Nashik Crime : नाशिकच्या उद्योजक 'मर्डर मिस्ट्री'प्रकरणी चौघेजण पोलिसांच्या ताब्यात, सहा दिवसांची पोलीस कोठडी
Nashik Crime : अंबड (Ambad) औद्योगिक वसाहतीतील उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या खुनाचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले असून या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या खुनाचा (Nashik Murder) छडा लावण्यात नाशिक पोलिसांना यश आले असून या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांमध्ये दोघे अल्पवयीन आहेत.
नाशिकमध्ये मागील काही दिवसांपामध्ये आठ खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये मंगळवारी सकाळी अंबड औद्योगिक वसाहतीत उद्योजक असलेल्या नंदकुमार आहेर यांचा खून करण्यात आला. या घटनेने औद्योगिक जगतात खळबळ उडाली. आहेर यांचा कंपनीचा प्रवेशद्वाराजवळच तलवार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
या घटनेदरम्यान संशयितांपैकी एकाच्या मांडीवर वार झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पोलीस - डॉक्टर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टरांनी सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्याने या गुन्ह्यांची उकल झाली. दरम्यान रुग्णालयात जखमी संशयितांची चौकशी केल्यानंतर तीन फरार संशयितांना पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली.
उद्योजक नंदकुमार आगर यांच्या हत्येप्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. चार संशयितांमध्ये दोन जण चाळीसगावचे असून हत्येपूर्वी दोघे चाळीसगावातून नाशिकमध्ये आल्याचे समोर आले आहे. आहेर यांची हत्या नियोजित असून त्यासाठी संशयितांनी आदल्या रात्री एकत्र येत हा मर्डर मिस्त्री चा प्लॅन तयार केला होता, असे पोलिसांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे संशयितांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या अल्पवयीन मुलांना बाल संरक्षण गृहात तर इतर दोघांना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंबड गुन्हे विभागाचे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी पथक तयार करत सहाय्यक गणेश शिंदे यांच्या पथकाला सूचना केल्या. त्यानुसार प्रमुख संशयित पियुष माळोदे सह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांचा शोध घेण्यासाठी पोलीस चाळीसगावात पोहोचले. तेथून पोलिसांनी संशयित सिद्धार्थ उर्फ गोलू गायकवाड सह एका अल्पवयीनांस ताब्यात घेतले. त्यांना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता पियुष व गोलू यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आईला कामावर काढल्याचा राग
आईला कामावर काढल्याचा राग आणि इतर मुद्द्यांवरून संशयितांनी उद्योजक नंदकुमार आहेर यांचा हत्येचा कट रचला. यामधील संशोधक गोलू हा यापपूर्वी नाशिकमध्ये वास्तव्यास होता. गोलू यास ओळखीतून या हत्येसाठी बोलवण्यात आले होत्रे. चाळीसगावहुन येताना गोलू याने एका अल्पवयीन मित्राला आणले. त्यानंतर मंगळवारी सकाळी चौघे मयत अहिरे यांच्या मागावर होते. त्यानुसार त्यांनी आहेर यांना कंपनीबाहेर गाठून त्यांचा खून केला.