Nashik News : नाशिक मनपाच्या वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Nashik News :नाशिक (Nashik) शहर सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहराची स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेल्या वॉटरग्रेसच्या (WaterGress) सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police) स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता त्यांनी परिसरात आंदोलन (Protest) करण्यात आले. तसेच कंपनीला ठेका देण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाशिक शहरात ठीक ठिकाणी साफसफाई करण्याचा ठेका हा वॉटर प्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी हा ठेका देण्यात आला असून सकाळी पाच वाजेपासून ते सात वाजेपर्यंत हे सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. मात्र या कंपनीच्या ठेकेदाराकडून भरती केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कुठलीही तरतूद नसताना रक्कम घेतली जात असल्याचा मुद्दा आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या पगारापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप करत वॉटर रेस कंपनीचा हा ठिकाण रद्द करण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये वॉटर ग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका एक संशोधनाचा भाग आहे. मात्र ठेकेदारी माध्यमातून 700 कामगार ज्यांना तीन वर्षाचा ठेका देण्यात आला. या शहरातील साफसफाईचा आणि त्या दृष्टिकोनातून ठेकेदारांकडून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून पिळवणूक होते. त्यांचा पगार जो काही महानगरपालिका प्रशासन देते. त्याआधीच ठेकेदारांकडून निम्मा पगार काढून घेत जात असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून दिवाळीचा जो बोनस असतो. एक पगार महानगरपालिका प्रशासन ते ठेकेदार या मुलांच्या अकाउंटला जमा करत होती. यांच्या खात्यातून तो बोनसही काढून घेतला जायचा. गेली दोन वर्ष यांना दिवाळीचा बोनसच मिळालेला नाही, अशी माहिती मनसेचे दिलीप दातीर यांनी दिली आहे.
मुंबई नाका येथे तक्रार
दरम्यान वॉटरग्रेस कंपनीच्या एका सफाई कर्मचाऱ्याला ठेकेदाराच्या लोकांकडून मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आज नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दखल करण्यात आली आहे. शिवाय या परिसरात सफाई कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्याकडून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा वॉटरग्रेस कंपनीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाली आहे.