Harbhajan Singh : भज्जीनं घेतला पिठलं भाकरीचा स्वाद; नाशिकमध्ये स्वत: बनवलं चुलीवरच जेवण..
Harbhajan Singh : माजी फिरकीपटू तथा खासदार हरभजन सिंघने (Harbhajan Singh) नाशिकमध्ये (Nashik) येत स्वतः जेवण बनवत पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला आहे.
Harbhajan Singh : माजी फिरकीपटू तथा खासदार हरभजन सिंघने (Harbhajan Singh) नाशिकमध्ये (Nashik) येत स्वतः जेवण बनवत पिठलं भाकरीचा भाकरीचा आस्वाद घेतला आहे. विशेष म्हणजे भज्जीने या पिठलं भाकरीचे तोंडभरून कौतुक करत आस्वाद घेण्यासाठी 'पुन्हा येईन' असही त्याने सांगितले.
फिरकीपटू म्हणून ओळख असलेला आणि चांगल्या चांगल्या फलंदाजांचा त्रिफळा उडविणारा हरभजन सिंग सध्या राजकारणात (Politics) सक्रीय आहे. दरम्यान अनेकदा तो राज्यसभेत दिसतो. यातून वेळ काढत हरभजन सिंगने नुकतीच नाशिकमध्ये आला होता. यावेळी त्याने त्र्यंबकरोडवरील हॉटेल संकृतीला (Hotel Sankruti) भेट देत स्वतः जेवण बनवले. तसेच पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला.
दरम्यान नाशिकच्या पूजा विधीसाठी प्रसिध्द असलेल्या त्र्यंबकेश्वरला (Trimabkeshwer) त्याने भेट दिली. यावेळी येथील शिखरे गुरुजीच्या माध्यमातून पूजा केल्याचे समजते. पूजा केल्यानंतर हरभजन सिंग जेवण करण्यासाठी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील बेळगाव ढगा परिसरात हॉटेल संस्कृतीला जेवण केले. यावेळी त्याने स्वतः किचनमध्ये जात चुलीवर जेवण कसं बनवितात? चूल कशी पेटवितात? याविषयी जाणून घेतले. शिवाय महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेनू असेलला पिठलं भाकरी त्याने बनवून आस्वाद घेतला. जेवणांतर त्याने या मेनूचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी हॉटेलचे संचालक दिग्विजय मानकर यांनी त्यांचे स्वागत केले.
आधी फलंदाज आता विरोधक
आपल्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत हरभजन सिंगने अनेक फलंदाजांना चांगलीच धूळ चारली आहे. आता तो राज्यसभेत विरोधकांना धूळ चरत आहे. हरभजनची क्रिकेट कारकीर्द 23 वर्षांची आहे. सध्या तो अनेक सिरीजमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या कारकिर्दीत 2011 विश्वचषक आणि 2007 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. 2011 च्या विश्वचषकात त्याने 9 विकेट्स घेतल्या होत्या आणि 2007 च्या T20 विश्वचषकात 7 विकेट्स घेत महत्वाची भूमिका बजावली होती.