एक्स्प्लोर

Nashik Saptshrungi devi : सप्तशृंगी गडावर तब्बल 23 देशातील भाविकांची मांदियाळी, भाविकांनी गायली देवीची भजनं

Nashik Saptshrungi devi : सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव (Chaitra Utsava) सुरू असून 23 देशांमधल्या 56 विदेशी पर्यटकांनी वणी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले.

Nashik Saptshrungi devi : सप्तशृंगी देवी (Saptshrungi Devi) गडावर चैत्रोत्सव यात्रा सुरु असून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी गडावर येत आहेत. अशातच रविवार (2 एप्रिल) सुट्टीचा आनंद आणि सप्तगशृंगीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि देशाबाहेरील म्हणजेच जवळपास 23 देशातील भाविकांनी गडावर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी गडावर (Saptshrungi Gad) चैत्रोत्सव यात्रा सुरु असून रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव रस्त्यावर पायवाटेने हजारोंच्या संख्येने भाविक सप्तशृंगी गडावर जात आहेत. रविवारच्या दिवशी सप्तशृंगी देवीच्या चरणी विदेशी पर्यटकांनी हजेरी लावत देवीची भजनं गायली. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव (Chaitra Utsava) सुरु असल्याने देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यातच सहयोग ध्यान केंद्राच्या माध्यमातून 23 देशांमधल्या 56 विदेशी पर्यटकांनी वणी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी सप्तशृंगी मंदिरात या भाविकांनी जोगवा, गणेश अथर्वशीर्ष तसेच मराठी भजन गात सगळ्यांचेच लक्ष आकर्षित केले. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, टोकियो, इटली, यूएससह 23 देशांमधून हे भाविक गडावर दर्शनासाठी आले होते.

दरम्यान गुरुवारपासून सुरु झालेल्या सप्तशृंगी गडावरील चैत्रउत्सवाला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक भागातून भाविक भटक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. धुळे (Dhule), नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा, रावेर या खानदेश पट्ट्यातूनही माहेरवाशीण दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होत आहेत. पहिल्या दोन-तीन दिवस भाविकांची फारशी गर्दी नसली तरी रविवारी सुट्टीमुळे त्यात वाढ झाली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी आहे. देवस्थान ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे 24 तास दर्शन खुले करण्यात आले आहे. प्रसादालयात मोफत अन्नदान होत असून त्याचाही लाभ भाविक घेत आहेत. गडावर दर्शनासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांवर दर्शन बारी लावण्यात आल्या आहेत.

सप्तशृंगी गडावर ई टॉयलेटची सुविधा... 

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट मार्फत ई टॉयलेटची सुविधा करण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून श्री क्षेत्र सप्तशृंगीगड येथे ई-टॉयलेट प्रकारातील अद्ययावत स्वच्छता गृह उभारणीसाठी 50 लक्ष रुपयांचा शासकीय निधी मंजूर झाला आहे. वर्ष 2022-23 अंतर्गत त्याचा पहिला टप्पा रुपये 10 लाख रकमेचा जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत मान्यता क्रमप्राप्त आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरPravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 19 November 2024Sanjay Shirsat Manoj Jarange : मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget