Nashik crime : नांदेडमध्ये चालवायचा पोलीस प्रशिक्षण केंद्र, चौदा वर्षांपासून फरार संशयित पोलिसांच्या ताब्यात
Nashik Crime : लाखो रुपयांचा (Fraud Case) गंडा घालून चौदा वर्षांपासून फरार झालेल्या संशयितास पंचवटी पोलिसांनी (Panchavti Police) नांदेड जिल्ह्यातून (Nanded District) बेड्या ठोकल्या आहेत.
Nashik Crime : शासकीय नोकरी (Goverment Job) लावून देण्याचे आमिष दाखवून जवळपास 50 बेरोजगार तरुणांना 51 लाख रुपयांना गंडा घालून फरार झालेल्या संशयित आरोपी संतोष चंद्रभान मुळे याला सोमवारी पंचवटी पोलिसांनी (Panchavti Police) नांदेड जिल्ह्यातून (Nanded District) बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर मुळे यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंचवटीतील क्रांतीनगर येथे 2008 मध्ये राहणाऱ्या मुळे यांनी अनेक बेरोजगार तरुणांना अनेक शासकीय कार्यालयात ओळख असल्याची भास होत शासकीय नोकरी लावून देत असे सांगून जवळपास 51 लाख रुपयांना गंडा घातला होता. फसवणूक झाल्यानंतर मुळे याच्यावर 2008 मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुळे फरार होता. दरम्यान संशयित मुळे हा नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाजिक पोलीस निरीक्षक घिसाडी यांच्या सह पोलीस पथकाने किनवट गाठून मुळे याला बेड्या ठोकल्या आहेत. मुळे हा गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवीत असल्याचे समजते. फसवणूक केलेल्या पोलीस कर्मचारी व इतर शासकीय नोकरदार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी संशयित मुळे यास न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सात वर्षानंतर घरफोड्यास अटक घरफोडीच्या गुन्ह्यात तब्बल सात वर्षानंतर एका संशयितास अटक करण्यात पोलिसांना यश आल आहे. अविनाश संजय खरात असे संशयित आरोपीचे नाव आहे. 2015 च्या दाखल गुन्ह्यात हा संशयित फरार होता. उपनगर पोलिसांनी वडाळा गाव येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. संशयित सराईतपणे घर बदलून शहरात वास्तव्य करत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. वरिष्ठ निरीक्षक निलेश माईंनकर यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संशयितास सापळा रचून अटक केली.
नाशिकमध्ये गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. त्यातच नाशिक पोलिसांनी एक चौदा आणि सात वर्षानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जर एका गुन्हेगाराला शोधण्यासाठी इतकी वर्ष जाऊ द्यावी लागत असतील? इतर मोठ्या गुन्ह्यांच काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.