappropriation) चौकशीसाठी हजर न राहिल्याने नाशिक, नगरचे जिल्हाधिकारी (Nashik Collector), पोलीस अधिक्षकांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहेत. केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे पोलीस महासंचालकांना आदेश दिले असून कातकरी समाजातील मुलांच्या वेठबिगारी प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना अटक वॉरंट काढल्याने खळबळ उडाली आहे. 

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) आदिवासी कातकरी (Tribale Community) समाजातील अल्पवयीन मुलांची काही हजार रुपयात विक्री करून मेंढीपालनाच्या वेठबिगारी प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर न राहणे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना चांगले भोवले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने समन्स बजावूनही नाशिक व अहमदनगरचे जिल्हाधिकारी व अधीक्षक साक्षीदार म्हणून हजर राहिले नाही. त्यामुळे या चारही अधिकाऱ्यांच्या नावाने आयोगाने अटक वॉरंट जारी केले आहेत. 1 फेब्रुवारी पर्यंत त्याच्या अंमलबजावणीच्या आदेश आयोगाने पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना दिले आहेत. यामुळे वेठबिगारी प्रकरणात साक्षीदार असलेल्या अधिकाऱ्यांना हयगय केल्याने आयोगाने थेट अटक वॉरंट काढून सर्वानाच धक्का दिला आहे. 

इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या मुलांची विक्री झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यापैकीच एका मुलीचा खून झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. काही पीडित मुला मुलींनी दिलेल्या जबाबानुसार संगमनेर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यातील एक गुन्हा पारनेर पोलिसात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक व अहमदनगरमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणांमध्ये संशयितांना अटकही झाली, मात्र त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना संबंधित अधिकाऱ्यांना हजर राहणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांनी वॉरंट जरी करत कां उघाडणी केली आहे. 

1 फेब्रुवारीपर्यंत कारवाईची शक्यता 

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. त्यानुसार नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावाने अटक वॉरंट काही दिवसांपूर्वी निर्गमित झाले आहेत. दरम्यान इगतपुरी व अहमदनगरच्या मेंढपाळ वेठबिगारी प्रकरणाची दखल आयोगाने घेतली आहे. त्यानुसार संबंधित चारही अधिकाऱ्यांना 2 जानेवारी 2023 रोजी आयोगाने समन्स बजावला होता. त्यानुसार नऊ जानेवारी रोजी आयोगाने आयोगासमोर चौघांनी साक्षीदार म्हणून या प्रकरणातील अहवाल सादर करून हजर राहणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने आयोगाने थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारी पर्यंत महासंचालकांतर्फे संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Embed widget